K L Rahul : भारताचा तडाखेबाज ओपनर के. एल. राहुल पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह, पुढच्या सामन्यांचं गणित बिघडणार?

सहाजिकच या बातमीमुळे त्याचं आगामी दौऱ्याचं गणितही बिघडण्याची पूर्ण शक्यता आहे. मात्र कोरोनातून बाहेर येण्यासाठीही त्याच्याकडे बरेच दिवस असल्याने टीम आणि राहुल काय निर्णय घेणार? यावर त्याची पुढची वाट ही पूर्णपणे अवलंबून असणार आहे. 

K L Rahul : भारताचा तडाखेबाज ओपनर के. एल. राहुल पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह, पुढच्या सामन्यांचं गणित बिघडणार?
भारताचा तडाखेबाज ओपनर के. एल. राहुल पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह, पुढच्या दौऱ्याचं गणित हलणार?Image Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 10:54 PM

मुंबई : येत्या काही दिवसातच टीम इंडियाचा (Indian Cricket Team) वेस्ट इंडिजशी मुकाबला (IND Vs WI) होणार असताना क्रिक्रेट विश्वातून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारताचा तडाखेबाज ओपनर लोकेश राहुल कोरोना पॉझिटिव्ह (KL Rahul Corona Positive) आला आहे. 29 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेत खेळणे त्याला कठीण वाटत आहे. राहुलवर काही दिवसांपूर्वी जर्मनीत हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बोर्डाच्या बैठकीत राहुलला कोरोना झाल्याबाबत माहिती दिली. सहाजिकच या बातमीमुळे त्याचं आगामी दौऱ्याचं गणितही बिघडण्याची पूर्ण शक्यता आहे. मात्र कोरोनातून बाहेर येण्यासाठीही त्याच्याकडे बरेच दिवस असल्याने टीम आणि राहुल काय निर्णय घेणार? यावर त्याची पुढची वाट ही पूर्णपणे अवलंबून असणार आहे.

आगाामी सामन्यात काय होणार?

शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत यष्टीरक्षक, फलंदाज के. एल. राहुलला विश्रांती देण्यात आली नाही. गांगुली यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या मते आशिया कप आता श्रीलंकेऐवजी यूएईमध्ये खेळवला जाऊ शकतो. देशात सुरू असलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटामुळे श्रीलंकेने आशिया कपचे यजमानपद नाकारले आहे. त्यामुळे तिही समीकरणं बदलताना दिसत आहे. तसेच कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला संघातील एक खेळाडू देखील कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याची माहिती गांगुलीने दिली. मात्र, त्याने खेळाडूचे नाव सांगितले नाही. राहुलने गुरुवारीच बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये लेव्हल-3 प्रशिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रमात सहभागी झालेल्या उमेदवारांना संबोधित केले होते.

आगामी टी-20 विश्वचषकात राहुलचा रोल महत्वाचा

राहुल 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी होता. तथापि त्याने फिटनेस चाचणी पास केली तरच त्याला कॅरेबियन बेटांवर जायचे होते. राहुल हा सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये भारताच्या उत्कृष्ट धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषक स्पर्धेत तो महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. या 30 वर्षीय खेळाडूने गेल्या आठ वर्षांत भारतासाठी 42 कसोटी, 42 एकदिवसीय आणि 56 टी-20 सामने खेळले आहेत.

त्याची बॅटिंग अनेकांना धडकी भरवते

राहुल हा टी-२० जास्तवेळा हा ओपनिंगला उतरताना दिसून आला आहे. त्याच्या आक्रमक खेळासाठी तो प्रसिद्ध आहे. त्याची आयपीएलमधील कामगिरीही उत्तम आहे. तसेच त्याची बॅटिंग ही अनेकांना धडकी भरवते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.