Cyrus Mistry: मर्सिडीजही वाचवू शकली नाही प्राण, टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू, वाढत्या अपघातांचे करायचे काय?

अपघात झाल्यानंतर काही क्षण कुणालाच काही समजले नाही. घटनास्थळीच सायरस मिस्त्री यांचा  मृत्यू झाला. त्यानंतर काही काळ सायरस मिस्त्री यांचा मृतदेह रस्त्याच्या क़ेलाच प़डून होता. रस्त्यावर जाणाऱ्या प्रवाशांनी मदत केली.

Cyrus Mistry: मर्सिडीजही वाचवू शकली नाही प्राण, टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू, वाढत्या अपघातांचे करायचे काय?
वाढते अपघात, करायचे काय?Image Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 12:01 PM

मुंबई- टाटा समुहाचे माजी अध्यक्ष (Former Chairman of Tata Sons)आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा पालघरजवळ अपघातात मृत्यू (dead in accident) आहे. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईकडे परतत असताना हा अपघात झाला. त्यांच्यासोबत इतर चार जण प्रवास करत होते. त्यातील एकाचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. सायरस मिस्त्री हे मर्सिडिजने प्रवास करीत होते. पालघरजवळ सूर्या नदीवर असलेल्या चारटोली ब्रिजवर त्यांच्या मर्सिडिज कारने डिव्हायडरला धडक दिल्याने हा अपघात घडला. यात घटनास्थळीच सायरस मिस्त्री आणि आणखी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात जखमी झालेल्या इतर दोघांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे.

मर्सिडिजही वाचवू शकली नाही प्राण

हा अपघात इतका जबरदस्त होता की मर्सिडिजचा पुढचा भाग पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. गाडीचा वेगही जोरात असण्याची शक्यता आहे. गाडीने डाव्या बाजूने डिव्हायडरला धडक दिली असल्याचे अपघातग्रस्त गाडीकडे पाहून कळते आहे. मर्सिडिजसारखी महागडी गाडी असतानाही, क्षणात घडलेल्या या दुर्घटनेत प्रसिद्ध उद्योगपतीचे प्राण वाचू शकलेले नाहीत.

रस्त्याच्या कडेलाच पडला होता मृतदेह

अपघात झाल्यानंतर काही क्षण कुणालाच काही समजले नाही. घटनास्थळीच सायरस मिस्त्री यांचा  मृत्यू झाला. त्यानंतर काही काळ सायरस मिस्त्री यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेलाच प़डून होता. रस्त्यावर जाणाऱ्या प्रवाशांनी मदत केली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यावेळी गाडीतून कोण प्रवास करत होते, याची माहिती सगळ्यांना कळाली. एवढ्या मोठ्या उद्योगपतीचा असा दुर्दैवी मृत्यू  झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येते आहे.

रस्त्यांवरील अपघात रोखायचे कसे?

गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवरील अपघातात मोठी वाढ होताना दिसते आहे. काही दिवसांपूर्वीच मराठा संघटनांच्या बैठकीला येण्यासाठी बीडहून निघालेले शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात असाच मृत्यू झाला होता. रस्त्यांवर वाढलेली वाहतूक, वाहनांची गती, शिस्तीचे आणि नियमांचे न होणारे पालन यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत. अशा स्थितीत सरकारने रस्ते वाहतुकीकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.