Chandrasekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, मोदींना काय दिलं वचन?

महाराष्ट्रातील 97 हजार बूथवर पक्ष मजबूत करण्यासाठी करेन. कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते या सर्वांच्याच सहकार्याने पक्ष बळकटीसाठी मी सतत प्रयत्नरत राहीन, असा शब्द मोदीजींना दिला आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

Chandrasekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, मोदींना काय दिलं वचन?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 10:01 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहकुटुंब भेट घेतली. प्रदेशाध्यक्षाची (State President) धुरा सांभाळल्यानंतर त्यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी पहिलीच भेट होती. नौदलाच्या ध्वजामध्ये परिवर्तन करून महाराष्ट्राचा गौरव वाढविल्याबद्दल श्री. बावनकुळे यांनी यावेळी पंतप्रधानाचे आभार मानले. महाराष्ट्राचे (Maharashtra) दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) राज्यकारभाराचे प्रतीक असलेल्या शिवमुद्रेचे रूप नौदलाच्या प्रतीक चिन्हाला प्रदान करण्यात आले आहे. याचा आवर्जून उल्लेख श्री बावनकुळे यांनी या भेटीत केला. बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील पक्ष बळकटीसाठी करीत असलेल्या कामांची माहिती दिली. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार दमदारपणे जनकल्याणाचे काम करीत आहे. केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शासकीय यंत्रणासह राज्यातील सर्व भाजपा कार्यकर्ते देखील हातभार लावत असल्याचा माहिती बावनकुळे यांनी दिली.

97 हजार बूथवर पक्ष मजबूत करणार

पंतप्रधानांनी पक्षकार्यासाठी मार्गदर्शन केले. शेतकरी, गरीब व दुर्बल घटकातील नागरिक व कुटुंबाच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न करावेत अशी सूचना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने मला विलक्षण ऊर्जा मिळाली. तिचा उपयोग महाराष्ट्रातील 97 हजार बूथवर पक्ष मजबूत करण्यासाठी करेन. कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते या सर्वांच्याच सहकार्याने पक्ष बळकटीसाठी मी सतत प्रयत्नरत राहीन, असा शब्द मोदीजींना दिला आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

श्री गणेश प्रतिमेची सस्नेह भेट

महाराष्ट्रात गणेशोत्सवात साजरा होत असताना या पंतप्रधान मोदी यांची सहकुटुंब भेट घेण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला. बावनकुळे कुटुंबीयांनी श्री गणेशाची मूर्ती पंतप्रधानांना सस्नेह भेट दिली. यावेळी बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती, मुलगी पायल आष्टणकर व नातू अधिराज आष्टणकर, चिरंजीव संकेत, सून अनुष्का त्यांच्यासोबत होते. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कुटुंबासह कुशलक्षेम विचारणा केली. नातू अधिराज सोबतदेखील त्यांनी गप्पा देखील केल्या.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.