Monsoon Update : शेतकरी बांधवांनो, मान्सूनचा निरोप आला, तयारीला लागा, पाऊस किती दिवसांत बरसणार?

Monsoon and weather Update : मे महिना आज शेवटचा दिवस. उद्यापासून जून महिना सुरु होणार आहे. यामुळे मान्सूनचे वेध लागले आहे. आता मान्सूनने आगेकूच सुरु केली आहे. राज्यात लवकरच दाखल होणार आहे. परंतु पाऊस पडताच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये...

Monsoon Update : शेतकरी बांधवांनो, मान्सूनचा निरोप आला, तयारीला लागा, पाऊस किती दिवसांत बरसणार?
mansoon
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 8:58 AM

पुणे : मे महिना संपत आला आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला. हा पाऊस म्हणजे वाळवाच्या पावसाला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. वळवाचा पाऊस मान्सून दाखल होण्यापूर्वी आलेला असतो. यामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. आता भारतीय हवामान विभागाने मान्सून संदर्भात चांगली बातमी दिली आहे. मान्सूनने आगेकूच सुरु केली आहे. राज्यात मान्सून लवकरच दाखल होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तयार राहावे, परंतु पाऊस पडताच लगेच पेरणीची घाई करु नये, मान्सून स्थिरावल्यावर पेरणी करावी.

सध्या कुठे आहे मान्सून

हे सुद्धा वाचा

नैऋत्य मान्सूनने आता पश्चिम बंगालच्या दिशेने आगेकूच सुरु केली आहे. आग्नेय BoB, संपूर्ण अंदमान निकोबार बेटे, अंदमान समुद्र,काही भाग पूर्वमध्यचा बंगालचा उपसागराकडे सरकला आहे. दोन दिवसांत मान्सूनची आगेकूच केरळकडे होणार आहे. ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. मान्सूनची प्रगतीला कोणताही अडथळा आला नाही तर १० जून रोजी कोकणात दाखल असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कोकणात मान्सूपूर्व पावसाच्या सरी

कोकणात पुढील दोन दिवसात मान्सून पुर्व पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कोकणात 8 ते 10 जूनपर्यंत मान्सून सक्रीय होण्यार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिलीय. राज्यात 16 जूनपर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होईल अशी माहिती देखील हवामान खात्याकडून देण्यात आलीय. रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सक्रीय होण्याची चाहूल लागलीय, कारण आकाशात काळे ढगांची दाटीवाटी सुरु झालीय. यामुळे मान्सून सक्रीय होण्याचे संकेत कोकणात मिळू लागले आहेत. काळ्या ढगांच्या दाटीवाटीत सध्या कोकणाचं निसर्गाचे रुप सुद्धा बहरून निघालंय.

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये

मान्सून १० जून रोजी महाराष्ट्रात येणार आहे. त्यानंतर 16 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून पोहचणार आहे. मान्सून दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लगेच पेरणी करु नये. मान्सून स्थिरावल्यावर पेरणी करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

नंदूरबारमध्ये शेतकऱ्यांची तयारी

नंदूरबार जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. खरीपपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आला आहेत. मात्र मान्सूनचा आढावा घेतल्यानंतरच पेरणीला सुरुवात करणार असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. खरीप हंगामात सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी पुन्हा केळी आणि पपई पीक घेण्यासाठी शेतीची तयारी केली आहे. परंतु कोरडवाहू शेतकरी पावसाला सुरुवात झाल्यानंतरच पेरणी करणार आहेत. आधीच शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आता सावध भूमिकेत दिसून येत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस, सोयाबीन, मिरची, केळी, पपई या पिकांची लागवड केली जात असते त्यामुळे शेतकरी आता पावसाच्या दमदार सुरुवातीनंतरच पेरणीला सुरुवात करणार आहेत.

हे ही वाचा

Weather : पुणे शहराला ९०० कोटींचे काय मिळणार, ज्यामुळे हवामानाचा बिनचूक अंदाज होणार

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.