शिंदे सरकारला सर्वात मोठा झटका, राज ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाविरोधात सूर

गेल्या काही दिवासांपासून राज ठाकरे यांची सत्ताधारी पक्षांसोबतची जवळीक वाढताना दिसत होती. पण राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांना झटका दिला आहे. कारण सत्ताधारी पक्ष हे बारसू रिफायनरी प्रकल्पांसाठी आग्रही आहेत. तर राज ठाकरे यांचे सूर प्रकल्पाविरोधात आहेत.

शिंदे सरकारला सर्वात मोठा झटका, राज ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाविरोधात सूर
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 9:02 PM

रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीत जाहीर सभा पार पडली. राज ठाकरे यांनी कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला अप्रत्यक्षपणे विरोध केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला हा मोठा झटका आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवासांपासून राज ठाकरे यांची सत्ताधारी पक्षांसोबतची जवळीक वाढताना दिसत होती. पण राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांना झटका दिला आहे. कारण सत्ताधारी पक्ष हे बारसू रिफायनरी प्रकल्पांसाठी आग्रही आहेत. “माझी हात जोडून विनंती आहे की जमीन घ्यायला कोणी आलं तर जमीन देऊ नका. व्यापारी लोकप्रतिनिधींना घरी बसवा. तुमचा राग व्यक्त होऊद्यात. आम्हाला विकता ना तुम्ही, बसा घरी. जमिनी विकू नका”, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

“कातळ शिल्पांची युनेस्कोत नोंद आहे. त्यामुळे त्या ठिकाणी प्रकल्प होऊ शकत नाही. कातळ शिल्प बघायला जगभरातील लोकं येतात. कातळ शिल्पाजवळील काही किलोमीटरची जागा वापरता येत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. याशिवाय जमिनी विकू नका, असं आवाहन राज ठाकरे यांनी कोकणवासियांना केलं.

“हे सगळेजण तुम्हाला मुर्ख बनवत आहेत, फसवत आहेत. ही लोकं आजपर्यंत तुम्हाला मुर्ख बनवत आली. अलर्ट राहा. तयारीने या गोष्टींचा विचार करा. हे कधी या प्रदेशाची धुळधान करतील समजणार देखील नाही. सगळ्यांचे व्यापाऱ्याचे हेतू आहेत. या सगळ्या गोष्टींमधून फक्त माझ्या कोकणाला वाचवा ही विनंती करण्यासाठी आज मी इथे तुमच्यासमोर आलो. मी सांगितलेल्या गोष्टींचा आपण गांभीर्याने विचार कराल, एवढंच मी अपेक्षा बाळगतो”, असं राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे काय-काय म्हणाले?

मी नेहमी सांगत आलो ना, तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. मतदानाचा दिवशी जीवंत राहा, म्हणजे झालं, बाकी तुम्हाला मोजतं कोण? आम्ही त्याच त्याच गोष्टींवर कोकण बोलतोय. पण आम्हाला त्या गोष्टीचा राग येत नाही. आम्हाला वाईट वाटत नाही. आज राज ठाकरे बोलून गेला. उद्या विसरुन जाणार आहात. मनाला लागतही नाही की अरे ते मनाला लागेल असा अपमान करत आहेत. पण आम्हाला त्याचं काही नाही.

आज आम्ही इथे भांडतोय, वाद चालू आहेत, प्रकल्प नाणारला होणार की बारसूला होणार? आता नवीन बारसू कुठून आलं? मला वाटलं नाणारचं नाव बदललं आणि बारसू झालं. हे होताहेत कुठून? मला कोकणातल्या लोकांबद्दल आश्चर्य वाटतं. तुमच्या पायाखालून जागा निघून जाते, शंभर एकरची जमीन निघून जाते, पायाखालचे हजारो एकराचे पॅचेस निघून जातात तुम्हाला समजत नाही? कळत नाही कोणीतरी विकत घेत आहे म्हणून? सगळ्या लोकप्रतिनिधींना पहिल्यांदा कळतं की प्रकल्प येत आहेत. ते कवडीमोल भावात तुमच्याकडून जमिनी खिशात घालतात, ज्यावेळी प्रकल्प जाहीर होतो तेव्हा हजारपट मोबदला घेऊन मोकळे होतात. नुसता व्यापार चालू आहे.

नाणारमध्ये प्रकल्प आणणार होते. विरोध झाला, आता नाणारला आणला. माझ्याकडे आज कलेक्टर आले होते, त्यांना विचारलं बारसूला किती जमीन हातात आली? ते म्हणाले 1000 एकर आली. कशी आली? मुंबईहून गणपतीला कोकणाला येता, तेव्हा चर्चा करता तेव्हा तुमची जमीन गेलीय ते समजत नाही? याच लोकप्रतिनिधींचे व्यापारी मित्र तुमच्यासमोर फिरत असतात. कवडीमोल किंमतीत जमिनी विकत घेतात. मग सरकारला बड्या दामात विकतात.

प्रत्येक राज्याला भारतरत्न असतात तसे महाराष्ट्राला आठ आहेत. आता आठवं मिळालं आहे. या आठमधील सहा भारतरत्न ही कोकणातील आहेत. इतका प्रतिभासंपन्न कोकण आहे आणि हे तुम्हाला मुर्ख बनवत आहेत. ज्या शिवछत्रपतींनी सांगितलं होतं की, आपला शत्रू समूद्र मार्गाने येईल आणि आपली जमिनी घेईल आणि राज्य करेल. त्यामुळे महाराजांनी आरमार उभं केलं. कोकणच्या दोन भावांनी शिवछत्रपतींचं आरमार उभं केलं आणि सांभाळलं.

मराठ्यांनी महाराष्ट्राचा भगवा अटकेपार घडवला. पाकिस्तानील किल्ल्यावर भगवा लागला गेला. आम्ही जमीन ताब्यात घेतल्या. ती जमीन ताब्यात घेणं म्हणजे राज्य आहे. अरे तुम्ही तुमच्या पायाखालची जमिनी काढत आहेत आणि अमराठी व्यापाऱ्याला विकत आहात. आपण कोणासाठी जमीन सोडत आहोत, काय करत आहोत याचं भान नाही?  आमच्या जमिनी पायाखाली जात आहेत पण आम्हाला कळत नाहीय की, आम्ही कोणाच्या घशात जमीन घालतोय.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.