Vidarbha flood : सिरोंच्यातील 34 गावांना महापुराचा फटका, 95 गावांमध्ये 7 दिवसांपासून वीज नाही, नागरिकांचा आक्रोश

नागपूरच्या इतवारी भागातील पुरातन हनुमान मंदिर कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Vidarbha flood : सिरोंच्यातील 34 गावांना महापुराचा फटका, 95 गावांमध्ये 7 दिवसांपासून वीज नाही, नागरिकांचा आक्रोश
घरात पाणी शिरल्याने बाहेर काढलेले साहित्य.Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 6:40 PM

गडचिरोली : जिल्ह्यातील पुरामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. मेडीगट्टा धरणामुळे व प्राणहिता व गोदावरी नदीला पूर आल्यामुळे गडचिरोली सिरोंचा (Sironcha) तालुक्यातील 34 गावांमध्ये महापुराचा फटका (flood water) बसला. पुरामुळे नागरिक अस्ताव्यस्त झाले आहेत. गंभीर पूरपरिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. नगराम येथील स्वस्त धान्य दुकानात पुराचे पाणी शिरल्याने जवळपास 70 बॅग तांदूळ भिजला. सिरोंचा तालुक्यातील 95 गावांमध्ये सात दिवसांपासून विद्युत सेवा खंडित (villages without electricity) झाली आहे. या विद्युत सेवेबाबत नागरिकांनी आक्रोश व्यक्त केलाय. काही नागरिकांच्या सामान रस्त्यावर ठेवण्यात आला. काही नागरिकांच्या घरात पुराने पाणी शिरल्याने घराचे सामान सडले आहे.

अकोल्यात पूर्णा नदीत युवक वाहून गेला

अकोला जिल्ह्यात गेल्या एक आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अमरावती जिल्ह्यात आलेल्या मुसळधार पावसाचे पाणी हे गांधीग्राम येथील पूर्णा नदीत आले. पाण्याची पातळी वाढली असल्याने पाणी पाहण्यासाठी युवक गेले. ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने अकोला शहरातल्या दुर्गा चौक येथील 27 वर्षीय सुधीरसिंग सोहेल हा युवक रात्री 7 वाजताच्या सुमारास वाहून गेला. त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला असता सुधीरसिंग आढळला नाही. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून त्याचा शोध सुरू केला आहे.

नागपुरातील हनुमान मंदिर कोसळले

नागपूरच्या इतवारी भागातील पुरातन हनुमान मंदिर कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सततच्या पावसाने जुन्या आणि जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जुन्या धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला.

हे सुद्धा वाचा

चंद्रपुरात पुराचा 20 हजार 65 शेतकऱ्यांना फटका

चंद्रपूर गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तब्बल 17 हजार 652 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापसाचे पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पाऊस थांबल्याने कृषी विभागाने सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात केली आहे. पुराचा 20 हजार 65 शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.