द्राक्ष पिकाबाबत शरद पवार यांचा राज्य सरकारला सल्ला; म्हणाले, कमीत कमी इतके टक्के अनुदान द्या…
Sharad Pawar on Grape Manufacturer Council : पुण्यात भरली द्राक्ष परिषद; शरद पवारांच्या हस्ते द्राक्ष प्रदर्शनाचं उद्घाटन; संबोधित करताना शरद पवार म्हणाले सरकारने अनुदान दिलं पाहिजे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेचंही कौतुक केलं. म्हणाले...
पुणे | 27 ऑगस्ट 2023 : पुण्यात आज द्राक्ष परिषदेचं आयोजन करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे द्राक्ष परिषद भरवण्यात आली आहे. या द्राक्ष परिषेदला देशाचे माजी कृषीमंत्री, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हजेरी लावली. शरद पवारांच्या हस्ते द्राक्ष प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. त्यांनी या द्राक्ष प्रदर्शनाची पाहणीही केली. यावेळी शरद पवार यांनी द्राक्ष बागायतदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारला सल्ला दिला. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही अनुदान मिळालं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.
राज्य सरकारने आढावा घेतला पाहिजे. एकुण क्षेत्र किती आणि पीक किती आहे. त्यांनतर अनेक कामे करता येतील. पावसाने या पिकाच नुकसान होत. त्याचा सुध्दा आढावा सरकारनं घेतला पाहिजे. अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावं लागेल. राज्य सरकारनं द्राक्ष पिकाचं नुकसान झाल्यावर यावर कमीत कमी 50 टक्के अनुदान देण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.
राज्यात आणि देशात अनेक पिकांच्या संघटना आहेत. उत्तरेकडे सफरचंद पिकाची संघटना आहे. दक्षिणेत नारळाची संघटना आहे. शेतीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी देखील अनेक संघटना अनेक राज्यात आहेत.पण मला सांगताना आनंद होतो की, आपली एकमेव संघटना आहे की60 वर्षपसून आपणं भेटतो. आपल्या अडचणी नवे शोध केंद्र आणि राज्य सरकारला सांगतो. संशोधनासाठी आपली संघटना सतत जागरूक असते. तुम्ही हे टिकवून ठेवलं आहे, असं म्हणत शरद पवारांनी या द्राक्ष परिषदेचं कौतुक केलं.
द्राक्ष उत्पादक शेतकरी हा अतिशय कष्टाळू आहे. त्यामुळे त्याचं जीवनमान देखील सुधारलं आहे. तुमच्या कष्टाला आणि संघटनेला तोड नाही. 1960 साली बारामतीत या संघटनेचा जन्म झाला. काही ठराविक लोकं एकत्र येत याची स्थापना करण्यात आली. अनेक लोक अनेक संस्थेत काम करत होते. पूर्वी नवीन वाण भेटत नव्हतं आणि यासाठी अशा अनेक अडचणी सोडवण्यासाठी या संस्थेचा निर्णय झाला. राज्यातील अनेक ठिकाणहून लोकं एकत्र आले. 35 हजार आपले सभासद आहेत. केंद्र राज्य शासनाचे धोरण आणि संशोधन करण्यासाठी ही संस्था महत्वाची आहे, असंही शरद पवार म्हणाले.