Mumbai Taxi News : 1 ऑगस्टला टॅक्सी चालकचा संप! दरवाढ करण्याची प्रमुख मागणी, महागाईचा आणखी एक झटका बसणार?

Mumbai Taxi News : पहिल्या दीड किलोमीटरसाठी 10 रुपयांची दरवाढ करावी, अशी मागणी टॅक्सी युनिअनकडून करण्यात आली आहे.

Mumbai Taxi News : 1 ऑगस्टला टॅक्सी चालकचा संप! दरवाढ करण्याची प्रमुख मागणी, महागाईचा आणखी एक झटका बसणार?
टॅक्सीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 7:38 AM

मुंबई : मुंबई काळी पिवळी टॅक्सी (Mumbai Taxi Driver) चालक 1 ऑगस्ट रोजी संपावर जााणार आहे. दरवाढीच्या मागणीसाठी मुंबई टॅक्सी युनियनचे संप पुकारला आहे. तातडीनं टॅकीच्या दरवाढीचा (Taxi Fare) निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी टॅक्सी चालकांनी केली आहे. अन्यथा संपाचा इशादा देण्यात आला आहे. या संपामध्ये रिक्षा चालकही सहभागी होण्याची शक्यता आहे. नुकतीच पुण्यातील रिक्षा चालकांनी भाडेवाढ केली होती. त्यानंतर आता मुंबईत टॅक्सी चालकांपाठोपाठ रिक्षा चालकांनीही दरवाढीची मागणी केली, तर आश्चर्य वाटायला नको. सध्याच्या घडीला मुंबईत टॅक्सीचं पहिल्या दीड किलोमीटरसाठी किमान भाडं 25 रुपये इतकं आहे. त्यापुढे प्रत्येक किलोमीटर मागे 16.93 प्रमाणे दर आकारला जातो. तर रिक्षाचं (Auto Rikshaw) पहिल्या दीड किलोमीटरसाठी किमान भाडं हे 21 रुपये असून त्यापुढे प्रत्येक किलोमीटर मागे 14.20 रुपये प्रमाणे दर आकारला जातो.

काय आहे मागणी?

टॅक्सी चालकांनी किमान दरात वाढ करावी अशी मागणी केली आहे. पहिल्या दीड किलोमीटरसाठी 10 रुपयांची दरवाढ करावी, अशी मागणी टॅक्सी युनिअनकडून करण्यात आली आहे. 25 रुपयांवरुन दर वाढवून 35 रुपये करण्याची प्रमुख मागणी मुंबईतील प्रमुख टॅक्सी युनियन्सकडून करण्यात आली आहे. 31 जुलैपर्यंत सरकारनं याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा 1 ऑगस्टला संप पुकारु असा इशारा टॅक्सी चालक संघटनेकडून देण्यात आला आहे.

रिक्षाचंही भाडं वाढणार?

दरम्यान, रिक्षाचं भाडं वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रिक्षाचं भाडं 3 रुपयांनी वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या दीड किलोमीटरसाठी असलेलं रिक्षाचं भाडं 21 रुपयांवरुन 24 रुपये करावं, अशी मागणी करण्यात आली आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमएमआरटीए म्हणजे मु्ंबई मेट्रोपॉलिटीअर रिजन ट्रान्सपोर्ट ऑथोरीटी संपाच्या भूमिकेबाबत काय निर्णय घ्यायचा हे ठरवण्यासाठी बैठक घेणार असल्याचीही शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

दरवाढीची मागणी का?

पेट्रोल डिझेलच्या दरांचा सर्वाधिक फटका वाहतूक सेवेशी संबंधित असणाऱ्यांना बसल आहे. दुसरीकडे सीएनजीचे दरही दुप्पट वाढले आहे. सीएनजी आता 80 रुपये किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे 25 टक्के दरवाढ करण्याची गरज असल्याचं टॅक्सी युनियनचं म्हणणं आहे. दर दिवशी 300 रुपयांचं नुकसान टॅक्सी चालकांचं होत असल्याचा दावाही टॅक्सी युनियनं केलाय. तसंच टॅक्सी चालक हे कमावतात कमी आणि दंड जास्त भरतात, अशी सध्याची अवस्था आहे. वाहतूक पोलिसांकडून ई-चलान काढलं जात असल्यामुळे टॅक्सी चालकांना त्याचाही दुहेरी फटका बसतोय. दुसरीकडे रिक्षा संघटनांनी दरवाढीवर उपायची सुचवला आहे.

सीएनजीच्या दरात कपात केली, तर भाडेवाढही टाळता येऊ शकेल, असं शशांक राव यांनी टाईम्सशी बोलताना म्हटलं होतं. इंधनाचे दर नियंत्रणात आणले तर दरवाढीचा सामना करण्याची गरजच भासणार नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, आता 1 ऑगस्टआधी टॅक्सी आणि रिक्षाच्या दरवाढीबाबत काही निर्णय होतो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसा निर्णय झाला तर टॅक्सी रिक्षाने प्रवास करणाऱ्यांच्या खिशावर अतिरीक्त भार पडणार, हे नक्की.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.