Parbhani Municipal Election | परभणी महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर 20 आक्षेप अर्ज दाखल, प्रस्थापितांची झाली ना चक्की!
यंदा एका प्रभागात तीन नगरसेवक अश्या पद्धतीने प्रभाग रचना राहणार आहे. त्यामुळे महापालिकेकडून त्याप्रकारची प्रभागांची रचना या वेळी तयार करण्यात आली आहे. प्रभाग रचनेत महापालिकेकडून मोठे बदल करण्यात आलेत. मात्र, झालेल्या बदलांमुळे अनेकांचे राजकीय समीकरण बदलले, तर काहींचे प्रभाग गायबच झालेत.
परभणी : परभणी महानगरपालिकेच्या (Parbhani Municipal Corporation) प्रभाग रचनेवर 20 आक्षेप अर्ज दाखल झालेत. यावेळी प्रभाग रचनेत महापालिकेकडून मोठा फेर बदल करण्यात आलाय. परभणी महानगरपालिकेकडून येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना निर्धारित करण्यात आली आहे. यंदा एका प्रभागामध्ये तीन नगरसेवक (Corporator) निवडून येणार असणार आहेत. मात्र, प्रभाग रचनेमध्ये झालेल्या बदलांमुळे अनेकांचे राजकीय समीकरण बदलले आहे. 20 जून ही आक्षेप दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळे आणखीन अर्ज (Application) दाखल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 20 आक्षेप अर्ज दाखल करण्यात आले. प्रभाग रचनेमध्ये झालेल्या बदलांमुळे प्रस्थापितांचे देखील गणित बिघडले.
एका प्रभागात तीन नगरसेवक अशा पद्धतीने प्रभाग रचना
यंदा एका प्रभागात तीन नगरसेवक अशा पद्धतीने प्रभाग रचना राहणार आहे. त्यामुळे महापालिकेकडून त्याप्रकारची प्रभागांची रचना या वेळी तयार करण्यात आली. प्रभाग रचनेत महापालिकेकडून मोठे बदल करण्यात आलेत. मात्र, झालेल्या बदलांमुळे अनेकांचे राजकीय समीकरण बदलले, तर काहींचे प्रभाग गायबच झालेत. प्रभाग रचना बदलल्यामुळे इच्छुक खुश आहेत. कारण हीच ते संधी म्हणून इच्छुक जोमाने कामाला लागले आहेत. त्यामुळे ‘कही खुशी कही गम’ असे एकूण चित्र या प्रभाग रचनेवरून निर्माण झाले.
प्रभाग रचनेवर या आहेत हरकती
प्रभाग रचनेवरून हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या मुदतीत मोठ्या प्रमाणात हरकती दाखल केल्या जात आहे. मागील आठ दिवसात तब्बल 20 आक्षेप अर्ज मनपा कार्यालयात दाखल झाले. त्यात वार्ड रचना करताना काही वसाहतींची तोडफोड झाली, काही वसाहती वार्डात समाविष्ट झाल्याच नाहीत, तर काही वसाहतींची नावे आली नाहीत, अशा विविध प्रकारचे आक्षेप घेण्यात आले. विशेष म्हणजे जे अर्ज दाखल करण्यात आले, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी देखील सह्या केल्याचे दिसते आहे. उद्या आक्षेप दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी किती अर्ज दाखल होतात, हेच पाहणे महत्त्वाचे राहणार आहे. एकूणच दाखल करण्यात आलेल्या सर्व आक्षेप आणि हरकती अर्जांवर सुनावणी केली जाणार आहे, त्यानंतरच वॉर्ड रचना अंतिम केली जाईल.