“राज्याला 10 वर्षापूर्वी असाच भुलभूलय्या लोकांना दाखवला”; बीआरएसच्या सभेवरून ‘या’ नेत्याने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला…

केसीआर यांच्याकडून महाराष्ट्रात सभा घेतल्या गेल्या तरी त्यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचे टीका केली जात आहे. त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, ती आता भाजपची बी टीम आहे का हा निष्कर्ष काढायला अजून अवधी असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्याला 10 वर्षापूर्वी असाच भुलभूलय्या लोकांना दाखवला; बीआरएसच्या सभेवरून 'या' नेत्याने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला...
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 6:38 PM

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून बीआरएस पक्षाच्या राज्यात काही ठिकाणी सभा होत असल्याने आता म यांच्या राजकारणाविषयी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले गेले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाच्या सध्या अनेक ठिकाणी जोरदार सभा होत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची आमिषं दाखवून लोकांना प्रभावित करण्याचे कामही या पक्षाकडून केले जात आहे. त्यामुळे आता बीआरएस पक्षाच्या राज्यातील राजकीय वाटचालीवरून महाराष्ट्रातील नेत्यांनी बीआरएसवरून भाजपवर आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यासह देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी केसीआर यांच्या सभेविषयी बोलताना सांगितले की, केसीआर हे जी मांडणी करत आहेत तो भुलभुलय्या आहे का हे सर्वसामान्यांनी तपासून बघण्याची गरज असल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

फक्त आमिष दाखवण्याचे काम

यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधारी आणि केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ज्या ज्यावेळी भाजप सत्तेत आले आहे. त्या त्यावेळी लोकांना फक्त आमिष दाखवण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

वेगवेगळ्या प्रकारचे आमिष

राजू शेट्टी यांनी केसीआर यांच्याविषयी बोलताना म्हटले आहे की, केसीआर यांच्याकडून ज्या प्रकारे लोकांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यांच्या प्रमाणेच भाजप सत्तेत येण्यापूर्वी दाखवण्यात आला होता. मात्र दहा वर्षांपूर्वी असाच भुलभुलय्या लोकांना दाखवला गेला असल्याची खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली. ज्या प्रमाणे सध्या केसीआर आपल्या सभेतून लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवतात त्याच प्रमाणे आता बीआरएसकडूही दाखवण्यात येत आहे.

बीआरएसच्या घोषणा

ज्या प्रमाणे अच्छे दिन, गुजरात मॉडेल असं सांगितलं गेलं आहे. त्याच प्रमाणे हे सगळं फेल होतं ती आभासी प्रतिमा होती असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. त्यामुळे राज्यातील जनता आता पुन्हा बीआरएसच्या घोषणांना आणि आमिषांमुळे लोकांची फसगत होणार नाही याची खात्री सर्वसामान्य लोकांनी घेणे गरजेचे आहे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सभेवर होणारे वारेमाफ

यावेळी त्यांनी होणाऱ्या सभा आणि त्या सभेवर होणारे वारेमाफ खर्च बघून आता आमचे डोळेही दिपतात असा खोचक टोला त्यांनी भाजपबरोबरच बीआरएसला लगावला आहे. यावेळी त्यांनी राजकारण्यांकडे एवढे पैसे येतात कुठून असा प्रतिसवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

खर्च करते कोण

राजू शेट्टी यांनी आपल्या सभा घेताना कशा प्रकारची कसरत करावी लागते, ते सांगताना ते म्हणाले की, आम्हाला सभा घेण्यासाठी झोळी घेऊन भीक मागावी लागते, मात्र सत्ताधाऱ्यांना एवढ्या मोठ्या सभा घेताना आणि त्याचा खर्च करते कोण असा सवालही त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना उपस्थित केला.

बीआरएस भाजपची बी टीम

केसीआर यांच्याकडून महाराष्ट्रात सभा घेतल्या गेल्या तरी त्यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचे टीका केली जात आहे. त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, ती आता भाजपची बी टीम आहे का हा निष्कर्ष काढायला अजून अवधी असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना आताच बी टीम म्हणणे योग्य नाही कारण त्यांच्यासोबत कोण आणि कसं काम करतो हे पाहावे लागेल असंही त्यांनी यावेळी म्हटले.

शेट्टी यांना मोठी ऑफर

राजू शेट्टी यांनी सांगितले की, त्यांनी मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे ऑफर दिले होते, हजारो कोटीचं बजेट ही निवडणुकीसाठी देतो म्हणाले होते. मात्र मला कोणत्याही पक्षात जायचं नाही हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षाकडून मला कोणतही बोलावण आलं नाही मात्र ते किती गांभीर्याने होतं हे तपासले पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.