Nitesh Rane : तशीच तत्परता अनधिकृत बांधकामांवर हातोडा पाडण्यासाठी दाखवणार काय?; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Nitesh Rane : गुरुवारी 9 जूनला तुमच्या निवास्थानाहून हकेच्या अंतरावर असलेल्या वांद्रे पश्चिममधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशी बांधकाम कोसळलं. 17 जण जीवन मरणाशी लढा देत आहेत. 40 वर्षीय युवकाचा बळी गेला.

Nitesh Rane : तशीच तत्परता अनधिकृत बांधकामांवर हातोडा पाडण्यासाठी दाखवणार काय?; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
तुम्ही अडीच वर्षात शिवसैनिकांसाठी काय केलं? नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवालImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 12:17 PM

मुंबई: वांद्रे पश्चिममधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशी बांधकाम कोसळल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thakceray) यांना पत्रं पाठवून खरमरीत सवाल केला आहे. मुंबईत (mumbai) बांधकामं राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. ही अनाधिकृत बांधकामं वाढत वाढत खारफुटी जागांवर पोहचली आहेत. त्यामुळे वारंवार अनाधिकृत बांधकामं ढासळत आहेत. यात लोकांचा बळी जातोय. आपण मात्र शांतपणे हा मृत्यूचा तांडव उघड्या डोळ्यानं पाहत आहात. एकीकडे राजकीय आकसापोटी विरोधकांना अनाधिकृत बांधकामांच्या नोटीसी पाठवाल्या जात आहेत. पण मतांसाठी या अनाधिकृत बांधकांना संमती दिली जात आहे. विरोधकांना नोटीसा पाठवताना जी तत्परता दाखवली जात आहे, तिच तत्परता हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी दाखवणार आहात काय? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

गुरुवारी 9 जूनला तुमच्या निवास्थानाहून हकेच्या अंतरावर असलेल्या वांद्रे पश्चिममधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशी बांधकाम कोसळलं. 17 जण जीवन मरणाशी लढा देत आहेत. 40 वर्षीय युवकाचा बळी गेला. त्या कुटुंबांनी फोडलेल्या टाहोने संबंध मुंबईच्या काळाजाचा थरकाप उडाला. आपण मात्र तिथं भेट देऊन विचारपूस करण्याची तसदीही घेतली नाही. तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की त्या निष्पापांच्या रक्ताने तुमच्याच सत्ताधारी शिवसैनिकांचे हात रंगले आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

सत्ताधारी आणि प्रशासनाची मेहेर नजर

मुंबईत 14 फुटाच्यावर वाढीव बांधकाम करण्यास बंदी आहे. मात्र सत्ताधारी आणि प्रशासनाची मेहेर नजर असल्यानं ही बांधकामं राजरोसपणे सुरु आहेत. अनाधिकृत बांधकामं वाढत वाढत खारफुटी जागांवर पोहचली आहेत. त्यामुळं जीवाशी खेळ करत तिथं दोन दोन मजली झोपडपट्ट्या उभारल्या आहेत. वारंवार अनाधिकृत बांधकामं ढासळत आहेत. यात लोकांचा जीव बळी जातोय. आपण मात्र शांतपणे हा मृत्यूचा तांडव उघड्या डोळ्यानं पाहत आहात. यामुळं निर्माण होणारी तुमची असंवेदनशील मुख्यमंत्र्याची प्रतिमा सामान्यांना हवालदिल करणारी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

आदेश दिले, पण कारवाई कुठाय?

वर्षभरापुर्वी मालाड मालवणीमध्ये घराचं वाढीव अनाधिकृत बांधकाम ढासळून 11 जणांचा बळी गेला. मानखुर्दमध्येही असंच प्रकरण घडलं. या जळत्या चितांचा प्रकाश ही तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहचत नाही का? अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करताना कुणाचीही गय करु नका, असे आदेश आपण दिलेत. मात्र आयुक्त कारवाई करत नाहीत. अनाधिकृत बांधकामांना दिली जाणारी परवानगी जीवघेणी ठरत आहे. राजकीय आकसापोटी विरोधकांना अनाधिकृत बांधकामांच्या नोटीसी पाठवण्यात दाखवली जाणारी तत्परता अनाधिकृत बांधकांमांवर हातोडा चालवण्यातही दाखवावी. अन्याथा मुख्यमंत्री जनतेचे नसून ठरावीक पक्षांच्या पदाधिकारी नगरसेवकांसाठी आहे की काय? असा संदेश जनमानसात दृढ होईल, असा टोला त्यांनी लगावला.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.