Gadchiroli Murder: पोलीस भरतीने नक्षलवादी बिथरले, खबऱ्याच्या संशयातून भामरागडमध्ये लकी कुमारची हत्या, धारदार शस्त्राने हल्ला

लकी कुमार घरी रात्री झोपेत असताना सात ते आठ बंदूकधारी नक्षलवाद्यांनी गावात प्रवेश केला. लकी कुमारला झोपेतून उठवून जंगलात नेले. गावाच्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली.

Gadchiroli Murder: पोलीस भरतीने नक्षलवादी बिथरले, खबऱ्याच्या संशयातून भामरागडमध्ये लकी कुमारची हत्या, धारदार शस्त्राने हल्ला
खबऱ्याच्या संशयातून भामरागडमध्ये लकी कुमारची हत्या
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 11:05 AM

गडचिरोली : जिल्ह्यात 19 जून रोजी पोलीस भरती घेण्यात आली. जिल्हा पोलीस दलातर्फे (District Police Force) 136 शिपाई पदासाठी परीक्षा झाली. यासाठी सुमारे 17 हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. पोलीस भरतीसाठी जिल्ह्यातले युवक वळलेत. हा नक्षलवादी चळवळीसाठी (Naxalite Movement) मोठा धक्का मानला जात आहे. युवक पोलीस झाले, तर आपली दहशत कशी कायम राहील, अशी भीती नक्षलवाद्यांना वाटली. त्यामुळं त्यांनी पुन्हा दशहत सुरू केली आहे. भामरागड तालुक्यातील मलमपाडूर गावात काल रात्री लकी कुमार (Lucky Kumar) नावाच्या युवकाचे बंदुकीच्या धाकावर अपहरण करण्यात आले. त्यानंतर रात्री धारदार शस्त्राने त्याची हत्या करण्यात आली. लकी कुमार हा पोलीस खबऱ्या असल्याचा नक्षलवाद्यांचा संशय होता. यातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येतंय. एकंदरित पोलीसांचं वाढत प्रस्थ पाहून नक्षलवाद्यांना आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी ही हत्या केली असावी, असं सांगितलं जातंय.

अशी घडली घटना

गडचिरोली जिल्ह्यात सध्या नक्षलवाद्यांच्या वावर सुरूच आहे. काल नक्षलवादी आणि एका पोलीस खबरी याची हत्या करून पुन्हा दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न भामरागड तालुक्यात केला. लकी कुमार ओक्सा या मृत व्यक्तीचे नाव आहे. खबऱ्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी या इसमाची हत्या धारदार शस्त्राने केली. सदर घटना भामरागड तालुक्यातील मलमपाडूर या गावात घडली. लकी कुमार घरी रात्री झोपेत असताना सात ते आठ बंदूकधारी नक्षलवाद्यांनी गावात प्रवेश केला. लकी कुमारला झोपेतून उठवून जंगलात नेले. गावाच्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली. सदर घटना भामरागड तालुका मुख्यालयाशी 12 किलोमीटर अंतरावर घडली. आज सकाळी पोलिसांनी घटनास्थळाची माहिती घेतली.

पोलीस भरतीत युवकांचा सहभाग

या काही काळात छत्तीसगड राज्यातून नक्षलवादी छत्तीसगड सीमावर्ती भागात असलेल्या भामरागड एटापल्ली कुरखेडा या तीन तालुक्यातील भागातील नागरिकांना किंवा पोलीस खबर यांना टार्गेट करीत असल्याचे दिसत आहे. गडचिरोली पोलीस मुख्यालयाकडून पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी नक्षलविरोधी पोलीस अभियान राबविले जात असतात. अंकित गोयल यांच्या प्रयत्नाने दादा लोरा खिडकीच्या माध्यमातूनही जनजागृती करून गडचिरोलीवासियांना अनेक योजनांचा फायदा मिळवून दिला. नक्षलवाद्यांचे अनेक संपर्क मोडले आहेत. सध्या गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरती सुरू असताना मोठ्या उत्साहात मोठ्या संख्येत नक्षलग्रस्त भागातील युवक ही पोलीस भरती सहभागी झाले. या रागावरून नक्षलवाद्यांनी आपली दहशत निर्माण करण्यासाठी ही घटना केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.