Sidhu Moose Wala case : सिद्धू मुसेवालाला गोळ्या घालणाऱ्या शूटर्समध्ये पुण्यातले दोघे! कोण आहेत? वाचा…

संतोष जाधव हा मंचरचा सराईत गुन्हेगार ओंकार बाणखेले खुनाचा आरोपी आहे. हत्येनंतर पुणे क्राइम ब्रांच संतोषच्या शोधात आहे. सूर्य उगवताच तुला संपवून टाकेन, अशी ओंकारला धमकी त्याने दिली होती.

Sidhu Moose Wala case : सिद्धू मुसेवालाला गोळ्या घालणाऱ्या शूटर्समध्ये पुण्यातले दोघे! कोण आहेत? वाचा...
संतोष जाधव/सौरव महाकाळ मारेकरी, चौकशीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 12:53 PM

पुणे : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) याला गोळ्या मारणाऱ्या शार्प शूटर्सची ओळख पटली आहे. या शूटर्सचे फोटो हाती लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे दोन शूटर्स हे महाराष्ट्रातील पुणे शहरातील आहेत. संतोष जाधव आणि सौरव महाकाळ अशी या आरोपींची नावे आहेत. दोघेही आरोपी पुण्यातील रहिवासी आहेत. मुसेवालाची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शूटर्स (Shooters) पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते. 2 महाराष्ट्रातले, 2 हरयाणातले आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता. आता पुण्यातल्या शूटर्समधील संतोष जाधव हा तर खुनातील आरोपी असल्याचे समोर आले आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची 29 मेला भरदिवसा हत्या (Shot dead) करण्यात आली आहे. त्याच्यावर मनसा येथील जवाहरके गावात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुसेवाला याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याचे दोन सहकारी जखमी झाले.

कोण आहे संतोष जाधव?

संतोष जाधव हा मंचरचा सराईत गुन्हेगार ओंकार बाणखेले खुनाचा आरोपी आहे. हत्येनंतर पुणे क्राइम ब्रांच संतोषच्या शोधात आहे. सूर्य उगवताच तुला संपवून टाकेन, अशी ओंकारला धमकी त्याने दिली होती. तसेच संतोष जाधव हा लॉरेन्स बिष्णोईच्या गँगचा सदस्य असल्याचे समोर आले आहे. सिद्धू मुसावालाच्या हत्येत सहभागी असलेल्या आठपैकी दोन शूटर पुण्यातले आहेत. त्यात सौरव महाकाळ याच्यासह संतोष जाधव याचाही समावेश आहे.

शूटर्सचे पुणे कनेक्शन

ओंकार बाणखेले हत्याप्रकरण काय?

25 वर्षांचा मंचरमधील सराईत गुन्हेगार ओंकारची 1 ऑगस्ट 2021ला हत्या करण्यात आली. या हत्येआधी संतोष जाधव याने फेसबुकवर पोस्ट टाकली होती. सूर्य उगवण्याआधी तुला संपवतो, असे स्टेटस सोशल मीडियावर संतोषने टाकले होता. त्याला ओंकारने उत्तरही दिले होते. या कारणावरून ओंकारची भरदिवसा गोळी घालून हत्या करण्यात आली होती. बाइकवरून येऊन त्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी 9 पैकी सात जणांना अटक केली होती. तर दोन आरोपी फरार होते. फरार आरोपींमध्ये संतोष जाधव आणि पवन थोरात यांचा समावेश होता.

हे सुद्धा वाचा

काय प्रकरण?

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची भरदिवसा हत्या करण्यात आली. नुकतीच मुसेवाला याची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने कमी होती. सुरक्षा रक्षकांची कमी करून ती दोनवर आणली होती. त्यानंतरच त्याच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला, ज्यात मारेकऱ्यांनी मुसेवालाच्या शरीराची चाळण केली होती. त्याच्यावर सुमारे दोन डझन गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबारनंतर पंजाबमधील मानसा येथे सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.