“‘त्या’ जाहिरातीमध्ये पांडूरंगाचा अपमान”; काँग्रेसच्या नेत्याचा जाहिरातीवरून पुन्हा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील असंवैधानिक सरकारने वारकऱ्यांवर लाठी हल्ला करण्यात आला. गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात वारकरी संप्रदायावर कोणत्याही सरकारने या प्रकारचा अन्याय करण्याचे पाप केले नव्हते.
सांगली : मागील काही दिवसांपासून जाहिरातीवरून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून हल्लाबोल केला जात आहे. एकीकडे जाहिरातीवरुन टीका केली जात असतानाच आता पुन्हा एकदा आणखी एका जाहिरातीवरून विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपूरमध्ये लावण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पांडुरंगाचा अपमान केला असल्याचा ठपका ठेऊन सरकारवर त्यांनी गंभीर आरोपही केले आहेत. यावेळी काँग्रेसने म्हटले आहे की, पंढरपूरमध्ये लावण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पांडुरंगाचा अपमान करण्यात आला आह.
काँग्रेसने ज्या प्रमाणे सध्याच्या जाहिरातीवरून पांडुरंगाचा अपमान तर केला आहेच, मात्र हे सरकारही जाहिरातीचेच सरकार असल्याचा ठपका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
महापुरुषांचा अपमान
राज्य सरकारकडून यावेळी पंढरपूर यात्रेनिमित्त लावण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये अपमान केला असून असे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या सरकारकडून सातत्याने महापुरुषांचा अपमान करण्याचा यांनी विडाच उचलला असल्याचा ठपकाही त्यांनी यावेळी ठेवला आहे.
हे प्रकार थांबवावे
कधी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जातो तर कधी ज्या ज्या महापुरुषांनी महाराष्ट्राबरोबरच देशासमोर आदर्श घालून दिला आहे. त्यांचा अपमानही या सरकारच्या मंत्र्यांकडून केला जात आहे. त्यामुळे या सरकारने असे होणारे प्रकारे थांबवावेत असा इशाराच काँग्रेसने दिला आहे.
धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकार
तर नाना पटोले यांनी चित्रपटाचा संदर्भ देत त्यातूनही धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकार भाजपकडूने केले जात आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. अदिपुरुष चित्रपटामध्येही बजरंग बलीचा अपमानाचे करण्याचे पाप भाजपाकडून करण्यात आले आहे.आता त्यांच्या सोबत बजरंग बाली नाही, श्रीरा देखील नाही त्यामुळे लोकांच्या भावना दुखवण्याचे काम हे सरकार करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
वारकऱ्यांवर लाठी हल्ला
राज्यातील असंवैधानिक सरकारने वारकऱ्यांवर लाठी हल्ला करण्यात आला. गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात वारकरी संप्रदायावर कोणत्याही सरकारने या प्रकारचा अन्याय करण्याचे पाप केले नव्हते. त्यामुळे या सरकारने असे प्रकार थांबवावेत नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.