KDMC election 2022 Ward 19 : कल्याण डोंबिवली महापालिकेत पुन्हा तिकीट मिळवण्यासाठी विद्यमान नगरसेवकांनी फिल्डींग
राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता असली तरी यंदा एकनाथ शिंदे गट आणि भाजपची युती होऊ शकते. प्रथमच कल्याण - डोंबिवलीत बहुसदस्य प्रभाग पध्दती असणार आहे. यामुळे एका प्रभागात तीन नगरसेवक असणार आहेत.
ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिकेत मागील 24 वर्षापासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (Kalyan Dombivali Municipal Corporation) निवडणुकीत पुन्हा तिकीट मिळवण्यासाठी विद्यमान नगरसेवकांनी फिल्डींग लावली आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता असली तरी यंदा एकनाथ शिंदे गट आणि भाजपची युती होऊ शकते. प्रथमच कल्याण – डोंबिवलीत बहुसदस्य प्रभाग पध्दती असणार आहे. यामुळे एका प्रभागात तीन नगरसेवक असणार आहेत.
अशी आहे नवी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत
नवीन प्रभाग रचनेनुसार एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक 19 मध्ये आता प्रभाग क्रमांक 19 अ, प्रभाग क्रमांक 19 ब आणि प्रभाग क्रमांक 19 क असे तीन प्रभाग असणार आहेत. यापैकी प्रभाग क्रमांक 19 अ हा अनूसुचीत जातीच्या उमेदवारासाठी आरक्षित करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 19 ब हा अनूसुचीत जमातीतील महिला उमेद्वाराकरीता आरक्षित करण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 19 क सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिवसेनेच्या मनीषा तरे या नगरसेविका आहेत. यामुळे त्या प्रभाग क्रमांक 19 ब किंवा प्रभाग क्रमांक 19 क मधून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करु शकतात.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर आणि अपक्ष |
प्रभाग क्रमांक 19 ची लोकसंख्या आणि मतदार संख्या
प्रभाग क्रमांक 19 हा विजयनगर, आमराई, हनुमाननगर, दुर्गानगर असा विस्तारीत आहे. चिंचपाडा महसुल हद्द, साकेत कॉलेज, 100 फुटी रोड, चिंचपाडा रोड, विजयनगर रस्ता, आमराई चौक, मल्हार पार्क, टिंकल सोसायटी, हनुमाननगर रस्ता, ड प्रभाग कार्यालय, ओम वैष्णवी पार्क, पुना लिंक रोड, अंकुर हॉस्पीटल, 60 फुटी नविन रोड ही प्रभागातील महत्वाची ठिकाणे आहेत. प्रभाग क्रमांक 19 ची एकूण लोकसंख्या 38362 इतकी आहे. अनुसूचित जातीचे 4836 मतदार आहेत. तर2840 मतदार हे अनुसूचित जमातीचे आहेत.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर आणि अपक्ष |
मतदारसंघ कुठून कुठपर्यंत?
उत्तर – पुना लिंक रस्त्यावरील गंगागिरी बिल्डींग (अंकुर – हॉस्पीटल) सह पुना लिंक रस्त्याने पुढे काटेमानिवली नाक्या पर्यंत.
पूर्व – काटेमानिवली नाक्या पासुन पुढे चिंचपाडा रस्त्याने – आयडल इंग्लीश स्कुल सह, पुढे प्रभुराम अपार्टमेंट वगळुन हनुमाननगर रस्त्याने ख्रिस बारसह, साई रचना अपार्टमेंट वगळुन पुढे रस्त्याने टिंकल अपार्टमेंट सह, पुढे दशरथ प्लाझा सह, पर्ण कुटीर चाळी वगळुन पुढे डॉन बास्को शाळे जवळील १८ मी. रुंद रस्त्या पर्यंत. पुढे मोकळया जागेतून १०० फुटी रस्त्यावरील सत्कार टॉवर पर्यंत. पुढे चिंचपाडा महसुल हद्दी पर्यंत.
दक्षिण – सत्कार टॉवर पासुन चिंचपाडा महसुल हद्दीने, पुढे साईदिप अपार्टमेंट पर्यंत. पुढे चिंचपाडा रस्त्याने पुढे सुशिला स्मृती पर्यंत. पुढे रस्त्याने करण अर्जुन वगळुन पुढे अर्जुन दर्शन सह, मोकळ्या जागेतून तिसाई दर्शन पर्यंत.
पश्चिम – तिसाई दर्शन पासुन पुढे जरीमरी शाळा वगळुन पुढे आशापुरा किराणा सह, पुढे ओम संगम चाळी सह, पुढे मोकळ्या जागेतून गजानन चांगो हाईट वगळुन पुढे एकनाथ एन्क्लेव्ह वगळुन पुढे शांताबाई चाळी सह, पुढे ओम वैष्णवी पार्क सह, रस्त्याने पुढे साईबाबा मंदिर सह. पुढे रस्त्याने श्रीहरी अपार्टमेंट सह. पुढे वामन हाईट सह, पुढे सहजीवन सी-विंग पुढे पुना लिंक रस्त्यावरील गंगागिरी (अंकुर हॉस्पीटल) पर्यंत.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर आणि अपक्ष |