भाजप शिवसेनेला प्रमुख पद देण्याच्या आताही मनस्थितीत नाही; महेश तपासेंची भाजपवर जोरदार टीका; एकनाथ शिंदेवरही हल्लाबोल

केंद्रीय सुरक्षा दलाचा गराडा त्या ठिकाणी असून आणि पोलिसांच्या दबावामध्ये आमदारांना ठेवण्यात आले आहे, त्यामुळे भारतीय संविधानाची पायमल्ली भाजपकडून करायची आहे, त्यामुळेच या आमदारांचे अपहरण केलं असल्याचा आरोपही तपासे यांनी केला आहे.

भाजप शिवसेनेला प्रमुख पद देण्याच्या आताही मनस्थितीत नाही; महेश तपासेंची भाजपवर जोरदार टीका; एकनाथ शिंदेवरही हल्लाबोल
भाजपकडून भारतीय संविधानाची पायमल्लीः महेश तपासेंची टीकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 4:52 PM

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनीही भाजपची खेळी असल्याचं सांगत भाजपवर टीका केली आहे. ही सगळी खेळी भाजप (BJP) छुप्या पद्धतीने खेळत असून जिकडे त्यांचं सरकार आहे तिकडेच विमान घेवून जातात, त्यांच्याच पोलीस संरक्षणात आमदाराना घेऊन जातात, आसामला स्पेशल फ्लाईटने घेऊन जातात अशी टीकाही त्यांनी केली आहे.

केंद्रीय सुरक्षा दलाचा गराडा त्या ठिकाणी असून आणि पोलिसांच्या दबावामध्ये आमदारांना ठेवण्यात आले आहे, त्यामुळे भारतीय संविधानाची पायमल्ली भाजपकडून करायची आहे, त्यामुळेच या आमदारांचे अपहरण केलं असल्याचा आरोपही तपासे यांनी केला आहे.

कुणावर अन्याय झाला नाही

महेश तपासे आज डोंबिवली येथील पालिका मुख्यालयातील पत्रकार पक्षात आले होते, त्यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणावरून भाजपवर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस राष्ट्वादीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्याबाबत बोलताना तपासे यांनी 2019 मध्ये महाविकास आघाडी झाली तेव्हा कॉमन मिनिमम प्रोग्रामचा अजेंडा होता, त्यानुसार अडीच वर्षे सरकार चालले, दोन वर्षे कोरोनाध्ये गेली, या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी विविध योजना व आमदारांना भरघोस निधी दिला आहे, त्यामुळे कुणावर अन्याय झाला अशी परिस्थिती नाही.

ठाकरेंना दिलेला शब्द भाजपने फिरवला

जो पेचप्रसंग निर्माण झाला आहे तो अंतर्गत विषय असला तरी तो मार्गी लागेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे निष्ठावान नेते आहेत ते पून्हा येतील अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे. पुढे बोलताना तपासे यांनी भाजपसोबत जर सत्ता स्थापन करायची असती तर ती 2019 साली झाली असती, भाजपने ठाकरे यांना दिलेला शब्द फिरवला, त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपला यश मिळणार नाही

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाबाबत राष्ट्रवादीची भूमिका काय आहे याबाबत बोलताना तपासे यांनी काल दिल्लीतील पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा विषय शिवसेनेने हाताळावा आम्ही शिवसेनेसोबत आहोत, काँगेसचीदेखील हीच भूमिका आहे, भाजपच्या या प्रयत्नाला यश मिळणार नाही भाजपमध्ये गेलेले सर्व आमदार पुन्हा स्व-घरी येतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सरकार अजिबात डळमळीत झालेलं नाही जी लोकं नाराज होवून गेली असतील ते पुन्हा परततील, शिवसेना त्यासाठी प्रयत्न करत आहे, भाजपाला सरकार पाडण्यात यश मिळणार नाही असा दावाही त्यांनी यावेली केला आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.