Anand Dave: औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला?; आनंद दवे यांचा सवाल

Anand Dave: महाराष्ट्र सरकारने औरंगजेबाची कबर काढूनच टाकावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

Anand Dave: औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला?; आनंद दवे यांचा सवाल
औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला?; आनंद दवे यांचा सवालImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 12:52 PM

पुणे: एमआयएमचे (mim) नेते अकबरुद्दी ओवैसी (Akbaruddin Owaisi)  यांनी औरंगाबाद येथे औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्याने त्यावर आता टीका होऊ लागली आहे. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (anand dave)यांनी थेट औरंगजेबाच्या कबरीलाच आक्षेप घेतला आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला? असा सवाल आनंद दवे यांनी केला आहे. आमच्या शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या, संभाजी राजांना ठार मारणाऱ्या, छत्रपतींच्या पूर्ण परिवारालाच शत्रू समजणाऱ्या, आमच्या दैवतांवर कुऱ्हाड चालवणाऱ्या राज्याच्या सर्वात मोठ्या शत्रूची कबर इथे हवीच कशासाठी? असा सवाल दवे यांनी केला आहे. दवे यांनी हा सवाल केल्याने त्यावर प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजण्याची चिन्हे दिसत आहे. दरम्यान, दवे यांच्या या विधानावर एमआयएमकडून अजून प्रतिक्रिया आली नाही.

आनंद दवे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या पाया पडणे चांगले का वाईट यावर चर्चाच कशी होऊ शकते? कसाब, अफझलगुरु, यासिन मलिक यांचा औरंगजेब हा पूर्वज होता. त्याला या मातीत स्थान देण्याची गरजच नाही. औरंगजेबाच्या कबरीच्या पाया पडणं हे हिंदूंना डिवचण्यासाठीच आहे हे आम्हाला कळत आहे, असं दवे म्हणाले.

aurangzeb tomb

औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला?; आनंद दवे यांचा सवाल

राजकीय पक्ष गप्प का?

पानिपतच्या शत्रूची कबर एकेकाळी मराठ्यांनी फोडली होती, हे कर्तृत्व महाराष्ट्राने लक्षात ठेवावे. मंदिरात इफ्तार झाडणाऱ्याच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांचे नेते आता गप्प का आहेत?, असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारने औरंगजेबाची कबर काढूनच टाकावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा

वाद का सुरू झाला?

एमआयएमन नेते अकबरुद्दीन ओवैसी काल औरंगाबादेत होते. औरंगाबाद दौऱ्यात त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली. तुम्हाला घाबरायाची गरज नाही. जो भी कुत्ता, जैसे भी भोंकता है, उसे भोंकने दो. मी त्यांच्यावर टीका काय करू मी त्यांच्यावर टीका करावी तेवढी त्याची औकात नाही. माझा तर एक खासदार आहे. तर ते तर बेघर आहेत. त्यांना तर घरातून काढून टाकले होते. त्यांच्यावर मी काय बोलू? असा सवाल ओवैसी यांनी केला होता.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.