BMC : मुंबई महानगरात आतापर्यंत 3 हजार 689 मॅनहोलवर संरक्षक जाळी लावण्याचे काम पूर्ण

मुंबईतील पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून दरवर्षी सर्व ठिकाणच्या मॅनहोलची तपासणी करून आवश्यक ती दुरूस्ती करण्यात येते. यंदा देखील ठिकठिकाणी असलेल्या मॅनहोलची तपासणी करुन दुरुस्ती करणे, आवश्यक तेथे नवीन मॅनहोल लावणे ही कामे हाती घेण्यात आली आहेत.

BMC : मुंबई महानगरात आतापर्यंत 3 हजार 689 मॅनहोलवर संरक्षक जाळी लावण्याचे काम पूर्ण
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 8:12 PM

मुंबई : पावसाळी तोंडावर आल्याने मुंबई महापालिकेकडून पावसाळा पूर्व कामांना वेग आला आहे. नालेसफाई, उघड्या मॅनहोलवर झाकण टाकणे आदी कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. मुंबई महानगरा (Mumbai Metropolis)त आतापर्यंत एकूण 3 हजार 679 मॅनहोल (Manhole)वर झाकणाखाली सुसज्ज व मजबूत अशा प्रकारची संरक्षक जाळी (Protective Net) लावण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. पावसाळ्यामध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचल्यास कोणत्याही मॅनहोलवरील झाकणे नागरिकांनी स्‍वतःहून परस्पर काढू टाकू नयेत. त्यातून दुर्घटना घडू शकतात. मॅनहोलवरील झाकण नागरिकांनी काढल्यास संबंधित नागरिकांविरुद्ध महानगरपालिका प्रशासन योग्य ती कारवाई करेल, असा इशारा देण्यात येत आहे.

मुंबईतील पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून दरवर्षी सर्व ठिकाणच्या मॅनहोलची तपासणी करून आवश्यक ती दुरूस्ती करण्यात येते. यंदा देखील ठिकठिकाणी असलेल्या मॅनहोलची तपासणी करुन दुरुस्ती करणे, आवश्यक तेथे नवीन मॅनहोल लावणे ही कामे हाती घेण्यात आली आहेत. जोरदार पावसानंतर आणि पाण्याचा निचरा झाल्यानंतर देखील महानगरपालिकेच्‍या वतीने पुन्‍हा एकदा सर्व रस्‍त्‍यांची पाहणी करुन मॅनहोलची तपासणी केली जाते.

संरक्षक जाळी लावण्याची कार्यवाही मुंबईत टप्प्याटप्प्याने सुरु

या नियमित उपाययोजनांसोबतच मॅनहोलच्या झाकणाखाली प्रतिबंधक स्वरुपाची संरक्षक जाळी लावण्याची कार्यवाही मुंबईत टप्प्याटप्प्याने सुरु आहे. आजपर्यंतचा विचार करता संपूर्ण मुंबईत मिळून 3 हजार 679 मॅनहोलवर झाकणाखाली संरक्षक जाळी लावण्यात आली आहे. यामध्ये मुंबई शहर विभागात 2 हजार 945, पूर्व उपनगरात 293 तर पश्चिम उपनगरात 441 मॅनहोलवर संरक्षित जाळ्या लावल्‍या आहेत, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प ) पी. वेलरासू यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

मॅनहोलवरील झाकणे नागरिकांनी परस्पर काढून टाकू नये

दरम्यान, मुंबई महानगरात जोरदार पावसाप्रसंगी सखल भागात पावसाचे पाणी साचण्याची शक्यता असते. त्यावेळी महानगरपालिकेचे संबंधित विभागातील कर्मचारी पावसाच्‍या पाण्‍याचा निचरा लवकर व्‍हावा म्‍हणून सदर मॅनहोल उघडतात आणि तेथे धोक्‍याची सूचना देणारे फलक देखील लावलेले असतात. मात्र, कोणत्याही स्थितीत पाणी साचलेल्या ठिकाणी मॅनहोलवरील झाकणे नागरिकांनी स्‍वतःहून परस्पर काढून टाकू नयेत. कारण त्यातून अपघात घडू शकतात, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे. (The work of installing protective nets on 3 thousand 689 manholes in Mumbai metropolis has been completed so far)

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.