Akola : एक मृतदेह विहिरीत, तर दुसरा दोन किलोमीटरवर, अकोल्यातल्या कापशी गावात नेमकं घडलंय काय?
पातूर पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. हे दोन्ही मृतदेह पुरुषांचे आहेत. पण, तीन-चार दिवासांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा. त्यांच संपूर्ण शरीर कुजलेल्या अवस्थेत सापडले.
अकोला : जिल्ह्यातल्या कापशी गावालगत 2 मृतदेह सापडलेत. गावालगत असलेल्या कापशी (Kapashi) तलावात एक मृतदेह तरंगताना सापडला. तर दुसरा मृतदेह हा तलावापासून 2 किलोमीटर असलेल्या शेतातील विहिरीत सापडला. दोन्हीही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. हे मृतदेह 3 ते 4 दिवसाचे असल्याचा अंदाज वर्तवला जातं आहे. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली नाही. घटनास्थळी पातूर पोलीस (Pathur Police) पोहचले आहेत. यात घातपात झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पण नेमकं कारण काय आहे हे पोलीस तपासानंतर समोर येईलच. एक मृतदेह तलावात सापडला, तर दुसरा मृतदेह विहिरीत सापडला. त्यामुळं कुणीतरी खून करून हे मृतदेह फेकले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पण, सध्यातरी याबाबत काहीही ठोस सांगता येणार नसल्याचं पातूरचे पोलीस निरीक्षक (Police Inspector) म्हणाले.
दोन्ही मृतदेह सडलेल्या अवस्थेत
पातूर पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. हे दोन्ही मृतदेह पुरुषांचे आहेत. पण, तीन-चार दिवासांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा. त्यांच संपूर्ण शरीर कुजलेल्या अवस्थेत सापडले. त्यामुळं मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली. आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये कुठे मिसिंग तक्रार आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. हे दोन्ही मृतदेह स्थानिक आहेत की, बाहेरून कुणी मारून फेकलं, हे तपासानंतरच स्पष्ट होईल.
तलावात मृतदेह फेकला असावा
दोन्ही मृतदेह कुठले आहेत हे अद्याप माहीत नाही. कापशी तलावाचं पाणी आधी अकोल्याला यायचं. पण, आता या तलावाचं पाणी शहराला पुरविले जात नाही. दुसरीकडून शहराला पाणी पुरवठा होता. या तलावाचे पाणी सध्या वापरलं जात नाही. इंग्रजकालीन असा हा तलाव आहे. तलावाकडं फारसे कुणी जात नसल्यानं तिकडं मृतदेह मारून कुणीतरी फेकला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.