विधानपरिषदेनंतर राज्यात विधानसभेचा बिगुल, भाजप घालणार राष्ट्रवादीला साकडे
भाजपचा इतिहास पहिल्यास राष्ट्र्वादी काँग्रेस भाजपला मदत करणार का? हा प्रश्न आहे. यामुळे या निवडणुका बिनविरोध होणार की भाजप व महाविकास आघाडी म्हणजेच राष्ट्रवादी सामना रंगणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
पुणे : पुणे शहरात भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. पुणे शहरावर वर्चस्व मिळवण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असतात. आता भारतीय जनता पक्षाला पुन्हा राष्ट्रवादीची गरज पडणार आहे. आता पुणे शहरातील कसाब पेठ व पिंपरी चिंचवड येथील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी भाजप आमदारांचे निधन झाले. त्यामुळे त्याठिकाणी पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला. या निवडणुका २७ फेब्रवारी रोजी होणार आहे.
म्हणजेच जानेवारी महिन्यात विधान परिषद तर फेब्रवारी महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. आता या निवडणुकीसाठी भाजपला राष्ट्रवादीची गरज पडणार आहे. परंतु भाजपचा इतिहास पहिल्यास राष्ट्र्वादी काँग्रेस भाजपला मदत करणार का? हा प्रश्न आहे. यामुळे या निवडणुका बिनविरोध होणार की भाजप व महाविकास आघाडी म्हणजेच राष्ट्रवादी सामना रंगणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
राज्यातील एखाद्या पक्षाच्या आमदाराचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणाला उमेदवारी दिल्यास ती बिनविरोध करावी, असे संकेत आहे. त्यामुळेच अंधेरीतील पोटनिवडणुकीत उमेदवारी देऊ नये, अशी विनंती शरद पवार यांनी भाजपला केली. यावेळी आपला उमेदवार निवडून येण्याची खात्री नसल्यामुळे भाजपने मुरजी पटेल यांना निवडणूक रिंगणातून माघार घेण्यास लावली. पवारांची विनंती आपण मान्य केल्याचे दाखवून दिले. आता पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे.
तसेच पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं ही याच महिन्यात निधन झाले आहे.या दोन जागांवर विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. लक्ष्मण जगताप हे पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यांनी नंतर भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे चिंचवडची जागा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीनेही त्याला महत्त्व आहे.
भाजपने काय केले देगलूर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार रावसाहेब अंतापूरकर आणि पंढरपूर कवठेमहाकांळचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. भाजपने आपले उमेदवार देत या निवडणुकीत चुरस निर्माण केली.पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडे यांचा विजय झाला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भागीरथ भालके यांचा पराभव केला आहे.राष्ट्रवादी ही बाब लक्षात घेऊन निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, असे बोलले जात आहे.
अंधेरीचे उदाहरण अंधेरीतील पोटनिवडणुकीत उमेदवारी देऊ नये, अशी विनंती शरद पवार यांनी भाजपला केली. यावेळी आपला उमेदवार निवडून येण्याची खात्री नसल्यामुळे भाजपने मुरजी पटेल यांना निवडणूक रिंगणातून माघार घेण्यास लावली. पवारांची विनंती आपण मान्य केल्याचे दाखवून दिले. आता पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. तसेच पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं ही याच महिन्यात निधन झाले आहे.या दोन जागांवर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.