Nana Patole : राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला, नाना पटोलेंचा हल्लाबोल, महाविकास आघाडीत पुन्हा काँग्रेस-विरुद्ध राष्ट्रवादी

महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदही अनेकदा चव्हाट्यावर आले आहे. मग ते कधी निधीवरून असो, कधी महामंडळांच्या वाटपावरून असो, किंवा इतर कोणत्या मुद्द्यावरून असो, हे अनेकदा महाराष्ट्राने पाहिलं आहे. मात्र आता थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादीने (NCP) आमच्या पाठीत खंजीर खुपसला असे वक्तव्य केले आहे.

Nana Patole : राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला, नाना पटोलेंचा हल्लाबोल, महाविकास आघाडीत पुन्हा काँग्रेस-विरुद्ध राष्ट्रवादी
नाना पटोले यांचं मोठं वक्तव्यImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 7:23 PM

भंडारा : राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारची सत्ता आहे. शिवसेने आपला भाजपबरोबरचा तीन दशकांचा घरोबा तोडला आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन सत्तेच्या खु्र्चीवर विराजमान झाले. तेव्हापासून या सरकारवर तीन चाकांचा रिक्षा, तीन तिगाडा काम बिगाडा अशी टीका भाजपकडून होत आहे. तसेच भाजपने अनेकदा सरकार पडण्याच्या वेगळ्या ताखाही दिल्या आहेत. हे सरकार अंतर्गत संघर्षामुळेच पडेल असेही भाजपने वारंवार सांगितेल आहे. महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदही अनेकदा चव्हाट्यावर आले आहे. मग ते कधी निधीवरून असो, कधी महामंडळांच्या वाटपावरून असो, किंवा इतर कोणत्या मुद्द्यावरून असो, हे अनेकदा महाराष्ट्राने पाहिलं आहे. मात्र आता थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादीने (NCP) आमच्या पाठीत खंजीर खुपसला असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे.

नाना पटोले असे का म्हणाले?

भंडारा गोंदिया पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला व अनेक ठिकाणी भाजप सोबत युती करत सत्ता स्थापन केली. आमचं जयंत पाटील व प्रफुल पटेल यांच्यासोबत सुध्दा बोलणं झाल्यावर यांनी प्रत्येक ठिकाणी भाजपा सोबत युती केली, गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये सुध्दा राष्ट्रवादी भाजप सोबत जात युती केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केले आहे. त्यावर आता जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या विधानाने महाविकास आघाडीची स्थानिक लेव्हलची खदखद अनेकदा बाहेर आली असली तरी आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीच हे विधान केल्याने पुन्हा राजकीय चर्चांणा उधाण आले आहे.

भंडाऱ्यात नेमकं काय घडलं?

भंडारा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या नीतीला छेद देत भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपची युती झाली असून काँग्रेसचे अध्यक्ष तर भाजपचे उपाध्यक्ष झाला आहे. काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली असून उपाध्यक्षपदी भाजपचे संदीप टाले यांची निवड झालेली आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष यांना 27-27 मते पडले आहेत. तर भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवत सत्ता स्थापन केली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या 12 पैकी पाच मते हे चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात फुटलेली आहेत. याबाबतच नाना पटोले यांना विचारले असता राष्ट्रवादीने इतर अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचं विधान केले आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.