Rohit Pawar : रोहित पवारांनी गौतम अदानींचं विमानतळावर स्वागतही केलं अन् सारथ्यही; बारामतीत सायन्स सेंटरचं आज उद्घाटन

कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात हे सायन्स पार्क आहे. या सायन्स पार्कच्या उद्घाटनानिमित्ताने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनदेखील होत आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये 36 जिल्ह्यातील 250 विविध वैज्ञानिक प्रकल्प सहभागी झालेत. राज्यभरातील 127 शाळांनादेखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले आहे.

Rohit Pawar : रोहित पवारांनी गौतम अदानींचं विमानतळावर स्वागतही केलं अन् सारथ्यही; बारामतीत सायन्स सेंटरचं आज उद्घाटन
गौतम अदानींचं स्वागत अन् सारथ्य रोहित पवारांनी केलंImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 11:07 AM

बारामती, पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या हस्ते सायन्स सेंटरचे उद्घाटन बारामतीत होत आहे. यासाठी गौतम अदानी बारामतीत दाखल झाले. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) स्वत: अदानींच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते. त्यांच्या गाडीचे सारथ्य रोहित पवार यांनी केले. सायन्स सेंटरच्या उद्घाटनासाठी अदानी आणि पवार एकत्र आले आहेत. राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, टाटा ट्रस्ट आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे (Science and Innovation Activity Center) उद्घाटन आज होत आहे. त्यानिमित्त रोहित पवार, शरद पवार तसेच गौतम अदानी एकत्र आले आहेत. शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित या कार्यक्रमाचे उद्घघाटन होणार आहे.

विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी

या सायन्स पार्कमध्ये मुलांच्या बौद्धिक कौशल्य व वैज्ञानिक जागृती वाढीसाठी वेगवेगळे प्रकल्प असणार आहेत. यानिमित्ताने वेगवेगळ्या तज्ज्ञ व्यक्तींचे फन सायन्स शो, स्टँडअप कॉमेडी, जादूचे प्रयोग, विज्ञान कार्यशाळा, अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी मुलांसाठी असणार आहे. यासाठी राज्यभरातून जवळपास सहा हजार विद्यार्थी तसेच सहाशे शिक्षक यात सहभाही होतील.

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन

कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात हे सायन्स पार्क आहे. या सायन्स पार्कच्या उद्घाटनानिमित्ताने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनदेखील होत आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये 36 जिल्ह्यातील 250 विविध वैज्ञानिक प्रकल्प सहभागी झालेत. राज्यभरातील 127 शाळांनादेखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

रोहित पवारांनी केले सारथ्य

अत्याधुनिक तंत्रज्ञान

या केंद्रात उपलब्ध असणाऱ्या अॅग्रीकल्चरल गॅलरी, फन सायन्स गॅलरी, थ्रीडी थिएटर, व्हर्च्युअल रियालिटी, इनोव्हेशन हब अशा स्वरूपाचे तंत्रज्ञान आगामी काळात येथे पाहायला मिळणार आहे. कोरिया, जपान आणि चीन या देशांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण व्यवस्था आहे. त्यामुळे तेथील तरूण संशोधक ऑटोमोबाईल, टेलिकॉम, होम अप्लायन्सेस या क्षेत्रात उत्तम प्रगती करत आहेत. या सेंटमधून अशाप्रकारच्या अत्याधुनिक बाबी विद्यार्थ्यांना शिकता येणार आहेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.