संजय राऊतांना घरचा आहेर, शिवसेनेचे भास्कर जाधव म्हणतात, राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली नको, भाषण प्रगल्भतेनं घ्या, महाविकास आघाडीला काय केलं आवाहन?

परिपक्व राजकीय भाषण म्हणून या भाषणाकडे पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंच्या भाषणाबाबत दिलेली ही प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात आता चर्चेचा विषय ठरते आहे.

संजय राऊतांना घरचा आहेर, शिवसेनेचे भास्कर जाधव म्हणतात, राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली नको, भाषण प्रगल्भतेनं घ्या, महाविकास आघाडीला काय केलं आवाहन?
bhaskar jadhav on raj thackeray speechImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 2:38 PM

रत्नागिरीराज ठाकरे यांच्या पुण्यातल्या भाषणाची खि्लली उडवू नका, त्यांना हिणवू नका, त्यांचं भाषण गांभिर्याने घ्या, असं आवाहन केलंय चक्क शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी. हे भाषण राजकीयदृष्ट्या प्रगल्भतेचे आणि वैचारिक पद्धतीचे होते, या शब्दांत त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचे कौतुक केले आहे. सगळ्यांनीच या भाषणात राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले मुद्दे हे गांभिर्याने घेण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी मांडले. त्यांच्या भाषणाचा विषय हा कुणी चेष्ठेचे करु नका असं आवाहनही महाविकास आघाडीतील नेत्यांना भास्कर जाधव यांनी केलं आहे. परिपक्व राजकीय भाषण म्हणून या भाषणाकडे पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंच्या भाषणाबाबत दिलेली ही प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात आता चर्चेचा विषय ठरते आहे. भास्कर जाधव यांनी अशी भूमिका का मांडली, हाही विषय महत्त्वाचा मानला जातो आहे. या मागे खरोखरच विचार पटला ही भूमिका आहे की यामागे काही राजकीय गणिते आहेत, याचा अर्थ आता राजकीय जाणकार मंडळी लावत आहेत.

राज ठाकरेंनी भाषणात काल काय मांडले

राज ठाकरेंनी पुण्यात केलेल्या भाषणात अयोध्या दौऱ्यावरुन त्यांच्याविरोधात कसा ट्रॅप लावण्यात आला, आणि त्यानंतर अयोध्या दौरा का स्थगित केला, याची सविस्तर मांडणी केली. यामागे अनेक पापुद्रे असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख करत, त्यांनी यात अप्रत्यक्षपणे भाजपाकडेही बोट केले. राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसा आंदोलनाचा उल्लेख करत मातोश्री ही काय मशीद आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. राज्यात समान नागरी कायदा लागू करावा, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करावे, अशी मागणी पंतप्रधानांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मशिदीवरील भोंग्याच्या आंदोलनाला आलेले यश, आधीच्या आंदोलनांचे यशही त्यांनी यानिमित्ताने सांगितले. यापुढेही भोंग्याचे आंदोलन सुरुच राहील असे त्यांनी म्हटले आहे. राज्यात औरंगजेबाच्या कबरीवर ओवेसी नतमस्तक होतो आणि महाराष्ट्र शांत राहतो, याबाबत त्यांनी खेदही व्यक्त केला होता. अफजलखानाच्या कबरीचा झालेला विस्तार साठी त्यासाठी कोण फंडिंग करते असा सवालही त्यांनी या भाषणात उपस्थित केला होता. महाविकास आघाडीसोबत राहून बाळासाहेबांची प्रतिष्ठा शिवसेना संपवत असल्याची टीकाही त्यांनी केली होती.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे वैफल्यग्रस्त असल्याची राऊतांची टीका

या भाषणानंतर राज ठाकरे हे वैफल्यग्रस्त आहेत, त्यांना अयोध्येला जाण्यापासून कुमी रोखले होते, अशी खिल्ली उडवत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर टीका केली होती. अयोध्या दौऱ्याला एक खासदार विरोध करत असेल तर राज यांनी भूमिका घ्यायला हवी, अशी टीका त्यांनी केली होती. राज ठाकरे हिंदुत्ववादी ओवेसी असल्याची टीकाही राऊतांनी काल केली होती. औरंगजेबाच्या कबरीचा विषय हा केंद्र सरकारच्या हातात असल्याचे सांगत त्यांनी या कबरीबाबत निर्णय घ्यावा, असे राऊत म्हणाले होते. मातोश्रीनेच राज यांना मोठे केल्याची आठवणही त्यांनी करुन दिली होती. हिंदुत्वाची शाल यांनी कधी पांघरली असा सवालही त्यांनी केला होता. राऊतांसह आघाडीतील इतर नेतेही याबाबत राज ठाकरेंच्या सभेवर करमणूक सभा म्हणून सातत्याने टीका करीत आहेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.