Pune suicide : नोकरी मिळणार नाही, या भीतीनं पुण्यातल्या उच्चशिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

अक्षय अमोल माटेगावकर असे आत्महत्या (Suicide) केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी अक्षयने एक चिठ्ठी लिहिली असून त्यात मला नोकरी मिळणार नाही, मी तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही, मी माझे आयुष्य संपवत आहे, असा उल्लेख केला आहे.

Pune suicide : नोकरी मिळणार नाही, या भीतीनं पुण्यातल्या उच्चशिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या
अक्षय माटेगावकरImage Credit source: tv9D
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 3:44 PM

पिंपरी चिंचवड : नोकरी मिळणार नाही, या भीतीने उच्चशिक्षित (Educated) तरुणाने आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. पुण्याच्या सुसगावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अक्षय अमोल माटेगावकर असे आत्महत्या (Suicide) केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी अक्षयने एक चिठ्ठी लिहिली असून त्यात मला नोकरी मिळणार नाही, मी तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही, मी माझे आयुष्य संपवत आहे, असा उल्लेख केला आहे. ही चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. अक्षय हा कॉम्प्युटर सायन्सच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. मात्र अचानक त्याने आज आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  ही आत्महत्येची घटना पहाटेच्या सुमारास घडली. हिंजवडी पोलीस (Hinjewadi police) अधिक तपास करीत आहेत.

सिंबायोसिसमध्ये घेत होता शिक्षण

अक्षयने आज पहाटेच्या सुमारास आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. अक्षय आई-बाबा आणि बहिणीसह सुसगाव परिसरात राहतो. अक्षय हा कॉम्प्युटर सायन्सच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तो शिक्षण घेत होता. अचानक त्याने आज आत्महत्या केली, नोकरीचा पर्याय नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मी अपयशी ठरलो आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करू शकलो नाही, असे पत्रात उल्लेख करत अक्षयने आत्महत्या केली. नोकरीच्या भीतीसह आणखी काही कारण आहे का, तो तणावात होता का, या सर्व कारणांचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा

कुटुंबही उच्चशिक्षित

अक्षयचे वडील अमोल माटेगावकर प्रिन्स्टन ब्लूमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. तसेच इंडिया हेडदेखील आहेत. तर आई मीनल माटेगावकर मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग कॉलेज, मुंबई येथे सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या हेड आहेत. तर बहीण आकांक्षा माटेगावकर एमआयटीमध्ये डिझायनिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. उच्चशिक्षित आणि सधन कुटुंब असताना अक्षयने आत्महत्या केल्याने हळहळ आणि आश्चर्यही व्यक्त होत आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.