विधानपरिषद उमेदवारीचा निर्णय लवकरच, पंकजा मुंडेंनी वाढवलं भाजपचं टेन्शन, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता!

विधान परिषद उमेदवारीवरून पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, मी कोणत्याही संधीची अपेक्षा करत नाही किंवा त्यासाठी प्रयत्नही करत नाही.

विधानपरिषद उमेदवारीचा निर्णय लवकरच, पंकजा मुंडेंनी वाढवलं भाजपचं टेन्शन, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 3:49 PM

बीडः महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) सक्रीय भाजप नेत्या म्हणून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची ख्याती आहे. त्यामुळे यंदाच्या राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र भाजपकडून अन्य दोन उमेदवारांची नावं उघड झाल्यानंतर राज्यसभेची चर्चा बंद झाली आणि विधानपरिषदेच्या (Legislative Council) उमेदवारीवरून चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपकडून अनेक नावं चर्चेत आहेत. त्यात पंकजा मुंडे यांचंही नाव आहे. याविषयी पंकजा मुंडेंनीही सांकेतिक प्रतिक्रिया दिली. बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्तच्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘विधान परिषदेच्या उमेदवारीविषयी पक्ष लवकरच निर्णय घेईल.’

भाजपकडून कुणाची नावं?

विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजपकडून अद्याप दोन नावांवर शिक्कामोर्तब झालंय. यात भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचं एक नाव आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवक्तीय प्रसाद लाड यांचंही नाव फायनल झाल्याची माहिती आहे. आता उर्वरीत दोन जागांसाठी माजी मंत्री राम शिंदे, पंकजा मुंडे, चित्रा वाघ आणि संजय पांडे यांची नावं चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे यांच्याही नावाची चर्चा होती. इच्छुक उमेदवारांची फडणवीसांकडे लॉबिंग सुरु असल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळे या सर्वांतून पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळते, का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

विधान परिषद उमेदवारीवरून पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, मी कोणत्याही संधीची अपेक्षा करत नाही किंवा त्यासाठी प्रयत्नही करत नाही. पण सधी मिळाल्यास त्याचं सोनं करून दाखवणं हे माझं काम आहे. हे माझे संस्कार आहेत. गोपीनाथ मुंडे यांनी जी पदं भूषवली त्या पदाला त्यांनी आणखी मोठं केलं. संधीसाठी रांगेत वाट पाहणं, ही माझी प्रवृत्ती नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

शिवराजसिंह चौहान बीडमध्ये

दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनी, पंकजा मुंडे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विशेष आमंत्रित केले आहे. नुकतंच मध्य प्रदेश सरकारने तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळवून दिलं. त्यामुळे मध्य प्रदेशात ओबीसींना संरक्षण देणारा नेता, महाराष्ट्रातील ओबीसींसाठी आयुष्य खर्च करणाऱ्या नेत्याच्या समाधीस्थळावर येतोय, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.