हसलात तर फसलात !!! Nanded मध्ये उद्यापासून नरेंद्र देवेंद्र महोत्सव, न हसणाऱ्याला दहा हजारांचं बक्षीस!

देशातील सर्वात मोठे कवी संमेलन म्हणून ख्याती मिळविणाऱ्या या नरेंद्र देवेंद्र महोत्सवास रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ.सचिन पाटील उमरेकर आणि संयोजक धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

हसलात तर फसलात !!! Nanded मध्ये उद्यापासून नरेंद्र देवेंद्र महोत्सव, न हसणाऱ्याला दहा हजारांचं बक्षीस!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 6:00 AM

नांदेडः गेल्या अनेक दिवसांपासून खळखळून हसला नसाल आणि नांदेडमध्ये (Nanded)जाण्याची तयारी असेल तुमच्यासाठी ही बातमी. नांदेडमध्ये दोन दिवसीय नरेंद्र देवेंद्र महोत्सवाचं (Narendra Devendra) आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात आयोजित केलेल्या हास्य दरबारात तुम्ही शंभर टक्के हसणारच, अशी गॅरेंटी आयोजकांनी दिली आहे आणि नाही हसलात तर तुम्हाला दहा हजार रुपयांचं बक्षीसही दिलं जाईल. मागील 20 वर्षांपासून रसिकांच्या मनावर ठसा उमटवणारा नांदेडमधील नरेंद्र देवेंद्र महोत्सव उद्यापासून सुरु होतोय. पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने हा महोत्सव 14 आणि 15 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. कै. चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी नवा मोंढा मैदान, नांदेड येथे होणाऱ्या या महोत्सवातील(Nanded Festival) 14 मे रोजीच्या ‘दहाव्या मराठी हास्य दरबार’ या कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी आमदार अतुल सावे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार भीमराव केराम, आमदार राजेश पवार, व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. ही माहिती स्वागताध्यक्ष डॉ. सचिन पाटील उमरेकर आणि संयोजक धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

दिग्गज कवींना ऐकण्याची संधी

गेल्या महिन्याभरापासून जय्यत तयारी सुरू असलेल्या या महोत्सवात देशभरातील नामांकित कवींची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये पुणे येथील बंडा जोशी, सातारा येथून अनिल दीक्षित, अहमदनगरचे भालचंद्र कोळपकर, परभणीचे हास्य सम्राट सिद्धार्थ खिल्लारे, स्थानिक कवी शाहीर रमेश गिरी, सतीश कासेवाड आणि विडंबनकार श्रीनिवास मस्के हे हास्य दरबार मराठीतून हास्याचे फवारे उडविणार आहेत. तर हिंदीच्या अखिल भारतीय कविसंमेलनात जबलपूर येथील हास्य गीतकार सुदिप भोला, साजापूर येथील हास्य व्यंगाचे कवी दिनेश देसी घी, भोपाळ येथील शृंगार रसाचा कवयित्री सबिया असर, इंदोर येथील वीर रसाचे कवी मुकेश मोलवा, कोटा येथील राजेंद्र पवार आणि नागपूर येथील हर्ष व्यंगाचे कवी कपिल जैन हे आपल्या रचना सादर करणार आहेत.

15 मे रोजी अखिल भारतीय विराट कविसंमेलन

महोत्सवात 15 मे रोजी होणाऱ्या अखिल भारतीय विराट कविसंमेलनाचे उद्घाटन भाजपाचे प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंघजी, भाजपा प्रदेश संघटन सरचिटणीस अतुल वजे, रामदास पाटील सुमठाणकर, डॉ.अजित गोपछडे, संजय कौडगे, दिलीप कंदकुर्ते, संतुकराव हंबर्डे, बालाजी शिंदे मरळककर, शिवराज पाटील गोळेगावकर यांची उपस्थिती राहणार आहे. हा पक्षाचा नसून सांस्कृतिक कार्यक्रम असल्यामुळे या महोत्सवासाठी अधिकारीवर्ग यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपवनसंरक्षक केशव वाबळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे व निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे आणि चंद्रसेन देशमुख यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

न हसणाऱ्यांनाही बक्षीस

या महोत्सवास वेळेवर उपस्थित राहणाऱ्या 10 रसिकांना सोडतीद्वारे रंगीत टीव्ही मिळणार आहे. दरम्यान दिग्गज नेते, मान्यवर आणि हजारो रसिकांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या महोत्सवात अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा नांदेड भूषण आणि सुधाकर पत्र भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. नांदेड भूषण पुरस्कारांमध्ये डॉ.हंसराज वैद्य, सरदार नवनिहाल सिंघ जहागीरदार, अॅड. मिलिंद एकताटे, दिलीप मोदी यांचा समावेश आहे. तर सुधाकर पत्र भूषण पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, देशोन्नतीचे आवृत्ती संपादक अनिल कसबे, ज्येष्ठ पत्रकार सुनील जोशी आणि कालिदास जहागीरदार यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

आणि हो या कार्यक्रमास उपस्थित राहून न हसण्याचे चॅलेंज स्वीकारणाऱ्या एका रसिकप्रेक्षकांस रोख दहा हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे.

देशातील सर्वात मोठे कवी संमेलन म्हणून ख्याती मिळविणाऱ्या या नरेंद्र देवेंद्र महोत्सवास रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ.सचिन पाटील उमरेकर आणि संयोजक धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.