सर्वात मोठी बातमी! भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार? चंद्रशेखर बावनकुळे यांचं महत्त्वाचं विधान

शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Shikshak-Padvidhar Election 2023) महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) घडामोडींना वेग आलाय. विशेष म्हणजे नाशिकच्या (Nashik) राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आल्याची चर्चा आहे.

सर्वात मोठी बातमी! भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार? चंद्रशेखर बावनकुळे यांचं महत्त्वाचं विधान
चंद्रशेखर बावनकुळे
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 5:20 PM

नाशिक : विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या (Shikshan-Padvidhar Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) घडामोडींना वेग आलाय. विशेष म्हणजे नाशिकच्या (Nashik) राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आल्याची चर्चा आहे. कारण भाजपने इथे शेवटपर्यंत आपला उमेदवार जाहीर केला नाही. तर काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनीदेखील या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सुधीर तांबे यांनी आपला अर्ज मागे घेत मुलगा सत्यजित यांना पाठिंबा दिलाय. विशेष म्हणजे भाजपचा (BJP) एकही अधिकृत उमेदवार नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उभा नाहीय. त्यामुळे ही खेळी भाजपचीच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरुय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना याविषयी प्रश्न विचारले असता त्यांनी अतिशय सूचक अशी प्रतिक्रिया दिलीय. त्यामुळे पडद्यामागे खरंच काहीतरी घडलंय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

“सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी घोषित करुनही, काँग्रेसचे विद्यमान उमेदवार राहूनही त्यांनी उमेदवारी अर्ज का मागे घेतला याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उत्तर देऊ शकतील”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

“भाजपच्या कार्यकर्त्यांनीही फॉर्म भरले आहेत. त्यांना एबी फॉर्म नाहीय. सत्यजित तांबे यांनीही फॉर्म भरलाय. त्यांनी पाठिंबा मागितला तर आम्ही विचार करु”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

चंद्रशेखर बावनकुळे काय-काय म्हणाले?

“अजूनही कुणाचं नाव आम्ही पाठवलेलं नाहीय. आम्ही राजेंद्र विखे यांचं नाव पाठवलं होतं. राजेंद्र विखे यांनी निवडणूक लढावे यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला. पण मागच्या पाच-सहा महिन्यांपूर्वी उमेदवारी जाहीर झाली असती तरी निश्चितपणे निवडणुकीत सहभागी झालो असतो, असं राजेंद्र विखे यांनी सांगितलं. त्यांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे मला वाटते आता अपक्षांची निवडणूक आहे. भाजपची भूमिका काय असेल ते भाजप ठरवेल”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

“पडद्यामागे काहीच सुरु नव्हतं. एकचं होतं की आमच्या उमेदवाराची चाचपणी सुरु होती. आमच्याकडे अधिकृतपणे कुणीच उमेदवारी मागितली नाही. धनराज विसपुते, शुभांगी पाटील या कार्यकर्त्यांनी फॉर्म भरले. पण त्यांनी एबी फॉर्म भरला नाही”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

“सत्यजित तांबे कुठल्या भूमिकेत आहेत ते मी त्यांच्यासोबत बोललेलो नाही. ते उद्या-परवा काय भूमिकेत असतील ते मला माहिती नाही. कुणीही पाठिंबा मागितलेला नाही. कुणीही पाठिंबेचं बोललेलं नाही. आमचेही अपक्ष आहेत आणि त्यांचेही अपक्ष आहेत. अपक्षांची ही लढाई आहे”, असं बावनकुळे म्हणाले.

बावनकुळे यांचं सूचक विधान

“जरी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमची सत्ता असली तरीही आम्ही काही क्षेत्रात कमजोर आहोत. जी गोष्ट मान्य करायची ते मान्य करतोय. सहकार क्षेत्रात आम्ही कमी आहोत. राजकारणात एक आणि एक अकरा चालतं. जिथे आम्ही कमी आहोत, वारंवार आमचा पराभव होतोय, तिथे एक आणि एक अकरा करावेच लागतात”, असं सूचक विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.

“आम्हाला कुणी पाठिंबा मागितलेला नाही. पाठिंबा मागितला तर राज्य आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डकडे विषय जाईल. मग बोर्ड त्याबद्दल विचार करेल”, अशी माहिती त्यांनी दिली.

“सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई करण्याचा त्यांच्या पक्षाला अधिकार आहे. मला कुणी पाठिंबा मागितला तर पाहू. अजूनही कुणी पाठिंबा मागितलेला नाही. पाठिंबा मागितला तर मला राज्य आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डात जावं लागेल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“अपक्ष कुणीही असेल तरी चालेल. ही अपक्षांची लढाई आहे. त्यामुळे भाजप कुणामागे उभी राहील हे खरंतर पाठिंब्यावर आहे. पाठिंब्यावर सुद्धा राज्य पार्लमेंटरी बोर्ड काय म्हणतं आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड काय म्हणतं याला अर्थ आहे”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.