Shiv Sena : मावळ तालुक्यातील शिवसेनेचा संघर्ष शिगेला, सोशल मीडियावर मेसेज टाकणे भोवले, मच्छिंद्र खराडेंना लोणावळा ग्रामीण पोलिसांची नोटीस

मेसेज मच्छिंद्र खराडे यांनी शिवसैनिकांच्या गृपवर टाकला. यात आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले होते. त्यामुळं लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खराडेंना नोटीस पाठविली आहे.

Shiv Sena : मावळ तालुक्यातील शिवसेनेचा संघर्ष शिगेला, सोशल मीडियावर मेसेज टाकणे भोवले, मच्छिंद्र खराडेंना लोणावळा ग्रामीण पोलिसांची नोटीस
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 9:56 PM

पुणे : मावळचे खासदार श्रीरंग बारणेंनी मुख्यमंत्री शिंदे गटात दाखल झाले. त्यानंतर मावळ तालुक्यातील शिवसेनेत संघर्ष निर्माण झालाय. उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख मच्छिन्द्र खराडेंनी (Machindra Kharade) मावळ लोकप्रतिनिधी (People’s Representative) आणि त्याचे कार्यकर्ते यांना उद्देशून एक भला मोठा मेसेज व्हाट्सअँप ग्रुपवर टाकला होता. त्यात गद्दार आणि अन्य शब्दाचा वापर केला होता. हा मजकुर कट्टर शिवसैनिकांच्या व्हाट्सअँप ग्रुपवर एकनाथ शिंदे गटाला उद्देशून टाकलेला होता. हा मेसेज टाकणे मच्छिंद्र खराडेंना भोवला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी (Lonavada Rural Police) सीआरपीसी 149 प्रमाणे खराडेंना नोटीस धाडली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांची नोटीस

शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात सहभागी झालेत. त्यात मावळचे खासदार श्रीरंग बारणेंचा समावेश होता. त्यानंतर बारणे व त्यांच्या कार्यकर्त्यांना गद्दार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा मेसेज मच्छिंद्र खराडे यांनी शिवसैनिकांच्या गृपवर टाकला. यात आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले होते. त्यामुळं लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खराडेंना नोटीस पाठविली आहे. मेसेजमध्ये होते की, गद्दार लोकप्रतिनिधी डोक्यावर बसविल्यामुळं त्यांनी शेण खाल्ले. कडवट कट्टर हे शब्द मला चांगलेच माहीत आहेत. गटबाजी शिवसैनिक खपवून घेणार नाही.

गद्दार शब्दाचा वापर करणे भोवले

पिंपरी-चिंचवड, मावळ आणि पनवेल, उरण, खालापूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश मावळ लोकसभा मतदारसंघात होतो. खासदार बारणे हे या भागाचे प्रतिनिधित्व करतात. ते गेल्या दोन वेळा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. असे असतांना त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गद्दार म्हणण्यात आलं. शिवाय आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला. या विरोधात पोलिसांनी मच्छिंद्र खराडे यांना नोटीस पाठविली आहे.

हे सुद्धा वाचा

नोटिसीत नेमकं काय

आपण मावळ तालुक्यातील कट्टर शिवसैनिक या व्हॉट्सअप गृपवर प्रक्षोभक मेसेज पाठविला आहे. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपणाकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होऊ नये, याची काळजी घ्यावी. यापुढं तुमच्याकडून अशाप्रकारचे कृत्य झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. हा नोटीस तुमच्याविरोधात पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.