सुप्रिया सुळे यांचं मटण खाऊन देवदर्शन, शिवसेना नेत्याचा मोठा आरोप; पुरावाच दिला
शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवरील देवदर्शनाचे चार फोटो शेअर केले आहेत. तसेच हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना त्यावर कमेंट केली आहे.
पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे सध्या एका नव्या वादात अडकल्या आहेत. त्यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. शिवसेनेचे माजी आमदार, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी हा गंभीर आरोप केला आहे. सुप्रिया सुळे यांच्या या कृतीमुळे भावना दुखावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओही शेअर केला आहे. तसेच देवदर्शन घेतानाचे फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांनी त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
खासदार सुप्रिया सुळे यांनी काल मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असा गंभीर आरोप शिवसेनचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचे मटण थाळी खातानाचे फोटो फेसबुकवर पोस्ट करत केली टीका. सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये मटण खाल्लं आणि नंतर देवदर्शन केलं. सुप्रिया सुळे यांनी महादेव आणि सासवडला सोपणकाक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असं शिवतारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या देवदर्शनावरून नवा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोस्टमध्ये काय म्हटलंय
शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवरील देवदर्शनाचे चार फोटो शेअर केले आहेत. तसेच हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना त्यावर कमेंट केली आहे. आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला ||, अशी खोचक टीका शिवतारे यांनी केली आहे.
फोटो आणि व्हिडिओत काय?
या फोटोत सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील वडकी येथील महादेव मंदिराच्या बांधकामाची पाहणी करताना दिसत आहेत. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर त्या ग्रामस्थांना संबोधित करतानाही दिसत आहेत. सासवडला त्या संत सोपानकाकांचेही दर्शन घेताना दिसत आहेत. तर व्हिडीओत एका हॉटेलात त्या मटण थाळीवर चर्चा करताना दिसत आहे. तसेच मी हीच थाळी खालल्याचं कार्यकर्त्यांना सांगताना दिसत आहेत.