Nagpur Corona | नागपुरात कोरोनाच्या नवीन व्हेरियंट बी ए 5 चे 2 रुग्ण, मनपा प्रशासन अलर्ट मोडवर; 253 पॉझिटिव्ह

कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढत आहे. पण, मृतांची संख्या आटोक्यात असल्याने प्रशासन समाधानी आहे. असं असलं तरी वाढणारी रुग्ण प्रशासनाची धडकी भरविणारी आहे. आठवड्याभरापूर्वीपर्यंत पन्नासपेक्षा कमी होती. आता या रुग्णसंख्येने अडीचशेचा टप्पा पार केलाय. नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे 253 सक्रिय रुग्ण आहेत. काल 16 जण बरे होऊन घरी परतले.

Nagpur Corona | नागपुरात कोरोनाच्या नवीन व्हेरियंट बी ए 5 चे 2 रुग्ण, मनपा प्रशासन अलर्ट मोडवर; 253 पॉझिटिव्ह
नागपुरात कोरोनाच्या नवीन व्हेरियंट बी ए 5 चे 2 रुग्ण
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 2:44 PM

नागपूर : नागपुरात नवीन व्हेरियंट बी ए 5 चे 2 रुग्ण मिळून आले. त्यामुळं मनपा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. 7 ते आठ दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे 44 टेस्टिंग सेंटर वाढविण्यात आलेत. लक्षण आढळताच नागरिकांनी वेळीच टेस्टिंग कराव्यात, असं आवाहन करण्यात आलंय. विमानतळावरून बाहेरून आलेल्या रुग्णांची यादी मागवून त्यांची टेस्टिंग केली जाते. सरकारी आणि खाजगी रुग्णालयांना तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. लस घेण्याचा नागरिकांना आवाहन करण्यात आलंय. 60 वर्षांवरील वरील लोकांनी बूस्टर डोज (Booster Dosage) घ्यावा, असंही प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय. लवकरचं शाळा-कॉलेज सुरू होणार आहेत. त्या ठिकाणी लसीकरणासाठी (Vaccination) कॅम्प घेतले जातील. नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी (Radhakrishnan b.) यांनी ही माहिती दिलीय.

जिल्ह्यात कोरोनाचे 253 सक्रिय रुग्ण

कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढत आहे. पण, मृतांची संख्या आटोक्यात असल्याने प्रशासन समाधानी आहे. असं असलं तरी वाढणारी रुग्ण प्रशासनाची धडकी भरविणारी आहे. आठवड्याभरापूर्वीपर्यंत पन्नासपेक्षा कमी होती. आता या रुग्णसंख्येने अडीचशेचा टप्पा पार केलाय. नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे 253 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी शहरातील 169, ग्रामीणमधील 80 आणि जिल्ह्याबाहेरील 4 जणांचा समावेश आहे. यामध्ये 3 जणांना लक्षणे आहेत. त्यामुळं ते मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तर उर्वरित 250 जण गृह विलगीकरणात आहेत.

50 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

बुधवारला शहरात 1645 आणि ग्रामीणमध्ये 388 चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी 50 जणांचे अहवाल सकारात्मक आढळून आलेत. यामध्ये शहरातील 22, ग्रामीणमधील 24 आणि जिल्ह्याबाहेरील 4 जणांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनही अलर्ट झाले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यावर भर दिला जात आहे. बुधवारला बाधित आढळून आलेत. त्यापैकी मुंबई, बेंगळुरू, पुणे आणि नांदेड प्रवासाची पार्श्‍वभूमी असलेल्या पाच जणांचाही समावेश आहे. काल 16 जण बरे होऊन घरी परतले. नागपुरात रुग्ण वाढत असले, तरी मृत्यू नसल्यानं लोकांमध्ये फारशी भीती नाही. पॉझिटिव्ह असलेल्या बऱ्याच रुग्णांना लक्षण नाहीत. त्यामुळं ते गृहविलगीकरणात आहेत. तरीही खबरदारी म्हणून काही लोकं मास्कचा वापर करतात. तर काही जण बिनधास्त फिरताना दिसतात.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.