Nagpur Police : हिंगण्यातील लेट नाईट पार्टी प्रकरण, 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, आणखी काही रडारवर?

पोलीस ठाण्यात हद्दीत इतकी मोठी पार्टी सुरू असल्याची माहिती पोलीस कर्मचाऱ्यांना नसणे हे पटत नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी जामठा बिटवर तैनात असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पुढील काही दिवसात आणखी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Nagpur Police : हिंगण्यातील लेट नाईट पार्टी प्रकरण, 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, आणखी काही रडारवर?
2 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 2:24 PM

नागपूर : हिंगणा पोलीस (Hingana Police) ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खरसमारी गावाजवळ रविवारी रात्री लेट नाईट पार्टी ( Late Night Party) झाली. या प्रकरणात पोलीस आयुक्तांनी 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. कर्तव्यात कुचराई केल्याप्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. एस परदेशी यांची आधीच तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खरसमारी गावाजवळ तरुणाईसाठी पार्टी आयोजित केली होती. त्यामध्ये दारू विथ लाऊड डीजे (Loud DJ) आणि डान्स करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी झाले होते. धक्कादायक म्हणजे या पार्टीच्या आयोजना संदर्भात पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना माहितीचं नव्हती.

आणखी काही पोलीस रडारवर

रविवारी रात्री डीसीपी गजानन राजमाने हे नाईट राऊंडवर होते. त्यांना या पार्टीची माहिती समजली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे डीसीपी गजानन राजमाने यांनी धाड टाकली. तिथे हजारो लिटर अवैध दारू साठा मिळून आला होता. आयोजकांनी पार्टीच्या आयोजना संदर्भात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेतली होती. मात्र परवानगी देताना लावण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात हद्दीत इतकी मोठी पार्टी सुरू असल्याची माहिती पोलीस कर्मचाऱ्यांना नसणे हे पटत नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी जामठा बिटवर तैनात असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पुढील काही दिवसात आणखी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तर धांगडधिंगा सुरू राहिला असता…

शेकडो तरुण-तरुणी एकत्र येतात. डान्स करतात. संबंधित ठाण्याच्या पोलिसांना माहिती कशी होत नाही. पोलीस निरीक्षकाची आधीच बदली करण्यात आली. आता संबंधित बिटच्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या ही बाब लक्षात आली नसती, तर सारं साजरोषपणे सुरू राहीलं असतं. त्यामुळं ही कारवाई करण्यात आली. हा धिंगाण्यात काही गडबड झाली असती, तर जबाबदारी कोणाची असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.