मुक्ता टिळक यांच्यासोबतची ‘ती’ आठवण सांगत एकनाथ शिंदे भावुक, म्हणाले….

दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आजारी असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना जे सांगितलं ते ऐकून एकनाथ शिंदे आश्चर्यचकीत झालेले. त्याच प्रसंगाची माहिती एकनाथ शिंदेंनी आज दिली.

मुक्ता टिळक यांच्यासोबतची 'ती' आठवण सांगत एकनाथ शिंदे भावुक, म्हणाले....
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 5:39 PM

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज कसबा पोटनिवडणुकीच्या (Kasba by-election) प्रचारासाठी पुण्यात (Pune) दाखल झालेत. त्यांच्या नेतृत्वात आज भाजपचा रोड शो आयोजित करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी रोड शोमध्ये सहभागी झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्यासोबतची एक आठवण शेअर केली. मुक्ता टिळक आजारी होत्या. त्यांच्यावर अनेक दिवस उपचार करण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्यात आले. पण तरीही त्यांचं निधन झालं. मुक्ता टिळक आजारी असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना जे सांगितलं ते ऐकून एकनाथ शिंदे आश्चर्यचकीत झालेले. कारण आजारी असताना मुक्ता यांनी त्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न एकनाथ शिंदे यांना सांगितले होते.

“ही पोटनिवडणूक दुर्देवाने लागली. या पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण नियतीसमोर आपलं चालत नाही. मला आठवतं, मुक्ताताईंच्या घरी मी एकदा गेलो होते. त्या आजारी होत्या. पण तरीसुद्धा त्यांनी या भागातील प्रश्न मुख्यमंत्री म्हणून माझ्यासमोर मांडले”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“हा मतदारसंघ भाजप आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघातून खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वातून भाजपचा उमेदवार निवडून येतोय. म्हणून निष्ठा काय असते ते दाखवून देण्याचं काम मुक्ता ताई यांनी देखील केलं. कारण ज्यावेळेस सत्ता स्थापन करत होतो तेव्हा मतदानाला मुक्ताताई आजारी असताना आल्या होत्या”, अशी देखील आठवण त्यांनी काढली.

हे सुद्धा वाचा

‘गिरीश बापट आजारी असताना प्रचारात सहभागी’

“आज आपण गिरीश बापट यांना पाहतो. आम्ही बापट साहेबांना सांगितलं की, तुम्ही येऊ नका. तुमचे आशीर्वाद फक्त हेमंत रासणे यांच्या पाठीमागे असूद्या. पण कार्यकर्ता काही ऐकत नाही. त्यांच्यातला कार्यकर्ताने त्यांना स्वस्थ बसू दिलं नाही आणि तेही प्रचारात सहभागी झाले”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून आपल्या लोकांनी आवाहन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवाहन केलं. अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळी आपण ठरवलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पण या निवडणुकीला तसं झालं नाही. त्यांनी ते आवाहन स्वीकारलं तर नाहीच. पण खालच्या पातळीवर प्रचार सुरु आहे. त्याला मतदार 26 तारखेला उत्तर देतील”, असा दावा शिंदेंनी केला.

“खऱ्या अर्थाने त्यांच्याकडून काय अपेक्षा करतील? आपण पाहिलं की, जेव्हा शेतकरी पाणी मागतो त्यावेळेस काय दाखवतात? जाऊदे ते मी बोलत नाही. अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार? अजित पवार कालच्या प्रचारसभेत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घ्यायची असते. रोड शो घ्यायची काय गरज असते? हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता आहे. आज मी बघितलं किती रस्त्यावर उभे होते. विद्यार्थी, कार्यकर्ते भेटले. हा भेटणारा माणूस आहे, तोडं लपून पळणारा माणूस नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.