“शिवसेनेवर भुकंण्यासाठी नारायण राणे यांना भाजपचं मंत्रीपद”; ठाकरे गटाच्या नेत्याने राणेंचा राजकीय इतिहास सांगितला
आमदार राजन साळवी यांनी लोकसभा निवडणुकीचे जाहीर आव्हान देत, नारायण राणे यांनी कोकणातून निवडणूक लढवून दाखवावी असा थेट इशाराही त्यांना देण्यात आला आहे.
मुंबईः ठाकरे गट आणि नारायण राणे कुटुंबीयांकडून वारंवार ठाकरे घराण्यावर जोरदार हल्लाबोल केला जातो. नुकताच मुख्यमंत्री पदावरूनही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर नारायण राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. तर दुसरीकडे अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणावरनही आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले होते.
त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवे यांनी नारायण राणे यांची लायकी काढत शिवसेनेवर भुंकण्यासाठीच नारायण राणे यांना मंत्रिपद दिले असल्याची जहरी टीका त्यांनी केली आहे. त्यामुळे भविष्यात आता राणे आणि ठाकरे गट आणखी वाद चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार प्रहार करत नारायण राणे यांना शिवसेनेमुळे ते मंत्री, मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री झाले आहेत. मात्र ज्या शिवसेनेने त्यांना मोठे केले आहे, त्या शिवसेनेला ते विसरले असल्याची टीका राजन साळवी यांनी केली आहे.
नारायण राणे सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यांच्या गंभीर आरोपरही करत आहेत. त्यावर बोलताना राजन साळवी यांनी सांगितले की, नारायण राणे जे आरोप करतात त्यांनी लोकांसमोर आणावे.
कारण केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता आहे. मात्र ते धाडस राणे करत नाहीत कारण त्यांना सध्या पराभूत पराभूत असा अनुभव येत असल्याने त्यांनी त्यांच्याकडून वाटेल ते आरोप केले जात आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
नारायण राणे आज ठाकरे कुटुंबीयांवर आरोप करत असले तरी त्यांच्यामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी कोकणातून लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी असे जाहीर आव्हान राजन साळवी यांनी केले आहे. त्यामुळे राणे आणि ठाकरे कुटुंबीय वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.
आमदार राजन साळवी यांनी लोकसभा निवडणुकीचे जाहीर आव्हान देत, नारायण राणे यांनी कोकणातून निवडणूक लढवून दाखवावी असा थेट इशाराही त्यांना देण्यात आला आहे.