नाशिकमध्ये वेगळंच चित्र, शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे अचानक समोरासमोर, नेमकं काय घडलं?

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील (Nashik Padvidhar Election) चर्चेतील दोन्ही उमेदवार आज समोरासमोर आल्याचं बघायला मिळालं.

नाशिकमध्ये वेगळंच चित्र, शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे अचानक समोरासमोर, नेमकं काय घडलं?
SHUBHANGI PATIL VS SATYJIT TAMBEImage Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 7:11 PM

कुणाल जायकर, अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील (Nashik Padvidhar Election) चर्चेतील दोन्ही उमेदवार आज समोरासमोर आल्याचं बघायला मिळालं. विशेष म्हणजे या निवडणुकीवरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. ही निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. महाविकास आघाडीने ठाकरे गटाच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे त्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार असल्याचं स्पष्ट झालंय. शुभांगी पाटील यांनी आपल्याला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळावा यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले होते. तसेच त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची त्यांच्या ‘मातोश्री’ या शासकीय निवासस्थानी जावून भेट घेतली होती. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या आणि शुभांगी पाटील यांची महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली.

दुसरीकडे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली. त्यांना शिक्षक भारती संस्थेने पाठिंबा दिलाय. पण काँग्रेसने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिलाय. या निवडणुकीत शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यात थेट लढत होतेय. त्यामुळे या निवडणुकीत कोण जिंकतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान दोन्ही उमेदवार आज समोरासमोर आल्याचं चित्र बघायला मिळालं.

दोन्ही उमेदवार समोरासमोर कसे?

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी सोनई येथे गडाख आणि घुले पाटील यांच्या विवाह सोहळ्यास हजेरी लावली.

यावेळी दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचारार्थ विवाहास उपस्थित विविध नेत्यांच्या, शिक्षक संस्था चालकांच्या तसेच मतदारांच्या भेटी घेतल्या. सत्यजीत तांबे हे विवाह सोहळ्यातून बाहेर पडत‌ असताना तर शुभांगी पाटील विवाह सोहळ्याकडे प्रवेश करत असताना दोघेही समोरासमोर आले. मात्र दोघांनीही एकमेकांकडे बघितल देखील नाही.

आजच्या शाही विवाहास दोन्ही उमेदवारांनी वधू-वरांना शुभ आर्शीवाद दिले.  दुसरीकडे स्वत: च्या झोळीत मतांचं दानही टाकावं, अशी सादही दोन्ही उमेदवार मतदारांना घालताना दिसले.

सत्यजित तांबेंना भाजपचा पाठिंबा आहे की नाही?

दुसरीकडे सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणं ही भाजपची खेळी असल्याचं मानलं जात आहे. पण भाजपकडून त्याबाबत अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या पाठिमागे भाजपचा पाठिंबा आहे का, याबाबतची माहिती सध्या तरी गुलदस्त्यातच आहे.

विवाहाला उपस्थिती लावल्यानंतर शुभांगी पाटील यांची प्रतिक्रिया

महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. “माझा विजय होणार असल्याने भीती नाही. महाविकास आघाडीचे सर्व नेते सोबत आहेत. माझा विजय नक्की होणारच. मला विवाह सोहळ्यास येण्यास उशिर झाला. मात्र आदित्य ठाकरे यांनी बैठक घेत संस्थाचालकांना सुचना केल्या. त्यामुळे माझ्यासोबत भरभक्कम आशीर्वाद आहेत”, असं शुभांगी पाटील म्हणाल्या.

“भाजपच्या नेत्या मोनिका राजळे यांची देखील भेट झाली. नाशिक पदवीधरमध्ये मी एकमेव महिला उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना मदतीची विनंती केली आणि त्यांनी हसत विनंतीला मान दिला”, असं शुभांगी पाटील म्हणाल्या.

“वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युती विषयी वरिष्ठ निर्णय घेतील”, असंदेखील शुभांगी पाटील यावेळी म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.