Maharashtra Breaking News Live | राष्ट्रवादीतील घडामोडींनंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत जाणार

| Updated on: Aug 24, 2023 | 7:25 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्य आणि देशातील विविध सामाजिक, राजकीय घडामोडी जाणून घ्या.

Maharashtra Breaking News Live | राष्ट्रवादीतील घडामोडींनंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत जाणार
News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : भारत इतिहास घडवण्याच्या दिशने वाटचाल करत आहे. चांद्रयान -3 आज चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. त्यामुळे नवा इतिहास घडणार आहे. भारताच्या या मून मिशनकडे केवळ भारताचंच नव्हे तर जगाच्या नजरा खिळल्या आहेत. सलग तिसऱ्या दिवशी लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव बंद. कांदाप्रश्नी शरद पवार गट आक्रमक. आज नाशिकमध्ये आंदोलन करणार. तर, मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात ब्राह्मण समाजाची येवल्यात जाहीर सभा. भुजबळांच्या अटकेची मागणी करणार. यासह राज्य, देश आणि विदेशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Aug 2023 11:57 AM (IST)

    औरंगाबादमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा

    औरंगाबाद शहरातून बंजारा समाजच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. क्रांती चौकातून बंजारा समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. बंजारा समाजाचे शेकडो कार्यकर्ते क्रांती चौकात दाखल झालेत. क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर बंजारा समाज मोर्चा काढणार आहे. बंजारा आणि भामटे राजपूत समाजच्या आरक्षणात होणाऱ्या घुसखोरी विरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे.

  • 23 Aug 2023 11:45 AM (IST)

    स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

    केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णया विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. चाकण बाजारात घोषणाबाजी करत आंदोलन करत आहे. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झालेत. पुणे नाशिक महामार्ग आंदोलकांनी रोखलं आहे. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 23 Aug 2023 11:30 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या शनिवारी बारामतीत

    उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी बारामतीत असणार आहेत. राज्यातील राजकीय घडामोडीनंतर पहिल्यांदाच ते बारामतीत येणार आहेत. बारामतीकरांच्या वतीने अजित पवार यांचा नागरी सत्कार होणार आहे.  नागरी सत्कारापूर्वी अजित पवार यांची भव्य मिरवणूक निघणार आहे.  शनिवारी अजितदादांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे

  • 23 Aug 2023 11:15 AM (IST)

    आंदोलनाआधीच मनसे नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

    मनसे नेते दिनेश साळवी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईतील चारकोप इथं अॅमेझॉन कार्यालयावर मनसे कार्यकर्ते आंदोलन करणार होते. पण त्याआधी पोलीस दिनेश साळवी यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतलं. मनसेच्या आंदोलनापूर्वी अॅमेझॉन कार्यालयातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अॅमेझॉनवर पाकिस्तानचा झेंडा ऑनलाइन विकल्याच्या विरोधात मनसेचे कार्यकर्ते आज करणार होते. मात्र पोलिसांनी दिनेश साळवी यांना घरातून ताब्यात घेतलं आहे.

  • 23 Aug 2023 11:01 AM (IST)

    मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसई हद्दीत मोठी वाहतूक कोंडी

    मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसई हद्दीत सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वसई हद्दीतील मालजीपाडा, ससूनवघर, चिंचोटी, या परिसरात 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या आहेत.  अतिशय संथ गतीने वाहतूक सुरू आहे.

  • 23 Aug 2023 10:53 AM (IST)

    मद्य घोटाळा: झारखंडमधील 20 ठिकाणी ईडीचे छापे

    झारखंडमध्ये ईडीने छापे टाकले आहेत. मद्य घोटाळ्यात एकाच वेळी सुमारे 20 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. PMLAअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

  • 23 Aug 2023 10:33 AM (IST)

    सोलापूर : कांद्याचा लिलाव बंद पाडण्यासाठी आंदोलन

    सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले.

    कांदा लिलाव बंद पाडू नये यासाठी मार्केट यार्डबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

  • 23 Aug 2023 10:22 AM (IST)

    माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे ठाकरे गटात परतणार

    शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे ठाकरे गटात परतणार आहेत. आज मुंबईत ते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील. शेकडो कार्यकर्त्यांसह भाऊसाहेब वाकचौरे मुंबईकडे रवाना झालेत.

  • 23 Aug 2023 10:03 AM (IST)

    हिमाचल : शिमला आणि मंडी येथे मुसळधार पाऊस, लँडस्लाइडमुळे हायवे बंद

    हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मंडी भागात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. चक्की मोरजवळ दरड कोसळल्याने चंदीगड-शिमला महामार्ग पुन्हा एकदा बंद झाला आहे.

  • 23 Aug 2023 08:27 AM (IST)

    खिचडी घोटाळ्यात आज भाजप आमदार किरीट सोमय्या नवीन खुलासा करणार

    खिचडी घोटाळ्यात आज भाजप आमदार किरीट सोमय्या नवीन खुलासा करणार आहे. आज दुपारी दोन वाजता मुंबईच्या नरिमन पॉइंट परिसरात भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत खुलासा करणार आहेत.

  • 23 Aug 2023 08:21 AM (IST)

    कसारा स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळणार

    कसारा स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळणार आहे. इगतपुरी वरून मुंबईकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाडी आता कसारा रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे. त्यामुळे प्रवासांना मोठा दिलासा मिळेल, त्याचबरोबर कसारा स्थानकावर होणारी गर्दी आता कमी होईल.

  • 23 Aug 2023 08:19 AM (IST)

    रोहित पवारांचे कराडमध्ये जंगी स्वागत

    कोल्हापूर दौऱ्यावर निघालेल्या रोहित पवारांचे कराडमध्ये जंगी स्वागत करण्यात आले आहे. मी येतोय साहेबांचा संदेश घेऊन’ या हॅशटॅग ने आमदार रोहित पवार यांनी आजपासून कोल्हापूर दौऱ्याला सुरुवात केली आहे. दौऱ्यावर जाताना कराड येथे दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व गांधी पुतळा येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सौरभ पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

  • 23 Aug 2023 08:01 AM (IST)

    rain : मुंबईसह ठाण्यात पावसाची रिपरिप सुरू, चाकरमान्यांची तारांबळ

    मुंबईसह ठाण्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. पावसामुळे चाकरमान्यांनाही छत्री घेऊनच घराबाहेर पडावे लागत आहे. तर, अनेकांची तारांबळ होतानाही दिसत आहे.

  • 23 Aug 2023 07:46 AM (IST)

    raj thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, कार्यकर्त्यांच्या मुलाच्या तब्येतीची विचारपूस करणार

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहे. कार्यकर्त्यांच्या मुलाच्या तब्बेतीची विचारपूर करण्यासाठी राज ठाकरे पिंपरीला जाणार आहेत. दापोडी येथील विशाल देशपांडे यांच्या कुटूंबियांना भेटणार आहेत. राज ठाकरे कालपासून पुणे दौऱ्यावर आहेत.

  • 23 Aug 2023 07:30 AM (IST)

    Onion price rise : कांदा रडवणार… सलग तिसऱ्या दिवशी लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद, कोट्यवधीचा फटका

    सलग तिसऱ्या दिवशी लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव आजही बंद राहणार आहे. सोमवार आणि मंगळवारी कांदा लिलाव बंद राहिल्याने या दोन दिवसात 5 ते 6 कोटींची उलाढाल ठप्प राहणार आहे. कांदा लिलावात सहभाग न झाल्यास व्यापाऱ्यांचे लायसन्स रद्द करण्याचा प्रशासनाने इशारा दिला आहे. जिल्हा उपनिबंधकांने तसे पत्रच बाजार समितीला दिलं आहे. लासलगाव बाजार समिती कांद्याचे लिलाव पूर्ववत करण्यासाठी व्यापाऱ्यांशी करण्यात येणार आहे.

  • 23 Aug 2023 07:23 AM (IST)

    Chandrayaan-3 : भारत इतिहास घडवणार… चंद्रावर आपलाही ठसा, काऊंटडाऊन सुरू…

    भारताचं मिशन मून अवघ्या काही तासात यशस्वी होणार आहे. संध्याकाळी 5.30 ते 6.30 वाजता चांद्रयान -3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणार आहे. देशासाठी हा अभिमानाचा क्षण असणार आहे. भारताच्या या मून मिशनकडे भारतच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

Published On - Aug 23,2023 7:19 AM

Follow us
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.