OBC Reservation: ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात 15 महापालिका, 210 नगरपरिषदांच्या निवडणूका होणार; तुमची नगरपालिका यात आहे का?, घ्या जाणून

OBC Reservation: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण रद्दबादल ठरवल्यानंतर, आत्तापर्यंत राज्यात 15 महापालिकांच्या निवडणुका होणे अपेक्षित होते.

OBC Reservation: ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात 15 महापालिका, 210 नगरपरिषदांच्या निवडणूका होणार; तुमची नगरपालिका यात आहे का?, घ्या जाणून
एससी, एसटी लोकसंख्या जास्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांत ओबीसी आरक्षण नकोचImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 3:40 PM

मुंबई: ओबीसी आरक्षणाशिवाय (obc reservation) राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असा आदेश सुप्रीम कोर्टाने (supreme court) दिल्यानंतरही राज्य सरकारने याबाबत चालढकलपणा केला होता. त्यानंतर बुधवारी सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करावा, असे आदेश दिेले आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या आदेशामुळे राज्य निवडणूक आयोगाला (election commission) येत्या दोन आठवड्यांत महापालिका, नगरपालपिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींचा कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे. राज्य सरकारने डिसेंबर 2022 पर्यंत सुप्रीम कोर्टात अवधी मागितला होता परंतु कोर्टाने अवधी देण्यास नकार दिला. पावसाळ्याचे कारण राज्य सरकारनं पुढे केले परंतु आता पुन्हा मुदत वाढविता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. इतर 8 राज्यांत निवडणूक वेळापत्रकाचे अधिकार राज्यांकडे असल्याचा मुद्दाही राज्य सरकारनं पुढे केला होता, परंतु आत्ता राज्यातील महापालिकांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी संपला असल्याचे कोर्टाने सांगितले आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थआंवर असलेल्या प्रशासकांचा 6 महिन्यांहून अधिक काळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेळेतच घ्या असा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला.

राज्यात कुठकुठल्या महापालिकांच्या निवडणुका होणार

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण रद्दबादल ठरवल्यानंतर, आत्तापर्यंत राज्यात 15 महापालिकांच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. त्या 15 महापालिकांच्या निवडणुका आता येत्या काही महिन्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकोला या महानगरपालिकांचा समावेश आहे.

या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीत निवडणुका

यासह राज्यातील 210 नगरपरिषदा, 10 नगर पंचायती आणि 1930 ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही एकाच वेळी होणार आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या शहरांतील राजकीय पक्ष कार्यकर्ते आणि उत्सुक उमेदवार हे निवडणुकांच्या तयारीत आहेत, मात्र प्रत्येकवेळी येत्या दोन ते तीन महिन्यांत निवडणुका होतील, असे त्यांना सांगण्यात येते आहे.

हे सुद्धा वाचा

मिनी विधानसभेत राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, या निवडणुका महाविकास आघाडी आणि भाजपा, मनसे या पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या असणार आहेत. 2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची ही लिटमस टेस्टही असणार आहे. सध्या राज्यातील राजकीय वातावरण सातत्याने आरोप-प्रत्योराप आणि हनमुान चालिसा सारख्या मुद्द्यांमुळे तापलेले आहे. त्यामुळे मतदार या सगळ्याकडे कसे पाहतो हेही यातून दिसणार आहे. महाविकास आघाडी या निवडणुका एकत्र लढणार का, हाही प्रश्न आहे. तर भाजपाची रणनीती काय असेल, याचीही उत्सुकता असणार आहे. थोडक्यात राजकीयदृष्ट्या ही निवडणूक मिनी विधानसभाच ठरण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत महत्त्वाची

सत्ताधारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षासाठी मुंबई महापालिका निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भाजपा आणि मनसे हे दोन्ही पक्ष मुंबई महापालिकेत शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे करणार यात शंकाच नाही. राजकीय संघर्ष मोठ्या प्रमाणात या निवडणुकांत रस्त्यांवर पाहायला मिळेल. शिवसेनेची आर्थिक नाडी असलेली मुंबई महापालिका तोडण्याचा विडाच भआजपाने उचलला आहे. राज ठाकरे गेल्या काही काळापासून घेत असलेल्या भूमिकांमुळे ते भाजपाच्या सोबत जातील अशही चर्चा रंगते आहे. अशा स्थितीत संपूर्ण देशाचे लक्ष या महापालिका निवडणुकाकडे असेल यात शंका नाही. एकूणच येता काळ हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.