कुठे पुतळा जाळला तर कुठे जोडो मारो; राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप पेटून उठला
राहुल गांधी यांच्या मोदी संदर्भातील वक्तव्यामुळे आता काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. त्यामुळे आता राहुल गांधी आणि त्यांचे वक्तव्यावरून पुतळा जाळणे आणि निषेध व्यक्त केला जात आहे.
रावेर/जळगाव : राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे भाजप आता आक्रमक होत राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार आंदोलन आणि निषेध व्यक्त करून त्यांचा समाचार घेतला जात आहे. एकीकडे राहुल गांधी यांचे खासदारकी काढून घेतल्यामुळे काँग्रेसकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे तर दुसरीकडे भाजपने राहुल गांधी यांच्या वक्तव्याला ओबीसी समाजाशी जोडून राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले आहे.
जळगावमधील रावेरमध्येही राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून भाजपतर्फे राहुल गांधी यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्याविरोधातही घोषणा देण्यात आल्या आहेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे मोदी समाज नाराज असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आता ओबीसी समाजासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रावेरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राहुल गांधी यांच्याविरोधात निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या पुतळ्यास जोडे मारुन राहुल गांधी यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
रावेर येथील तहसील कार्यालय समोर राहूल गांधी यांच्या पुतळ्यास जोडे मारो व पुतळा प्रतिमेचे दहन करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
राहुल गांधी यांच्या मोदी संदर्भातील वक्तव्यामुळे आता काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. त्यामुळे आता राहुल गांधी आणि त्यांचे वक्तव्यावरून पुतळा जाळणे आणि निषेध व्यक्त केला जात आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसही आता आक्रमक झाली आहे. काँग्रेसनेही आंदोलनाचा इशारा दिला असून ज्या भाजपने लोकशाहीला हुकूमशाहीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी आता काँग्रेस एक दिवस नाही तर वर्षभर आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपला देण्यात आला आहे.