Maharashtra Rain Update : मुंबईसह महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईत पुढच्या 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

यावर्षी महाराष्ट्रात लवकर पाऊस सुरू होईल असा हवामान खात्याचा अंदाज होता. परंतु पावसाची जोरदार सुरूवात मात्र जुलै महिन्यात झाल्याचं पाहायला मिळालं.

Maharashtra Rain Update : मुंबईसह महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईत पुढच्या 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
मुंबईसह महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईत पुढच्या 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारीImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 7:16 AM

मुंबई – मागच्या चार दिवसांपुर्वी महाराष्ट्रात मुसळधार पाऊस (Heavy Rain Maharashtra) झाला आहे. त्यावेळी अनेक जिल्ह्यांना पूराचा फटका बसला आहे. तसेच अनेक जिल्ह्यात पूराचा फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्यातल्या काही महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये एनडीआरएफ पथक पाठवण्यात आलं होतं. मुंबईसह कोकण पश्चिम महाराष्ट्रात विशाल पूर येण्याची शक्यता हवामान खात्याने (Meteorological Department) व्यक्त केली होती. त्यानंतर काही पावसाने उसंत घेतली. काल सायंकाळपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईत पुढच्या 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy Rain Mumbai) होण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम, उत्तर महाराष्ट्रात रेड अॅलर्ट जारी करण्यात आला असून तिथेही अतिवृष्टी होण्याची शक्यता कुलाबा वेध शाळेने व्यक्त केली आहे.

दोन विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

यावर्षी महाराष्ट्रात लवकर पाऊस सुरू होईल असा हवामान खात्याचा अंदाज होता. परंतु पावसाची जोरदार सुरूवात मात्र जुलै महिन्यात झाल्याचं पाहायला मिळालं. जुन महिना संपला तरी पाऊस नसल्याने महाराष्ट्रात दुष्काळ पडतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मागच्या आठवड्यात मुंबईत मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी मुंबईतल्या सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. तसेच विरार, वसई, पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणी पाहायला मिळतं होतं. पुढच्या तीन दिवसात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे गरज असेल तरचं घरातून बाहेर पडा असं सांगण्यात आले आहे.

कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट

मुंबईत रात्रीपासून वाऱ्याचा वेग वाढला असून काही दिवस वाऱ्याचा वेग असाचं राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. मागच्या आठवड़्यात झालेल्या पावसामुळे मुंबईतले बसचे मार्ग बदलण्यात आले होते. पालघरमध्ये पुढील तीन दिवस दिवस, रायगडमध्ये दोन दिवस तर रत्नागिरीत आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. गडचिरोलीमध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.