Pune water supply : पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद; कोणत्या भागात पाणी नाही? वाचा सविस्तर…

पाणीपुरवठा बंद असणाऱ्या भागात पर्वती जलकेंद्र विभाग, लष्कर विभाग, चतु:श्रृंगी -एस.एन.डी.टी - वारजे जलकेंद्र परिसर, नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपिंग भाग आदी विभाग येतात. त्यामुळे नागरिकांना बुधवारी पुरेसा पाण्याचा साठा (Water storage) करावा लागणार आहे. तर पाणीही जपून वापरावे लागणार आहे.

Pune water supply : पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद; कोणत्या भागात पाणी नाही? वाचा सविस्तर...
पुणे पाणीपुरवठा (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 4:47 PM

पुणे : देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव पुण्यातील पाणीपुरवठा (Pune water supply) गुरुवारी बंद करण्यात येणार आहे. पुण्यातील विविध भागांत हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पर्वती, लष्कर, एसएनडीटी, वारजे, होळकर जलकेंद्र येथे विद्युत आणि स्थापत्य विषयक देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा गुरूवार (ता. 26) बंद असणार आहे. शुक्रवारी (ता. 27) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे (Water supply department) देण्यात आली आहे. पाणीपुरवठा बंद असणाऱ्या भागात पर्वती जलकेंद्र विभाग, लष्कर विभाग, चतु:श्रृंगी -एस.एन.डी.टी – वारजे जलकेंद्र परिसर, नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपिंग भाग आदी विभाग येतात. त्यामुळे नागरिकांना बुधवारी पुरेसा पाण्याचा साठा (Water storage) करावा लागणार आहे. तर पाणीही जपून वापरावे लागणार आहे.

पाणीपुरवठा बंद असलेला परिसर

पर्वती जलकेंद्र विभाग म्हणजेच पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपिंग

अंतर्गत शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे क्रमांक 42, 46 (कोंढवा खुर्द) इत्यादी परिसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.

लष्कर जलकेंद्र पंपिंग

या भागांतर्गत लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी.

हे सुद्धा वाचा

चतु:श्रृंगी-एस.एन.डी.टी. – वारजे जलकेंद्र परिसर

याअंतर्गत भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रस्ता परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर, रामनगर, कर्वेरोड परिसर, एरंडवणा, कोथरूड, डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परंमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकातनाका परिसर, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलीस लाइन, संगमवाडी, भांडारकर रोड इत्यादी.

नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपिंग भाग

याअंतर्गत मुळा रोड, खडकी, एमइएस, एचइ फॅक्टरी, हरीगंगा सोसायटी इत्यादी.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.