Nagpur Accident | नागपुरात ट्रकने सायकलस्वारास चिरडले; मागच्या चाकाखाली आल्याने सायकलचालक ठार

सायकल चालक हा सुमारे पन्नास वर्षे वयाचा आहे. तो सायकलनं अशोक चौकातून जात होता. अचानक वेगाने आलेल्या ट्रकखाली तो आला. यात सायकलस्वार ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला. त्यामुळं चालकाच्या शरीराचा चेंदामेंदा झाला.

Nagpur Accident | नागपुरात ट्रकने सायकलस्वारास चिरडले; मागच्या चाकाखाली आल्याने सायकलचालक ठार
नागपुरात ट्रकने सायकलस्वाराच चिरडलेImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 3:31 PM

नागपूर : इमामवाडा पोलीस स्टेशन (Imamwada Police Station) हद्दीत आज दुपारी अपघात झाला. या अपघातात ट्रकने सायकलस्वारास धडक दिली. यात सायकलचालक जागीच ठार झाला. ही घटना अशोक चौकात (Ashok Chowk) आज दुपारी बारा वाजता घडली. अशोक चौकातून 45 ते 50 वर्षे वयाचा व्यक्ती सायकल चालवित होता. ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्यानं तो जागीच ठार झाला. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल (Police rushed to the spot) झाले. तोपर्यंत ट्रकचालक फरार झाला होता. अपघातामुळं काही काळ वाहतूक खोळंबली होती.

नेमकं काय झालं

सायकल चालक हा सुमारे पन्नास वर्षे वयाचा आहे. तो सायकलनं अशोक चौकातून जात होता. अचानक वेगाने आलेल्या ट्रकखाली तो आला. यात सायकलस्वार ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला. त्यामुळं चालकाच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. रक्ताचा सडा त्याठिकाणी पडला होता. अपघातानंतर बघ्यांची गर्दी झाली. त्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली होती. मृतदेह हटविल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

अपघातानंतर ट्रकचालक फरार

अपघात झाल्यानंतर सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची बाब चालकाच्या लक्षात आली. लोकं आपल्याला मारहाण करतील, या भीतीने त्याने पळ काढला. पोलीस आले तोपर्यंत ट्रकचालक फरार झाला होता. पोलिसांनी काही लोकांच्या मदतीनं मृतदेह ट्रकच्या चाकाखालून काढला. त्यानंतर त्यावर चादर हातरली. मृतदेह शवविच्छदेनासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

हे सुद्धा वाचा

अशोक चौक गर्दीचा

अशोक चौकात नेहमी गर्दी असते. कारण येथून शहराच्या चारही दिशेने जाता येते. त्याठिकाणी फारशी जड वाहतूक नसते. तरीही तिथं ट्रक कसा आला. या ट्रकचालकाचा दोष यात आहे, का याचा तपास इमामवाडा पोलीस करत आहेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.