ajit pawar baramati live speech | बायकोने घेतले नाहीत, एवढे किस कार्यकर्त्यांनी घेतले – अजित पवार

| Updated on: Aug 26, 2023 | 11:27 PM

Maharashtra Breaking and Marathi News Live : अजित पवार यांच्या बारामतीतील लाईव्ह भाषणाचे मुद्दे या लाईव्ह ब्ल़ॉगमध्ये आहेत, अजित पवार यांनी आज त्यांचं बारामतीत जोरदार स्वागत होत असताना त्यांनी सर्व विषयांवर भाष्य केलं आहे.

ajit pawar baramati live speech | बायकोने घेतले नाहीत, एवढे किस कार्यकर्त्यांनी घेतले - अजित पवार

मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच बारामतीला आले आहेत, त्यांचे बारामतीत आज जंगी स्वागत झाले, अजित पवार यांची प्रचंड मोठी स्वागत मिरवणूक बारामतीत दिसून येत आहे, अजित पवार हे पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत, यावेळी अजित पवार यांनी बारामतीकरांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे, मी जो कुणी आहे, तो आज बारामतीकरांमुळेच आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी आभार मानले आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Aug 2023 08:43 PM (IST)

    ajit pawar baramati live speech | बायकोने घेतले नाहीत, एवढे किस कार्यकर्त्यांनी घेतले आणि पुढे – अजित पवार

    अजित पवार बारामतीत त्याच्या स्वागत सभेत बोलताना म्हणतायत, एवढी रेटारेटी, एवढी गर्दी मला भेटण्यासाठी या आधी आयुष्यात कधी पाहिली नाही, अनेकांनी हातात हात घेतले, ढकला ढकली होत होती, हातात हात असताना कार्यकर्ते म्हणत होते, दादा सोडा, व्हढत्यायत, ढकलतायत, काहींनी तर किसच घेतले, है रे पठ्ठ्या, बायकोने घेतले नाहीत, एवढे किस कार्यकर्त्यांनी घेतले. अजित पवार यांचा हा दिलखुलास अंदाज आता बारामतीत दिसून आला. त्यांनी मनमोकळेपणाने बारामतीकरांनी केलेल्या स्वागताला उत्तर देताना अशा शब्दात दाद दिली.

  • 26 Aug 2023 08:38 PM (IST)

    ajit pawar baramati live speech | मी मुख्यमंत्र्यांचा व्याप कमी करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यात …. – अजित पवार

    मी मुख्यमंत्र्यांचा कामाचा व्याप कमी करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यात मी आढावा घेतला तर गैरकाय, एकनाथ शिंदे यांचं काम हलक करण्यासाठी बैठक घेतली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याविषयी कोणतीही हरकत नाही, असं अजित पवार यांनी बारामतीतील त्यांच्या स्वागत सभेत बोलताना सांगितली, अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बारामतीत दाखल झाले त्यांचं मोठ्या जल्लोषात जंगी स्वागत करण्यात येत आहे.

  • 26 Aug 2023 08:28 PM (IST)

    ajit pawar baramati speech live | एकच वादा अजितदादा या घोषणेला- अजितदादांचं भर सभेत उत्तर, उद्याचं ये …

    बारामतीत अजित पवार आज दाखल झाले आहेत, त्यांची स्वागत सभा सुरु असताना एका कार्य़कर्त्याने जोरदार घोषणाबाजी त्यांच्यासाठी केली, कार्य़कर्त्यांनी एकच वादा, अजितदादा ही घोषणाबाजी सुरु ठेवली, या दरम्यान मिश्किल अजितदादा यांच्यातला मिश्किलपणा पुन्हा जागृत झाला आणि एकच वादा अजितदादा या घोषणेला उत्तर देताना म्हणाले, राहू दे, राहु दे, जोर राहु दे … उद्याच ये आणि एजन्सी याला देऊन टाका

  • 26 Aug 2023 08:22 PM (IST)

    ajit pawar baramati live speech | अजित पवार भरसभेत भराभर सांगितली संस्थांची नावं, साखर कारखाने आणि सोसायट्या

    अजित पवार यांनी बारामतीच्या त्यांच्या स्वागत सभेत संस्थाची आणि साखर कारखान्यांची नावं वाचून दाखवली, काही कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सध्या होत नसल्याने संधी मिळत नाही, यानंतर कोणकोणत्या संस्था आहेत, जेथे प्रतिनिधित्व देतो येईल याची तोंडी यादीच त्यांनी बारामतीच्या सभेत वाचून दाखवली. सुदैवाने सत्तेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे – अजित पवार

  • 26 Aug 2023 08:18 PM (IST)

    ajit pawar baramati live speech | तुम्ही झोपेत असताना मी कामं करतो, कारण … – अजित पवार

    तुम्ही झोपेत असताना मी कामं करतो – अजित पवार

    तुमच्या गर्दीमुळे कामाची साईटच पाहता येत नाही, म्हणून मी पहाटेच साईट पाहून येतो – अजित पवार

    केंद्राने पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या आहेत – अजित पवार

  • 26 Aug 2023 08:09 PM (IST)

    ajit pawar baramati speech | पुणे – नगर – नाशिक रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न करणार – अजित पवार

    पुणे – नगर – नाशिक रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न करणार – अजित पवार

    सुदैवाने राज्याच्या तिजोरीची चावी आपल्याकडे आली – अजित पवार

    मी सत्तेसाठी हापापलेलो नाही, ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही – अजित पवार

  • 26 Aug 2023 08:03 PM (IST)

    ajit pawar speech baramati | भावना असते, श्रद्धा असते, पण नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागतो – अजित पवार

    मी कामात रममाण होणारा कार्यकर्ता, मला काम करायला आवडतं, मी जातीचा-पातीचा, नात्याच्या-गोत्याचा विचार केला नाही, शेवटच्या घटकालाही वाटलं पाहिजे हा व्यक्ती आपल्यासाठीही काम करतो, अनेकवेळा पद भोगत असताना ते लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो. लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमी कामं केली – अजित पवार

    विकासकामं करताना कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. भावना असते, श्रद्धा असते, पण नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागतो, लोक टीका करतात, पण नव्या पिढीला माहित आहे, हे सर्व बारामतींकरांसाठी मी करतो- अजित पवार

    बारामतीकरांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही-अजित पवार

    मी जसा आहे, तो बारामतीकरांमुळेच-अजित पवार

    मला पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची संधी एकनाथरावांच्या मंत्रिमंडळात मिळाली-अजित पवार

    बारामतीकरांचे मनापासून आभार-अजित पवार

    शाहु, फुले, आंबेडकरांचा विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम मी करत आलो आहे-अजित पवार

  • 26 Aug 2023 05:53 PM (IST)

    Ajit pawar baramati speech : पुणे – नगर – नाशिक रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न करणार – अजित पवार

    बारामती :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज बारामतीत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात येत आहे. अजित पवार यांना आज बारामतीकरांकडून नागरी सत्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. त्याआधी त्यांची कार्यकर्त्यांकडून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार हे त्यांच्यासोबत आहेत. अजित पवार नुकतंच बारामतीतील कसबा चौकात दाखल झाले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात, जेसीबाने फुलांची उधळण करत अजित पवारांचं बारामतीत स्वागत करण्यात आलं. अजित पवार यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात कोणतीही कसूर सोडली नसल्याचं बघायला मिळत आहे.

  • 26 Aug 2023 04:25 PM (IST)

    CM Eknath Shinde News : मविआच्या काळात काही नेत्यांवर खोटे आरोप

    महाविकास आघाडीच्या काळात राज्यातील काही नेत्यांवर खोटे आरोप करण्यात आले. त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. आज सीबीआयने काही प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याचे त्यांनी सांगितले.

  • 26 Aug 2023 04:00 PM (IST)

    Amravati News : जिल्हा स्त्री रुग्णालयात वीज गायब

    अमरावती जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन तासांपासून बत्तीगुल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रुग्णांचे प्रचंड हाल सुरु आहे. याविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  • 26 Aug 2023 01:53 PM (IST)

    नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात मोठी माहिती समोर

    नितीन देसाई आत्महत्या प्रकरणामधील आरोपी रशेस शाहा आणि इतरांचे फोन बंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासोबतच ते घरात आणि कार्यालयातही नसल्याचं समोर आलं आहे.

  • 26 Aug 2023 01:43 PM (IST)

    विद्यार्थ्यांचा पाया कसा मजबूत होणार?

    अमरावती जिल्ह्यातील घुईखेड येथील प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना चौथीचे विद्यार्थी शिकवण्याचे व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शाळेत शिक्षक गैरहजर असल्याने विद्यार्थ्यांचे विद्यार्थी शिक्षक बनले. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा यामुळे पाया कसा मजबूत होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

  • 26 Aug 2023 01:30 PM (IST)

    आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून 24 ऑगस्टला यादी जाहीर

    ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अमोल काळे यांची श्री तिरुपती देवस्थानच्या विश्वस्तपदी वर्णी लागली आहे. श्री तिरुपती देवस्थानच्या नव्या सदस्यांची यादी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून 24 ऑगस्टला यादी जाहीर करण्यात आलीये. मिलिंद नार्वेकर यांची दुसऱ्यांदा तर अमोल काळे पहिल्यांदाच सदस्य झाले आहेत.

  • 26 Aug 2023 01:11 PM (IST)

    अजित पवार आज बारामती दौऱ्यावर

    पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत करणार मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहेत. अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. दौऱ्याची सुरुवात सुप्यातील नवीन पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाने करणार असून थोड्या वेळात अजित पवारांच्या हस्ते पोलीस स्टेशनचं उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच बारामतीला आले आहेत.

  • 26 Aug 2023 01:00 PM (IST)

    PM Modi : पंतप्रधानांनी सांगितला शिवशक्तीचा अर्थ

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज दिल्लीत भव्य स्वागत करण्यात आलं. चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर जिथे उतरला, त्या जागेला शिवशक्ती पॉइंट नाव देण्यात आलय. शिव म्हणजे शुभम आणि शक्ती म्हणजे देशातील नारी शक्ती असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • 26 Aug 2023 12:54 PM (IST)

    Madurai train fire | मदुराई एक्सप्रेसच्या आगीबद्दल प्रवाशाने सांगितला भयानक अनुभव

    “मी मधल्या सीटवर झोपली होती. आगीबद्दल ऐकताच. आम्ही लगेच पळत सुटलो. खिडकीजवळ पोहोचलो. पण खिडकी बंद होती. मग आम्ही कशीबशी खिडकी उघडली. जे मागे होते ते पळाले. जे पुढे बसले होते, ते अडकले” असं मदुराई एक्सप्रेसला लागलेल्या आगीत जखमी झालेल्या रेखा म्हणाल्या.

  • 26 Aug 2023 12:31 PM (IST)

    Sanjay Shirsat : ‘अजित पवार यांना शंभर खोके म्हणायची ताकत आहे का?’

    “शरद पवार हे जे बोलतात ते करत नाहीत. तुमच्या आघडीमध्ये बिघाडी झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी बडबड करणाऱ्या भोंग्यांना लाथ मारून बाहेर काढले पाहिजे” असं संजय शिरसाठ म्हणाले. “सुप्रिया सुळे यांना पुढे आणायचे आहे. अजित पवार सभा घेत आहेत, ती सभा शरद पवार यांना चॅलेंज करणारी सभा नाही. उद्धव ठाकरे जे सभा घेत आहेत, त्यातून काही होणार आहे का?. अजित पवार यांना शंभर खोके म्हणायची ताकत आहे का?” असा सवाल संजय शिरसाठ यांनी विचारला.

  • 26 Aug 2023 12:12 PM (IST)

    Girish Mahajan : ‘कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काँग्रेसने 350 रुपयांची मदत केलीय का?’

    “कांद्याला 4 हजार रुपये भाव द्या असं विजय वेडट्टीवार म्हणत आहेत. 350 रुपयांची मदत यापूर्वी कधी केलीय का?. तोंडात येईल तो शब्द काढत आहेत. बातम्या छापून येण्यासाठी बोलू नका. शेतकरी हिताचे बोला. नाफेडबाबत डॉ भारती पवार आणि इतर सर्वांना घेऊन चर्चा करू. स्टोरेज वाढविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे” असं गिरीश महाजन म्हणाले.

  • 26 Aug 2023 11:54 AM (IST)

    अजित पवारांची उद्या बीडमध्ये जाहीर सभा

    अजित पवारांची उद्या बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. जाहीर सभेच्या निमित्ताने अजित पवार गटाचे बीडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. अजित पवारांच्या स्वागतासाठी संपूर्ण बीड शहरात मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. बीडमध्ये लागलेल्या अजित पवारांच्या स्वागत बॅनरवरती शरद पवारांचे फोटो अद्यापही कायम आहेत. माझे फोटो वापरू नका अन्यथा, कायदेशीर कारवाई करणार असा इशारा शरद पवारांनी दिला होता.

  • 26 Aug 2023 11:52 AM (IST)

    ३ हजार ४८७ विद्यार्थी मुख कर्करोग होण्याच्या उंबरठ्यावर

    नागपूर विभागातील आठवी आणि नववीच्या वर्गात शिकणारे तब्बल ३ हजार ४८७ विद्यार्थी मुख कर्करोग होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. नागपूरातील शासकीय दंत महाविद्यालयाने केलेल्या मुख तपासणीत हे धक्कादायक वास्तव पुढे आलं आहे.

  • 26 Aug 2023 11:43 AM (IST)

    शरद पवार थोड्याच वेळात घेणार शाहू समाधी स्थळाचे दर्शन घेणार

    राष्ट्रवादीचे नेते शरद पवार थोड्याच वेळात घेणार शाहू समाधी स्थळाचे दर्शन घेणार आहेत. कोल्हापुरातील नर्सरी बागेतल्या समाधी स्थळाचे दर्शन घेणार आहेत अशी माहिती समजली आहे.

  • 26 Aug 2023 11:16 AM (IST)

    लोकं त्यांना जागा दाखवतील म्हणून निवडणुकांना विलंब, शरद पवारांचा भाजपला खोचक टोला

    लोकं त्यांना जागा दाखवतील म्हणून निवडणुकांना विलंब, शरद पवारांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. आज शरद पवार कोल्हापूरात अनेक ठिकाणी भेट देणार आहेत.

  • 26 Aug 2023 11:14 AM (IST)

    भाजप आणि भाजपला पाठींबा देणाऱ्या जनतेमध्ये सध्या संभ्रम निर्माण – शरद पवार

    भाजप आणि भाजपला पाठींबा देणाऱ्या जनतेमध्ये सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. युवकांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजी आहे.महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत लवकरचं निर्णय घेणार आहोत . राहूल गांधीच्या भारत जोडो यात्रेने विरोधकांची स्थिती सुधारली असल्याचं शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये सांगितलं आहे.

  • 26 Aug 2023 10:57 AM (IST)

    सातारा : राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात, ३ ठार

    सातारा येथे राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात होऊन तीन जण ठार तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. टायर फुटल्याने कारची टेम्पोला धडक बसून हा अपघात झाल्याचे समजते.

  • 26 Aug 2023 10:47 AM (IST)

    मुश्रीफांचं बोलणं हास्यास्पद आहे – जितेंद्र आव्हाड

    मुश्रीफ 18 वर्ष मंत्री होते, त्यांनी काय केलं मग ? जितेंद्र आव्हाडांचा मुश्रीफांना सवाल

    इतकी वर्ष मंत्रीपद उपभोगल्यानंतरही मुश्रीफांचं रडगाणं सुरू आहे, आव्हाडांचा टोला

  • 26 Aug 2023 10:34 AM (IST)

    अजित पवार आज बारामती दौऱ्यावर

    उपमुख्यमंत्री झाल्यावर अजित पवार आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये येणार असून तेथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. त्यांची आज सभाही होणार आहे.

  • 26 Aug 2023 10:15 AM (IST)

    पक्ष सोडून गेलेल्यांवर टीका करून महत्व देणार नाही – शरद पवार

    जे पक्ष सोडून गेले त्यांच्यावर टीका करून त्यांना महत्व देणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

    मुश्रीफांवर ईडीची कारवाई सुरू होती, ती नंतर थांबली. त्यांनी कोणाशी संवाद साधला मला माहीत नाही, अशा शब्दांत मुश्रीफांच्या प्रश्नावर पवारांनी उत्तर दिले.

  • 26 Aug 2023 10:09 AM (IST)

    1 सप्टेंबर रोजी ‘इंडिया’ची मुंबईत बैठक – शरद पवार

    येत्या 1 सप्टेंबर रोजी ‘इंडिया’ची मुंबईत बैठक होणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. या बैठकीला विविध पक्षांचे अध्यक्ष उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

  • 26 Aug 2023 10:04 AM (IST)

    आमदार म्हणजे पक्ष नाही – शरद पवार

    आमच्यातून काही आमदार बाजूला झाले ही वस्तूस्थिती. पण काही आमदार बाजूला गेले म्हणजे पक्षात फूट नाही. आमदार म्हणजे काही पक्ष नाही, असे शरद पवार म्हणाले.

  • 26 Aug 2023 10:00 AM (IST)

    Shard Pawar : सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर

    लोकसभा निवडणुकीला कसे समोरे जावे यासंदर्भात निर्णय इंडिया आघाडीच्या बैठकीत होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. सताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर करुन विरोधी पक्षांना तोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा वापर शरद पवार यांनी केला.

  • 26 Aug 2023 09:57 AM (IST)

    Ajit Pawar andhasan mushrif : अजित पवार यांच्यासोबत का गेलो?

    आम्ही अजित पवार यांच्यासोबत का गेलो? हे याआधी सांगितले आहे. आमचा हा निर्णय पक्षाच्या विस्तारासाठी आहे. हा सामूहीक निर्णय आहे. याबाबतच्या चर्चा आमच्या दैवताबरोबर झाल्या होत्या, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

  • 26 Aug 2023 09:50 AM (IST)

    Pune News : पुणे मनपाने तोडली झाडे

    पुण्यात महानगरपालिकेचा अजब कारभार समोर आला आहे. महानगरपालिकेकडून रस्ता रुंदीकरणासाठी 35 झाडांची कत्तल करण्यात आली. पुण्यातील शास्त्रीनगर भागातील रस्त्यांच्या कामासाठी ही झाडे तोडण्यात आली.

  • 26 Aug 2023 09:37 AM (IST)

    Pune News : गावांचा विकास आराखडा रखडला

    पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांचा विकास आराखडा अद्याप रखडलेला आहे. 2017 साली समाविष्ट झाल्या गावांचा डीपीआर अद्याप तयार झालेला नाहीच. पुणे शहराच्या हद्दी लगतची ११ गावे २०१७ मध्ये महापालिकेत समाविष्ट झाली आहे.

  • 26 Aug 2023 09:22 AM (IST)

    Ajit Pawar : अजित पवार बारामतीमध्ये

    अजित पवार यांचा आज बारामतीत जाहीर कार्यक्रम होणार आहे. यासंदर्भात स्थानिक वर्तमानपत्रात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांनी जाहिरात दिली आहे. जाहिरातीत फक्त अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांचा फोटो आहे.

  • 26 Aug 2023 09:05 AM (IST)

    Fire : लखनऊवरुन रामेश्वरम जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यास आग

    तामिळनाडूमधील मदुराईमधील एका रेल्वेचा डब्यास आग लागली. या रेल्वेतील आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही रेल्वे लखनऊवरुन रामेश्वरम येथे जात होती. रेल्वेच्या टूरिस्ट कोचमध्ये ही आग लागली. सकाळी 5.15 वाजता ही घटना घडली.

  • 26 Aug 2023 09:02 AM (IST)

    Fire : तामिळनाडूच्या मदुराईमध्ये रेल्वेला भीषण आग, आठ जणांचा मृत्यू

    तामिळनाडूमधील मदुराईमधील एका रेल्वेचा भीषण अपघात झाला. या रेल्वेच्या एका डब्यास आग लागली. या आगीत आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

  • 26 Aug 2023 08:46 AM (IST)

    pm narendra modi : मोदी यांच्या तीन घोषणा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रो मुख्यालयातून तीन मोठ्या घोषणा केल्या. चंद्रावरील दोन पाईंटचे नामकरण शिवशक्ती आणि त्रिरंगा करण्यात आले. त्यानंतर २३ ऑगस्ट हा दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

  • 26 Aug 2023 08:40 AM (IST)

    pm narendra modi : भारत विज्ञान तंत्रज्ञनाच्या जोरावर ग्लोबल लीडर बनेल : मोदी

    तुम्ही जो ठरवता ते करून दाखवता हे तुम्ही दाखवून दिलं आहे. देशातील जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे. विश्वास कमावणे ही सोपी गोष्ट नाही. देशातील जनतेचा आशीर्वाद आहे. त्यामुळेच भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ग्लोबल लीडर बनेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

  • 26 Aug 2023 08:36 AM (IST)

    pm narendra modi : चंद्रयान मोहिमेचं यश हे साधारण यश नाही : मोदी

    आपण चंद्रयान मोहीम यशस्वी केलीय. हे साधारण यश नाहीये., तर अनंत ब्रह्मांडात भारताची वैज्ञानिक क्षेत्रातील उपस्थिती आहे. आज भारत चंद्रावर आहे आणि चंद्रावर भारताचा राष्ट्रीय गौरव आहे, असं मोदी म्हणाले.

  • 26 Aug 2023 08:34 AM (IST)

    pm narendra modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक, शास्त्रज्ञांशी संवाद साधताना गहिवरले

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रोतील शास्त्रज्ञांशी संवाद साधतान भावूक झाले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता. आजचं जे यश आहे ते निव्वळ आपल्या शास्त्रज्ञांचं यश आहे, असं मोदी म्हणाले.

  • 26 Aug 2023 08:23 AM (IST)

    pm narendra modi : 23 ऑगस्ट हा दिवस ‘नॅशनल स्पेस डे’ म्हणून जाहीर केला जाईल : मोदी

    23 ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला. त्यामुळे 23 ऑगस्ट हा दिवस ‘नॅशनल स्पेस डे’ म्हणून जाहीर केला जाईल. त्या दिवशी देशभर जल्लोष करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

  • 26 Aug 2023 08:22 AM (IST)

    pm narendra modi : तुम्ही तरुण पिढीवर यशाची छाप सोडलीय : मोदी

    तुम्ही संपूर्ण पिढीवर तुमच्या यशाची छाप सोडली आहे. आता कोणताही मुलगा रात्री चंद्राला पाहिल तेव्हा त्याला वाटेल माझा देश ज्या हिंमतीने पोहोचला, तीच हिंमत त्या मुलामध्ये निर्माण होईल. तुम्ही भारतीय मुलांमध्ये अपेक्षांचं बीज रोवलं आहे. उद्या त्याचं वटवृक्षात रुपांतर होईल, असं मोदी म्हणाले.

  • 26 Aug 2023 08:19 AM (IST)

    pm narendra modi : तुम्ही मेक इन इंडियाला चंद्रावर पोहोचवलं : मोदी

    तुम्ही मेक इन इंडियाला चंद्रावर पोहोचवलं आहे. तुम्ही जे प्रयत्न केले, ते देशवासियांना माहीत झालं पाहिजे. भारताच्या दक्षिणेपासून चंद्राच्या दक्षिणे ध्रुवापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. मून लँडरची सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांनी इस्रोने आर्टिफिशयल चंद्र बनवला. त्याची टेस्टही केली. एवढ्या परीक्षा दिल्यानंतर आपलं लँडर चंद्रावर गेलं. त्यामुळे यश मिळायलाच हवं होतं, असं मोदी म्हणाले.

  • 26 Aug 2023 08:14 AM (IST)

    pm narendra modi : चंद्रयान-2 चंद्रावर पोहोचलं त्या पॉइंटला ‘तिरंगा’ या नावाने संबोधणार : मोदी

    जेव्हा हर घर तिरंगा आहे. प्रत्येक मन तिरंगा आहे. चंद्रावरही तिरंगा आहे. त्यामुळे चंद्रयान-2शी संबंधित जागेला तिरंगा नावाशिवाय दुसरं काय नाव राहू शकतं? चंद्रयान-2ने चंद्राच्या ज्या पॉइंटवर गेलं होतं. त्या पॉइंटला तिरंगा हे नाव दिलं जाणार आहे, अशी घोषणा मोदी यांनी केली.

  • 26 Aug 2023 08:12 AM (IST)

    pm narendra modi : शिवशक्ती पॉईंट येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल : मोदी

    चंद्रयान मोहीमेत महिला वैज्ञानिकांनी मोठी भूमिका बजावली आहे. चंद्राचा शिवशक्ती पॉइंट भारताच्या या संशोधकांच्या प्रयत्नांचा साक्षीदार होईल. हा शिवशक्ती पॉइंट येणाऱ्या पिढींना प्रेरणा देणार. आपल्याला विज्ञानाचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी करायचा आहे. मानवतेचं कल्याण हीच आपली सर्वोच्च जबाबदारी आहे, अशी घोषणा मोदी यांनी केली.

  • 26 Aug 2023 08:08 AM (IST)

    pm narendra modi : चंद्रावर जिथे यान उतरलं त्या भागाला शिवशक्ती म्हणून संबोधणार; मोदींची घोषणा

    या मिशनने चंद्राचं रहस्य उलगडेलच. पण पृथ्वीवरील समस्यांचंही निराकरण केलं जाणार आहे. चंद्राच्या ज्या भागावर आपलं चंद्रयान उतरलं. त्या स्थानाला भारताने नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या स्थानावर चंद्रयान -3चं मून लँडर उतरलं आहे. त्या पॉईंटला शिवशक्ती या नावाने ओळखलं जाणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

  • 26 Aug 2023 08:05 AM (IST)

    pm narendra modi : चंद्रयान मोहीम केवळ भारताची नव्हे तर मानवजातीचं यश आहे : मोदी

    तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आपलं प्रज्ञान सातत्याने चालत आहे. आपल्या पायाचे ठसे चंद्रावर उमटवत आहे. मी फोटो पाहिले ते अद्भूत आहे. पृथ्वीच्या इतिहासात पहिल्यांचा चंद्राचे फोटो लोक पाहत आहे. आणि हे चित्र जगाला दाखवण्याचं काम भारताने केलं आहे. तुम्ही सर्व शास्त्रज्ञांनी केलं आहे. सर्व जग आज भारताच्या विज्ञान क्षेत्राचं आणि तंत्रज्ञानाचं कौतुक करत आहे. चंद्रयान महाभियान केवळ भारताची नव्हे तर संपूर्ण मानवजातीचं यश आहे, असं मोदी यांनी सांगितलं.

  • 26 Aug 2023 08:02 AM (IST)

    pm narendra modi : चंद्रावर पोहोचणं हा प्रेरणादायी क्षण : मोदी

    चंद्रावर पोहोचणं हा प्रेरणदायी क्षण आहे. आपलाच विजय झाल्याचं प्रत्येक भारतीयाला वाटत होतं. आपण कठीण परीक्षेत पास झाल्याचं प्रत्येक भारतीयांना वाटत होतं. आजही कौतुकांचा वर्षाव होत आहे. हे केवळ तुमच्यामुळेच शक्य झालं, असं मोदी म्हणाले.

  • 26 Aug 2023 08:00 AM (IST)

    pm narendra modi : हा नवा आणि निर्भिड भारत आहे, नवे स्वप्न नव्या पद्धतीने पाहणारा भारत आहे : मोदी

    तुम्ही चंद्रयान मोहीम यशस्वी केली ही साधी गोष्ट नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. भारत आज चंद्रावर आहे ही मोओठी अभिमानाची गोष्ट आहे. हा आपल्या देश गौरवाचा क्षण आहे. जिथे कोणीच गेलं नाही तिथे आपण पोहोचलो आहोत. कुणी केलं नाही केलं ते आपण केलं. हा आजचा भारत आहे, निर्भिड भारत. नवे स्वप्न नव्या पद्धतीने पाहणारा हा भारत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

  • 26 Aug 2023 07:57 AM (IST)

    pm narendra modi : तुम्हा सर्वांना मला सॅल्यूट करायचा आहे, तुमच्या परीश्रमाला हा सॅल्यूट आहे : मोदी

    मी दक्षिण आफ्रिकेत होतं. पण माझं मन तुमच्याकडे लागून राहिलेलं होतं. इस्रो सेंटरमध्ये आल्यावर मला वेगळाच आनंद वाटत आहे. भारतात येऊन लवकरात लवकर तुमचं दर्शन घ्यायचं होतं. तुम्हा सर्वांना मी सॅल्यूट करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

  • 26 Aug 2023 07:45 AM (IST)

    pm narendra modi : पंतप्रधान मोदी यांची इस्रोला भेट, शास्त्रज्ञांचं केलं अभिनंदन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रो सेंटरमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं. तर मोदी यांनीही प्रत्येक शास्त्रज्ञांचं अभिनंदन करतानाच त्यांच्याशी चर्चाही केली. इस्रो सेंटरमधील विक्रम लँडरच्या प्रतिकृतीही त्यांनी पाहिल्या आणि त्याचीही माहिती घेतली.

  • 26 Aug 2023 07:29 AM (IST)

    pm narendra modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो, इस्रो सेंटरकडे रवाना

    पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूत येताच थेट इस्रो सेंटरकडे निघाले आहेत. त्यांचा रोड सो सुरू आहे. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक हातात तिरंगा घेऊन उभे असून मोदींचं स्वागत करत आहेत. तर मोदी या सर्वांना अभिवादन करत आहेत.

  • 26 Aug 2023 07:17 AM (IST)

    rain : मुंबईसह ठाण्यात पावसाचं जोरदार आगमन, अनेक ठिकाणी पाणी भरलं

    मुंबईसह ठाण्यात आज पावसाने दमदार हजेरी लावली. बऱ्याच दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने आज पहाटे पहाटेच जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

  • 26 Aug 2023 07:07 AM (IST)

    pm narendra modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जय जवान, जय विज्ञानचा नारा, बंगळुरूत मोठी रॅली

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बंगळुरूत मोठी रॅली निघाली आहे. यावेळी त्यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. हा संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय जवान, जय विज्ञान, जय अनुसंधानचा नारा दिला. तसेच भारत माता की जयच्याही घोषणा दिल्या.

  • 26 Aug 2023 07:03 AM (IST)

    pm narendra modi : चांद्रयान मोहीम फत्ते, पंतप्रधान मोदी देणार शास्त्रज्ञांना शाबासकी

    चांद्रयान मोहीम यशस्वी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रोतील शास्त्रज्ञांचं अभिनंदन करणार आहेत. मोदी बंगळुरूत पोहोचले असून तिथून ते इस्रोच्या सेंटरमध्ये जाणार आहेत. यावेळी ते इस्रोच्या शास्त्रज्ञांना पुढच्या मिशनच्या शुभेच्छाही देणार आहेत.

Published On - Aug 26,2023 7:00 AM

Follow us
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.