Tatyarao Lahane | लाखो डोळ्यांना जग दाखवणाऱ्या डॉक्टरांनी राजीनामा का दिला? वाचा सविस्तर कारण

डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह 9 वरिष्ठ डॉक्टरांनी आज अचानक राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या वरिष्ठ डॉक्टरांनी सविस्तर प्रसिद्धी पत्रक जारी करत आपली भूमिका मांडली आहे.

Tatyarao Lahane | लाखो डोळ्यांना जग दाखवणाऱ्या डॉक्टरांनी राजीनामा का दिला? वाचा सविस्तर कारण
फोटो सौजन्य : तात्याराव लहाने यांच्या फेसबुक अकाउंटवरुन साभार
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 7:58 PM

मुंबई : डॉ. तात्याराव लहाने हे नाव राज्यातील अगदी गाव-खेड्यांपर्यंत पोहोचलं आहे. या माणसाने हजारो दृष्टीहीन नागरिकांसाठी काम केलं. लाखो रुग्णांची सेवा केली. तात्याराव लहाने यांच्या कर्तृत्वाचं नेहमी कौतुक केलं जातं. विशेष म्हणजे तात्याराव लहाने हे सेवानिवृत्तीनंतरही जे जे रुग्णालयात आपलं कर्तव्य बजावत आहेत. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी ते आजही काम करत आहेत. त्यांचं नाव देशभरात प्रख्यात आहे. त्यांच्या फक्त नावामुळेच शेकडो रुग्ण जे जे रुग्णालयात येते हे वास्तव आहे. पण तात्याराव लहाने यांच्यासह 9 वरिष्ठ डॉक्टरांनी आज अचानक राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या वरिष्ठ डॉक्टरांनी सविस्तर प्रसिद्धी पत्रक जारी करत आपली भूमिका मांडली आहे. आता या प्रकरणी नेमकं काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वरिष्ठ डॉक्टरांचं नेमकं म्हणणं काय, वाचा प्रसिद्धी पत्रक जसंच्या तसं

गेल्या काही दिवसांपासून आपण निवासी डॉक्टर संघटना (मार्ड) यांनी पाठवलेले प्रेस रिलीज पाहीलेच असेल. नेत्र विभागातील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या निवासी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीचे आम्ही शासनास मुद्देनिहाय उत्तर दिलेलं आहे. 1995 पूर्वी रोज फक्त 30 रुग्ण येणाऱ्या या विभागात आज 300 ते 400 रुग्ण दररोज येतात. या विभागाच्या कामाची दखल घेऊन केंद्र शासनाने 2008 मध्ये विभागास ‘विभागीय नेत्रचिकित्सा संस्थेचा’ दर्जा दिला. या विभागात महाराष्ट्रभरातून आणि इतर राज्यातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात.

डोळ्यांमधील दुर्धर आजार किंवा शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत निर्माण झालेले रुग्ण शेवटची अपेक्षा घेऊन आत्मविश्वासाने या विभागात उपचारासाठी येतात. या विभागात वेगेवेगळ्या अतिविशोपचार सेवा दिल्या जातात. (उदा – मोतीबिंदु, काचबिंदु, मेडीकल आणि सर्जीकल रेटीना, बूबूळावरील शस्त्रक्रिया, लेसिक, लहान मुलांच्या डोळ्यावरील उपचार, तिरळेपणा, डोळ्यांचा कर्करोग, आकुलोपस्टी, सर्व प्रकारच्या तपासण्या) या सर्व सेवा त्या त्या तज्ज्ञांमार्फत रुग्णांना देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव विभाग आहे. तसेच सुट्टीच्या दिवशी आदिवासी आणि ग्रामीण भागात जाऊन येथील नेत्रतज्ज्ञ गरीब रुग्णांची सेवा करत आहेत. मागील 28 वर्षात 692 शिबीरे घेऊन 30 लाख रुग्णांवर उपचार केले आहेत.

हे सुद्धा वाचा

2016 मध्येही निवासी डॉक्टर संघटनेने या विभागाच्या विरोधात संप पुकारला होता. त्यातील 12 पैकी 11 डॉक्टरांनी क्षमा मागून तक्रार परत घेतली. त्यावेळेसही आमच्यावर झालेला अन्याय आम्ही रुग्णांसाठी सहन केला.

आता पुन्हा 22 मे 2023 ला सध्या कार्यरत असणाऱ्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या 28 निवासी डॉक्टरांनी अधिष्ठांकडे मार्ड संघटनेमार्फत तक्रार केली आहे. या तक्रारीचे स्पष्टीकरण डॉ. गजानन चव्हाण यांच्यासह अधिष्ठाता यांनी नेत्र विभाग प्रमुखांकडे मागितले. पण अधिष्ठाता यांनी विभागाचे स्पष्टीकरण पोहचण्यापूर्वीच चौकशी समिती नेमली. या समितीत 31 मे ला सेवानिवृत्त होत असलेले डॉ. अशोक आनंद यांची चौकशी समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

डॉ. अशोक आनंद यांची महिला छळ प्रकरणी डॉ. रागिनी पारेख यांनी यापूर्वी चौकशी केली आहे. तसेच त्यांनी डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ. भंडारवार, डॉ. एकनाथ पवार, डॉ. श्रीमती अभीचंदानी यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत पोलिसात तक्रार दाखल केली होती.

या वरुन हे लक्षात येते की डॉ. अशोक आनंद यांचे समितीचे अध्यक्ष म्हणून अधिष्ठाता यांनी केलेली नियुक्ती म्हणजेच विभागातील अध्यापकांना आकस बुद्धीने त्रास देण्यासाठी आणि त्यांची बदनामी केली आहे हे सिद्ध होत आहे. या विभागामार्फत डॉ. अशोक आनंद यांच्याऐवजी इतर कोणाताही अध्यक्ष नियुक्त करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. पण तसे न करता अधिष्ठाता यांनी चौकशी तशीच सुरु ठेवली.

सहा महिन्यापूर्वी विभागात पदव्यूत्तर अभ्यासक्राम शिकवण्यासाठी रुजी झालेल्या निवासी डॉक्टरांच्या तक्रारीवरुन आमचे म्हणणे न ऐकताच चौकशी सुरु ठेवण्यात आली आहे.

अधिष्ठाता यांनी मागील वर्षभरात या विभागाला कोणतीही मदत केलेली नाही. वारंवार प्राध्यापकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. तरीही या विभागातील प्राध्यापक अपमान सहन करुन रुग्णांच्या सेवेसाठी काम करीत आहेत. पुन्हा आता कसलीही चूक नसताना विभागातील प्राध्यापकांची बदनामी करण्यात येत आहे.

डॉ. लहान हे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र कार्यक्रम करीत आहेत. सेवानिवृत्तीनंतरही ते आणि सर्व प्राध्यापक रात्रं-दिवस रुग्णसेवा देत आहेत. असे असले तरी त्यांचे वेतन अद्यापही अधिष्ठाता यांनी अदा केलेले नाही. त्यांना शासकीय निवासस्थानासाठी 7 लाख रुपये दंड लावून रिक्त करण्यास सांगितले. तरिही रुग्णांशी असलेल्या बांधिलकीमुळे ते काम करीत आहेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.