Bhandara Crime | भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव उधळला, वरासह वऱ्हाडी मंडपातून परतले

सकाळच्या सुमारास वाजतगाजत नवरदेव वधूमंडपी पोहोचला. लग्न लागण्याची तयारी सुरू झाली. परंतु जन्मतारखेचा दाखला मिळण्यास विलंब होत आल्याने कारवाई करता येत नव्हती.

Bhandara Crime | भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव उधळला, वरासह वऱ्हाडी मंडपातून परतले
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव उधळलाImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 2:44 PM

भंडारा : वाजतगाजत नवरदेव लग्नमंडपात पोहोचला. लग्नाची घटिकाही अगदी जवळ आली. सर्व तयारी झाली. अचानक जिल्हा बाल संरक्षण समितीचे (District Child Protection Committee) पथक पोलिसांसह लग्नमंडपात पोहोचले. नवरी मुलगी अल्पवयीन असल्याचा पुरावा सादर करीत लग्नाचा डाव मोडला. ही कारवाई भंडारा येथील साई मंगल कार्यालयात (Sai Mangal Office) बुधवारला दुपारी करण्यात आली. वऱ्हाडी मंडळींनी जेवणावर ताव मारला. पण, नवरदेवाला रुसून परत जावे लागले. नवरीच्या पालकांनी मुलगी सज्ञान झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असं लिहून दिलं. अन्यथा त्यांना दंड वसूल करावा लागला असतो. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर लग्न करण्याचे लेखी उत्तर वर-वधूनं दिले आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन कुमार साठवणे (Nitin Kumar Sathwane) यांनी दिली. मात्र लग्नात सहभागी होण्यासाठी आलेल्या वऱ्हाडींना आल्या पावली परत जावे लागले.

चौकशीसाठी तीन पथकं

भंडारा येथील साई मंगल कार्यालयात बुधवारी लग्नसोहळा आयोजित केला होता. मात्र जिल्हा बाल संरक्षण कक्ष व महिला बालविकास विभागाला नवरी मुलगी अल्पवयीन असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून भंडारा बालसंरक्षण कक्षातील अधिकाऱ्यांची तीन पथके तयार करण्यात आली. एक पथक साई मंगल कार्यालयात पोहोचले. तेथील हालचालींवर लक्ष ठेवून होते. दुसरे पथक मुलीने शिक्षण घेतलेल्या शाळेत जन्मतारखेची खातरजमा करण्यासाठी पाठविण्यात आले. तर तिसरे पथक भंडारा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांचे पथक घेऊन आले.

जन्मतारखेचा दाखला दाखविताच आई नरमली

सकाळच्या सुमारास वाजतगाजत नवरदेव वधूमंडपी पोहोचला. लग्न लागण्याची तयारी सुरू झाली. परंतु जन्मतारखेचा दाखला मिळण्यास विलंब होत आल्याने कारवाई करता येत नव्हती. शेवटी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवरीचे आई- वडील व नातेवाइकांची भेट घेत त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. परंतु त्यांनी मुलीची जन्मतारीख 15 एप्रिल 2004 असल्याचे सांगत मुलगी 18 वर्षांची आहे, असे ठणकावून सांगितले. शाळेचा दाखला देण्यास विलंब होत असल्याने पथकाने भंडारा नगर परिषद गाठून मुलीच्या जन्माचा दाखला प्राप्त केला. त्यावर 15 एप्रिल 2005 असे नमूद होते. नवरी मुलगी 17 वर्षे 19 दिवसांची असल्याची आढळून आली. अखेर नवरदेव नवरीला बाल कल्याण समितीपुढे हजर करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.