BIG BREAKING | मंत्री उदय सामंत यांच्या बोटीचा मांडवा येथे अपघात

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात झालाय. संबंधित घटनेची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सामंत यांच्यासोबत अशाप्रकारची घटना घडण्याची ही दुसरी वेळ आहे. या अपघातातून सामंत हे बचावले आहेत. ते सुखरुप आहेत, अशी माहिती मिळत आहे.

BIG BREAKING | मंत्री उदय सामंत यांच्या बोटीचा मांडवा येथे अपघात
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 5:08 PM

रायगड : महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या बोटीला अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित दुर्घटना ही मांडवा येथे घडली आहे. मांडव्यात उदय सामंत यांची बोट जेट्टीला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बोटीवरील सर्वजण सध्या सुखरुप असल्याची माहिती समोर येतेय. बोटीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला, अशी चर्चा आहे. पण ही घटना नेमकी कशी घडली याबाबत अधिकृत माहिती प्रशासनाकडून जारी करण्यात आलेली नाही.

अलिबागला एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्योगमंत्री उदय सामंत हे आज अलिबागच्या दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमासाठी उदय सामंत हे बोटीतून अलिबागने जात होते. तिथे जात असताना बोटच्या पार्किंग दरम्यान पहिल्या पिलर नंतर दुसऱ्या पिलरला बोट धडकली. त्याच बोटीमध्ये उदय सामंत, त्यांचे सहकारी आणि इतर नेते होते. पण संपूर्ण स्थिती तातडीने नियंत्रणात आणण्यात आली. कुठेही कुणालाही दुखापत झालेली नाही. उदय सामंत हे सुखरुप आहेत, अशी माहिती आता समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बोटमध्ये उदय सामंत यांच्यासोबत माजी खासदार आणि छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती हे देखील होते. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्यभिषेक सोहळा नियोजनासंदर्भातील बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं. याच बैठकीसाठी दोन्ही बडे नेते मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून स्पीड बोटीने निघाले होते.

या बड्या नेत्यांची बोट मांडवा जेट्टीजवळ पोहोचल्यावर बोट चालक कॅप्टनने बोट वळवली. पण याचवेळी कॅप्टनचा बोटीवरील नियंत्रण सुटलं आणि बोट जेटीच्या खालच्या पिलरला जाऊन धडकली. सुदैवाने यावेळी बोटीचा वेग कमी होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली, अशी चर्चा आहे. या घटनेमुळे बोटीतील सर्व प्रवाशी घाबरले. पण नंतर चालकाने बोटीवर नियंत्रण मिळवत तिला सुखरुप लावली. त्यानंतर सर्वजण बोटीतून खाली उतरले.

याआधीही बोटीतून प्रवास करताना घडला होता धक्कादायक प्रकार

विशेष म्हणजे उदय सामंत यांच्यासोबत अशाप्रकारे घडणारी ही पहिली घटना नाही. याआधी जानेवारी महिन्यातही बोटीतून प्रवास करताना उदय सामंत यांच्यासोबत असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला होता. उदय सामंत हे गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा असा स्पीड बोटीने प्रवास करत होते. या दरम्यान, अचानक स्पीड बोट बंद पडली. बोटीतील यंत्रणा बंड पडल्याने बोट चालक कॅप्टनला आपात्कालीन संदेश पाठवणंही कठीण झालेलं. पण सामंत यांच्या स्वीय साहाय्यकाने तात्काळ दुसरी बोट बोलावलेली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.