Latur Accident: ट्रक-बसची समोरासमोर धडक; बसमधील २५-३० गंभीर प्रवासी जखमी

एसटी महामंडळाने साई गणेश टुर्स अँन्ड टॅव्हल्स या खाजगी कंपनीच्या बसेस प्रवासी वाहतुकीसाठी भाड्याने घेतल्या. चालक - वाहकाही खासगी कंपनीचेच आहेत.

Latur Accident: ट्रक-बसची समोरासमोर धडक; बसमधील २५-३० गंभीर प्रवासी जखमी
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 8:49 PM

लातूर : बसमध्ये प्रवासी बसले. एसटी बसचा प्रवास आरामदायी असतो, असा बऱ्याच प्रवाशांचा समज असतो. चालक जबाबदारीने गाड्या चालवतात. पण, दुर्घटना कशी आणि केव्हा घडेल काही सांगता येत नाही. छोटीशी चूक झाली, तर मोठी दुर्घटना घडते. अशीच एक दुर्घटना ट्रक आणि खासगी बसमध्ये घडली. यात बसमधील प्रवासी जखमी (Passenger Injured) झाले. लातूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या खासगी बसला ट्रकने समोरासमोर धडक (bus-truck accident) दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात २५-३० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना लातूर-नांदेड मार्गावरील (Latur Accident) अहमदपूर शहराजवळ घडली आहे.

LATUR BUS 2 N

जखमींवर उपचार सुरू

MH-24-AU-8160 या क्रमांकाची एसटी महामंडळाची खाजगी बस लातूरहून नांदेडच्या दिशेने जात होती. नांदेडहून लातूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने बसला समोरासमोर धडक दिली. यामध्ये बसमध्ये २५-३० प्रवासी होते. बहुतेक सर्व प्रवासी जखमी झाले. त्यातील १२-१५ प्रवासी गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये महामंडळाच्या खाजगी बसचे मोठे नुकसान झाले आहे.

खासगी बस वाहतुकीसाठी भाड्याने

एसटी महामंडळाने साई गणेश टुर्स अँन्ड टॅव्हल्स या खाजगी कंपनीच्या बसेस प्रवासी वाहतुकीसाठी भाड्याने घेतल्या. चालक – वाहकाही खासगी कंपनीचेच आहेत. याच कंपनीच्या खासगी बसला हा अपघात झाला आहे. या अपघातात २५ ते ३० प्रवासी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या अपघातात बसचे आणि ट्रकचेही नुकसान झाले. प्रवाशांनी स्वतःच्या डोळ्यादेखत हा अपघात बघीतला. तेव्हा त्यांच्या ह्रदयाचा ठोका चुकला.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.