महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांचे काय झाले? शिंदे गटाचाही वापर होणार; भास्कर जाधव यांचा दावा
आपल्या पक्षाला जनाधार मिळणार का? याबाबत ते अंदाज घेत आहेत. त्यामुळे राज ठाकरे कुणाच्या कार्यक्रमाला गेले तर त्याबाबत बोलणे चुकीचं आहे. भाजपचा सध्या एक कलमी कार्यक्रम सुरु आहे.
रत्नागिरी: ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाची जोरदार खिल्ली उडवली आहे. महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांचे काय झाले? या दोन नेत्यांच भाजपच्या युतीत स्थान काय? असा सवाल करतानाच जानकर आणि खोतकर यांचं जे झालं तेच शिंदे गटाचं होईल. शिंदे गटाचाही वापर होईल, असा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे. रत्नागिरी येथे मीडियाशी संवाद साधताना भास्कर जाधव यांनी हा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.
12 आमदार यांची मुदत केव्हा संपली? पण अजून निवडणूक नाही. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून कायम ठेवावं. निवडणूक आयोगाने स्वायत्ता राखवी. निवडणूक आयोग सध्या स्वायत्ता राखून काम करत नाही, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.
छोटे पक्ष संपवण्याचा डाव
आपल्या पक्षाला जनाधार मिळणार का? याबाबत ते अंदाज घेत आहेत. त्यामुळे राज ठाकरे कुणाच्या कार्यक्रमाला गेले तर त्याबाबत बोलणे चुकीचं आहे. भाजपचा सध्या एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. देशात छोटे पक्ष शिल्लक न ठेवण्याचं काम भाजप करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
भाजपला सत्तेची नशा
भाजपच्या डोक्यात सध्या सत्तेची नशा आहे. महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांचे काय झाले? शिंदे गटाचाही वापर होणार. भाजप त्यांनाही सोडणार नाही, असं सांगतानाच दापोलीत पुढचा आमदार ठाकरे गटाचाच असणार आहे. हे मी ठरवलं आहे. उद्या दापोलीत ठाकरे गटाचा आमदार निवडून आलेला दिसेल, असा दावाही त्यांनी केला.
वाद नाही, समन्वय आहे
सध्या जे सुरु त्यामुळे भाजपच्या जुन्या नेत्यांना त्रास होतोय. भाजपचे पाप धुवत असताना गंगा देखील मैली होईल, अशी टीका करतानाच जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये वाद नाहीत. आमच्यामध्ये समन्वय आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, भास्कर जाधव यांनी काल पंतप्रधानांच्या मुंबईतील भाषणावर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींवर डोळा आहे. मोदी यांनी स्वतः केंद्र सरकारकडून मुंबई महापालिकेला काय देणार याचं अवाक्षर देखील काढलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारख्या उच्चपदस्थ व्यक्तीने इथे येऊन अशी टीका करणं हे एवढ्या मोठ्या उच्चपदस्थ माणसाला शोभत नाही, असा टोला जाधव यांनी लगावला होता.