EXCLUSIVE | महाविकास आघाडीचं संभाव्य जागावाटप, काँग्रेसला सर्वाधिक जागा, तर ठाकरे गटाला अवघ्या….

राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यामुळे मविआच्या तीनही घटक पक्षांचं 16-16-16 जागांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली होती. पण मविआ नेत्यांकडून तसा काहीच फॉर्म्युला ठरला नसल्याचे मविआ नेत्यांनी सांगितलंय. तरीही लोकसभेच्या जागा वाटपाची एक यादीच आता समोर आली आहे.

EXCLUSIVE | महाविकास आघाडीचं संभाव्य जागावाटप, काँग्रेसला सर्वाधिक जागा, तर ठाकरे गटाला अवघ्या....
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 12:11 AM

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. आगामी निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी मविआच्या गोटात प्रचंड हालचाली सुरु आहेत. महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांच्या सातत्याने बैठका पार पडत आहेत. राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यामुळे मविआच्या तीनही घटक पक्षांचं 16-16-16 जागांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली होती. पण मविआच्या नेत्यांनी संबंधित बातमी खोटं असल्याचं म्हटलंय. असं असलं तरी आता सोशल मीडियावर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल एक यादी व्हायरल होतेय.

संबंधित व्हायरल होणाऱ्या बातमीत दावा करण्यात आलाय की, लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला सर्वाधिक 16, राष्ट्रवादी काँग्रेसला 15, ठाकरे गटाला 13 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला एक आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना 2 जागा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

विशेष म्हणजे संबंधित बातमीत एकनाथ खडसे यांचंदेखील नाव आहे. या यादीनुसार रावेर मतदारसंघासाठी एकनाथ खडसे यांचं नाव फिक्स होणार आहे. पण खडसे आधीच आमदार आहेत. रावेर मतदारसंघात त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे या खासदार आहेत. त्यामुळे ही यादी खरी ठरली तर सासरा विरुद्ध सून अशी राजकीय रणधुमाळी रंगताना दिसेल.

जागा वाटपाच्या व्हायरल यादीत नेमकी कुणाला संधी, पाहा

नंदुरबार- के. सी. पाडवी (काँग्रेस) धुळे- कुणाल पाटील (काँग्रेस) जळगाव- गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी) रावेर- एकनाथ खडसे (राष्ट्रवादी) बुलढाणा- नरेंद्र खेडेकर (शिवसेना-ठाकरे गट) अकोला- सुनील फाटकर (वंचित बहुजन आघाडी) अमरावती- दिनेश बूब (शिवसेना-ठाकरे गट) वर्धा- रणजीत कांबळे (काँग्रेस) गडचिरोली- धर्मराव बाबा आत्राम (राष्ट्रवादी) रामटेक- नितीन राऊत (काँग्रेस) नागपूर- नाना पटोले (काँग्रेस) गोंदिया- प्रफुल पटेल (राष्ट्रवादी) यवतमाळ- संजय देशमुख (शिवसेना-ठाकरे गट) हिंगोली- प्रज्ञा सातव (काँग्रेस) परभणी- संजय जाधव (शिवसेना- ठाकरे गट) संभाजीनगर- अंबादास दानवे (शिवसेना-ठाकरे गट) धाराशिव- ओमराजे निंबाळकर (शिवसेना-ठाकरे गट) जालना- कल्याण काळे (काँग्रेस) नांदेड- अशोक चव्हाण (काँग्रेस) लातूर- मच्छिंद्र कामत (काँग्रेस) सोलापूर- प्रणिती शिंदे (काँग्रेस) बीड- धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) कोल्हापूर- संजय पवार ( शिवसेना-ठाकरे गट) दिंडोरी- नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी) नाशिक- छगन भुजबळ (राष्ट्रवादी) पालघर- बळीराम जाधव (बहुजन विकास आघाडी) भिवंडी- सुरेश टावरे (काँग्रेस) कल्याण- आनंद परांजपे (राष्ट्रवादी) ठाणे- राजन विचारे (राष्ट्रवादी) मुंबई उत्तर- संजय निरुपम (काँग्रेस) मुंबई उत्तर पश्चिम- अमोल कीर्तिकर (शिवसेना-ठाकरे गट) मुंबई उत्तर पूर्व- संजय दिना पाटील (शिवसेना-ठाकरे गट) मुंबई उत्तर मध्य- प्रिया दत्त (काँग्रेस) मुंबई दक्षिण मध्य- प्रकाश आंबेडकर ( वंचित बहुजन आघाडी) मुंबई दक्षिण- अरविंद सावंत ( शिवसेना-ठाकरे गट) रायगड- सुनील तटकरे ( राष्ट्रवादी) मावळ- पार्थ पवार ( राष्ट्रवादी) पुणे- रविंद्र धंगेकर (काँग्रेस) बारामती- सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) शिरुर- अमोल कोल्हे (राष्ट्रवादी) अहमदनगर- निलेश लंके (राष्ट्रवादी) शिर्डी- बबनराव घोलप (शिवसेना-ठाकरे गट) माढा- संजय शिंदे (राष्ट्रवादी) सांगली- विश्वजीत कदम ( काँग्रेस) सातारा- रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी) रत्नागिरी- विनायक राऊत (शिवसेना-ठाकरे गट) हातकणंगले- राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना) चंद्रपूर- बाळू धानोरकर (काँग्रेस)

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.