Raj Thackeray: बायकोही ज्यांचं ऐकत नाही, तेही राज ठाकरेंवर टीका करताहेत, राजसभेआधीच मनसैनिकांची टोलेबाजी

Raj Thackeray: राज्यभरातून मनसैनिक राज सभेसाठी पुण्यात आले आहेत. पंढरपूरमधून आलेल्या मनसैनिकांनी तर विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

Raj Thackeray: बायकोही ज्यांचं ऐकत नाही, तेही राज ठाकरेंवर टीका करताहेत, राजसभेआधीच मनसैनिकांची टोलेबाजी
बायकोही ज्यांचं ऐकत नाही, तेही राज ठाकरेंवर टीका करताहेत, राजसभेआधीच मनसैनिकांची टोलेबाजीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 10:00 AM

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची थोड्याच वेळात सभा पार पडत आहे. या सभेसाठी मनसैनिकांनी (mns) जय्यत तयारी सुरू केली आहे. राज्यभरातून मनसैनिक या सभेसाठी पुण्यात दाखळ झाले आहेत. इतर सभांसारखी राज यांची ही सभाही अत्यंत मोठी होणार असल्याचं सांगितलं जातं. या सभेतून राज ठाकरे नेमका कुणावर निशाणा साधणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray), एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी, औरंगजेबाची कबर, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह हे राज ठाकरे यांच्या रडावर असतील असं सांगितलं जात आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. मात्र, राज गर्जने आधीच मनसे सैनिकांनी विरोधकांवर टीका करायला सुरुवात केली आहे. बायकोही ज्यांचं ऐकत नाही असे लोक राज ठाकरेंवर टीका करत आहेत, अशी टीका मनसैनिकांनी केली आहे.

राज्यभरातून मनसैनिक राज सभेसाठी पुण्यात आले आहेत. पंढरपूरमधून आलेल्या मनसैनिकांनी तर विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. आम्ही आज राज ठाकरेंना ऐकण्यासाठी पंढरपूरहुन आलो आहोत. राज ठाकरे आज सर्वांचे वाभाडे काढणार आहेत. ज्यांची बायको ऐकत नाही ते पण राज ठाकरेंवर टीका करतायत, त्या सर्वांना आज राज ठाकरे उत्तर देणार आहेत, असं या मनसैनिकांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

हिंदू जननायक… पोस्टरबाजी

दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेसाठी शहरभर मनसेकडून जोरदार पोस्टर्सबाजी करण्यात आली आहे. सभागृहाबाहेरही जोरदार पोस्टरबाजी पाहायला मिळतेय. विशेष म्हणजे या सर्व पोस्टरवर हिंदू जननायक असं लिहिलं आहे. राज ठाकरे यांची प्रतिमा हिंदू जननायक करण्याचा मनसेचा हा प्रयत्न आहे.

राज ठाकरेंसाठी खास गाणं

राज ठाकरेंच्या आजच्या सभेसाठी राज्यभरातून मनसैनिक पुण्यात दाखल होत आहेत. खास राज ठाकरेंना ऐकण्यासाठी राजस्थानावरून कृष्णवीर गुजर हे मनसैनिक आले आहेत. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे आणि कृष्णवीर गुजर यांची अयोध्या दौऱ्यावरून ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. कृष्णवीर गुजर यांनी राज ठाकरेंसाठी खास गाणं तयार केलं आहे.

आधी चार नेते बोलणार

आम्हाला अगदी कमी वेळेत हा हॉल मिळालेला आहे. आम्ही युद्ध पातळीवरती काम करून आज या सभेची संपूर्ण तयारी केली आहे. राज ठाकरेंच्या सभे करता आम्ही 4 ठिकाणांच्या परवानग्या मागितल्या होत्या. त्यापैकी तीन ठिकाणांच्या परवानग्या मिळाल्या होत्या. त्यातील दोन ठिकाणं ही ओपन स्पेसमधली होती आणि एक हे गणेश कला क्रीडा मंच होता. आज राज ठाकरे हे अनेक विषयांवर बोलतील आणि लोकांच्या मनाला भिडेल अशा गोष्टींवर भाष्य करतील. राज ठाकरे यांच्या अगोदर चार नेते हे भाषण करतील, अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी दिली.

पक्षात दुफळी नाही

आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही आहे. वसंत मोरे आजही मनसेत आहे. त्यांनी आरोप केलेले पक्षातील झारीतले शुक्राचार्य कोण आहेत हे आम्हाला सुद्धा माहित नाही. परंतु पक्षात काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा राज साहेबांचा मावळा आहे. हा माझा कार्यकर्ता, तो तुझा कार्यकर्ता असं नसतं. आपण सर्वजण पक्षाच काम करत असतो. कोणाला जर पदावरून पायउतार व्हावं लागत असेल तर तो निर्णय पक्षाचा असतो. आमच्या पक्षामध्ये दुफळी नाही, असंही वागस्कर यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.