Nagpur News : वेकोलित प्लास्टिंगमुळे घर कोसळल्याने मोठी दुर्घटना; बापासह लेकीचा घात

Nagpur News : बाहेर ब्लास्टिंगचा आवाज येत होता. घरी बापलेक बसले होते. अचानक घरं कोसळले.

Nagpur News : वेकोलित प्लास्टिंगमुळे घर कोसळल्याने मोठी दुर्घटना; बापासह लेकीचा घात
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 7:39 PM

नागपूर : वेकोली कन्हान भागात कोसळ्याचे उत्खनन करते. कोळसा मिश्रित माती कन्हान डम्पिंग परिसरात काढून ठेवले जाते. यामुळे उंच कृत्रीम टेकड्या तयार झाल्या आहेत. या कोळसा मिश्रीत मातीने प्रदूषण होत आहे. याचा फटका कन्हान, पिपरी आणि कांद्रीतील ३ किमी परिसरातील नागरिकांना बसतो. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. माती मिश्रीत कोळसा उत्खननासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग करण्यात येते. या ब्लास्टिंगमुळे घरांना हादरे बसतात. परिसरातील घरांना भेगा पडल्या आहेत. यासंदर्भात वेकोली प्रशासनाकडे नेहमी तक्रारी करण्यात येतात. पण, वेकोलीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

बाप लेकाचा मृत्यू

वेकोली कामठी खुली खदानच्या ब्लास्टिंगमुळे कांद्रीतील वॉर्ड क्रमांक एकमधील हरीहरनगर येथे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत घर कोसळून बापलेक ठार झाले. या दुर्घटनेमध्ये कमलेश कोठेकर आणि यादवी कोठेकर या दोघांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली. या दुर्घटनेतील मुलगी ही सहा वर्षाची आहे. या धक्कादायक घटनेमुळे कांद्री-कन्हान परिसरात शोककळा पसरली.

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

कन्हान परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेकोलीची ब्लास्टिंग बंद करण्यात यावी. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर संतप्त नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. वेकोली प्रशासनाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

ब्लास्टिंगमुळे घर कोसळले

वेकोली कामठी खुली खदानच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला. हरीहर नगर कांद्री येथील कमलेश गजानन कोठेकर (वय ३५ वर्षे) यांचे घर खदाणीच्या ब्लास्टिंगमुळे कोसळले. त्यात कमलेश कोटेकर आणि यादवी कोठेकर या बापलेकाचा मृ्त्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली.

घटनेनंतर माजी ग्रामपंचायत सरपचं बळवंत पडोळे, माजी उपसरपंच श्याम बर्वे, माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश वाडीभस्मे, नरेश पोटभरे घटनास्थळी दाखल झाले. पारशिवनी प्रभारी तहसीलदार रंजित दुसावार, तलाठी श्रीरसागर, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर, कन्हान पोलीस निरीक्षक सार्थक नेहाते हेही घटनास्थळी पोहचले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु, वृत्त लिहीपर्यंत वेकोलीचे अधिकारी घटनास्थळी येण्यास तयार नव्हते.

मृतक कमलेश कोठेकर यांचे नागपूर जबलपूर रोडवर सलुनचे दुकान चालवत होते. घरचा कर्ता पुरूष आणि छोटीशी मुलगी गेली. त्यामुळे पत्नी आणि त्यांच्या लहान मुलाच्या संगोपणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.