BMC Election Reservation 2022 : किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, शीतल म्हात्रे, रवी राजांना दिलासा, प्रभाकर शिंदे, सातमकरांचं टेन्शन वाढलं

BMC Election Reservation 2022 : माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे, श्रद्धा जाधव आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांचे मतदारसंघ सेफ आहेत. त्यामुळे हे नगरसेवक पुन्हा निवडणुका लढवून महापालिकेत परतणार आहेत.

BMC Election Reservation 2022 : किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, शीतल म्हात्रे, रवी राजांना दिलासा, प्रभाकर शिंदे, सातमकरांचं टेन्शन वाढलं
किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, शीतल म्हात्रे, रवी राजांना दिलासाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 2:48 PM

मुंबई: संपूर्ण मुंबईचंच नव्हे तर राज्याचं लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेच्या (bmc) आरक्षणाची सोडत अखेर निघाली आहे. या आरक्षण (reservation) सोडतीत अनेक नगरसेवकांचे मतदारसंघ कायम राहिले आहेत. काही मतदारसंघ आरक्षित झाले आहेत. त्यामुळे सध्या नगरसेवकांमध्ये कही खुशी, कही गम असे चित्रं निर्माण झालं आहे. ज्यांचे मतदारसंघ महिला राखीव झालेत ते आपल्या पत्नी, मुलगी, आई किंवा बहिणीला निवडणूक मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. तर ज्यांचे मतदारसंघ एससी आणि एसटीसाठी राखीव झालेत त्यांना नवा मतदारसंघ शोधावे लागणार आहेत. महापालिका निवडणूक सप्टेंबरमध्ये होण्याचा अंदाज असला तरी अनेक नगरसेवक आणि इच्छुक आतापासूनच आपल्या मतदारसंघासाठी सेटिंग करण्यास सुरुवात करणार असल्याचं चित्रं आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, शीतल म्हात्रे आणि काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचे मतदारसंघ जैसे थेच राहिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर, भाजप नगरसेवक आणि पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे आणि शिवसेनेचे (shivsena) नगरसेवक मंगेश सातमकर यांचे मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांचा पालिकेत परतण्याचा मार्ग बंद झाला आहे.

माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे, श्रद्धा जाधव आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांचे मतदारसंघ सेफ आहेत. त्यामुळे हे नगरसेवक पुन्हा निवडणुका लढवून महापालिकेत परतणार आहेत. राष्ट्रवादीच्या नगरसेविका राखी जाधव, सईदा खान आणि, काँग्रेसचे नगरसेवक रवी राजा, काँग्रेसच्या नगरसेविका संगिता हंडोरे यांचे मतदारसंघही सुरक्षित आहेत. तर भाजपचे प्रभाकर शिंदे आणि शिवसेनेचे मंगेश सातमकर यांचे मतदारसंघ महिला राखीव झाले आहेत. त्यामुळे ज्यांचे मतदारसंघ राखीव झाले आहेत. त्यांना नव्या मतदारसंघांचा शोध घ्यावा लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

कही खुशी

>> वॉर्ड 199- किशोरी पेडणेकर (खुला) >> वॉर्ड 7- शीतल म्हात्रे, शिवसेना (खुला) >> वॉर्ड 131- राखी जाधव, राष्ट्रवादी (सर्वसाधारण महिला) >> वॉर्ड 150- संगिता हंडोरे, काँग्रेस (सर्वसाधारण महिला) >> वॉर्ड 176- रवी राजा, काँग्रेस (सर्वसाधारण) >> वॉर्ड 202- श्रद्दा जाधव, शिवसेना, (सर्व साधारण महिला) >> वॉर्ड 209- यशवंत जाधव, शिवसेना (सर्वसाधारण)

कही गम

>> वॉर्ड 175- मंगेश सातमकर, शिवसेना (सर्वधारण महिला) >> वॉर्ड 106- प्रभाकर शिंदे, भाजप, (सर्वसाधारण महिला)

आरक्षण कुणाला किती?

  1. एससीच्या एकूण जागा 15 आहेत. त्यात महिलासांठी 8 जागा राखीव आहेत.
  2. एसटीसाठी एकूण जागा 2, त्यात महिलांसाठी एक जागा राखीव
  3. सर्वसाधारण महिलांसाठी 219 जागा. त्यात महिलांसाठी 109 जागा राखीव

अनुसूचित जातीसाठीचे राखीव मतदारसंघ

60, 85, 107, 119, 139, 153, 157, 162, 165, 190, 194, 204, 208, 215, 221

अनुसूचित जमातीसाठीचे राखीव मतदारसंघ

55, 124

यांचे मतदारसंघ राखीव

>> 60 – योगीराज दाभाडकर भाजप >> 85- ज्योती अळवणी भाजप अजा महिला >> 107  समिता विनोद कांबळे (भाजप >> 119-मनिषा रहाटे राष्ट्रवादी >> 139- अख्तर अब्दुल रज्जाक कुरेशी सपा (अजा महिला) >> 153 अनिल पाटणकर शिवसेना >> 157 आकांक्षा शेट्ये शिवसेना >> 162 वाजीद कुरेशी काँग्रेस >> 165आश्रफ आजमी काँग्रेस (अजा महिला) >> 190 शीतल गंभीर देसाई भाजप (अजा महिला >> 194- समाधान सरवणकर शिवसेना (अजा महिला) >> 204 – अनिल कोकीळ शिवसेना (अजा महिला) >> 208 – रमाकांत रहाटे शिवसेना >> 215 – अरुंधती दुधवडकर शिवसेना >>221 – आकाश पुरोहित भाजप

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.